मी तिच्या पत्रातला मजकूर होतो!

Submitted by सतीश देवपूरकर on 8 November, 2012 - 02:29

गझल
मी तिच्या पत्रातला मजकूर होतो!
भेटण्यासाठी तिला आतूर होतो!!

मायना लिहिताच लिहिणे ठप्प झाले.....
मी तिच्या चिठ्ठीतली हुरहूर होतो!

मीच गंधाळून, तेजाळून गेलो!
मी तिच्या श्वासातला कापूर होतो!!

मी तिचा एकांत इतका व्यापला की,
वाटले नाही तिला मी दूर होतो!

चूक ती माझी, तुझी, की, त्या वयाची?
एकमेकांच्यात दोघे चूर होतो!

मोठमोठ्यांची उडाली पार त्रेधा.....
मी अवेळी लोटलेला पूर होतो!

घेतला आलाप अन् टाळ्या मिळाल्या;
मी जगाला भावलेला सूर होतो!

खेळले आयुष्य माझ्याशी असे की,
सूरपारंबीतला मी सूर होतो!

.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रोफेश्वर, वाचायला छान वाटते आहे, बाकी तांत्रिक बाबी कळत नसल्याने काही बोलू शकत नाही.
"भुकंपात मी लातूर होतो" असे कुठे जमले असते का ? Uhoh
(पी.एल. तेवढं गच्ची जमतय का बघा या चालीवर)

महेशजी! आप बोले और हम ना सुने?
हा घ्या लातूरचा शेर.....आपणास विनम्र अर्पण!
त्या दुभंगाच्या स्मृती अद्याप ताज्या!
मी महाराष्ट्रातले लातूर होतो!
................प्रा.सतीश देवपूरकर

चूक ती माझी, तुझी, की, त्या वयाची?
एकमेकांच्यात दोघे चूर होतो!

व्वा!!

(हे शेराला उद्देशून आहे बरं.... Happy )

सतीशजी,
एक सुचवू का..?

चूक माझी की तुझी की त्या वयाची?

>>औकात तो हमारी भी वैसे कितनी है?
नाही हो काही कल्पना नाही Sad
(गजले बिजलेतल फार काही कळत नाही, वाचायला बर वाटल तर वाचतो)
-- एक अतिसामान्य वाचक

प्रोफे सर,
तुम्ही दुसर्‍यांच्या म्हणजे माय्बोलीमधल्या इतर गझलाकारांच्या (बेफी, विदिपा, कैलास गाय्कवाड, शाम, सुप्रिया जाधव, रसप, कुळकर्णी इ.इ.) गझला वाचत नाही काय?

इतरांच्या गझलांवर तुमचा एकही प्रतिसाद नाहीये. आणि हे लोक तुमची गझल दिसली की वाचायचे कष्ट घेउन वर प्रतिसाद पण देतात.
सहज विचारलय. गैरसमज नसावा.

अहो कोल्हापूरकर, मी मोठ्या कष्टाने त्यांचे प्रतिसाद आटोक्यात आणले आहेत आणि तुम्ही पुन्हा वेष्टन उघडताय अ‍ॅटमबाँबवरचे!

प्रोफेसर साहेब - Light 1

Rofl

कोल्हापूरकर!
विचारलेत म्हणून सांगतो......
ज्या थोरापोरांचा आपण कंसात उल्लेख केला आहे, त्या बहुतेकांच्या व इतरही अनेकांच्या गझलांवर प्रदीर्घ प्रतिसाद आम्ही दिलेले आहेत. अलीकडे कार्यबाहुल्यामुळे हरेक गझलेवर इच्छा असूनही लिहिणे जमत नाही. त्याची खंत निश्चितच वाटते. असो. शिवाय काही थोरासोरांना आमच्या गझलेचे/प्रतिसादांचे तर सोडा आमच्या नावाचे /पेशाचे देखिल वावडे आहे असे दिसते. आम्ही स्वत: आमच्याविषयी काहीही दडवून ठेवत नाही.
डुप्लिकेट की, काय म्हणतात त्यास आमच्या लेखी किंमत शून्य असते. आमचेकडे सगळे रोखठोक/आडपडदा न ठेवता असते. विपुवर आमचा विश्वास नाही. जे म्हणायचे ते खुल्लम खुल्ला!
साहित्यिक गोष्टींवर आमचा विश्वास आहे व त्यातच आम्हास रुची आहे.
वेळेच्या तोकडेपणामुळे आम्ही ज्या गझलांत आम्हास दम आहे असे वाटते, ज्या आम्हास भावतात, त्यांच्यावरच आम्ही आमची प्रतिक्रिया सौजन्याची पातळी न सोडता देत असतो.
टीप: जुन्या मा. बो. वरील गझलांकडे एक नजर टाका , त्यांच्यावरील प्रतिसाद वाचा, म्हणजे आम्ही काय म्हणतो त्याचा तुम्हास पडताळा येईल!
आमच्या लेखनाची गुणात्मकता व संख्यात्मकता दोन्हींचा आपणास अंदाज यावा!
.............प्रा.सतीशदेवपूरकर

कोल्हापूरकर,

वात लावण्यापूर्वी बाटलीत ठेवा बरं का? आणि ती आडवी पडणार नाही, ह्याचीही दक्षता घ्या.. !!

Light 1
Light 1
Light 1
Light 1

कोल्हापूरकर,

कैलास गायकवाड माझ्यामते गझलकार नसून "तरहीकार" आहेत. त्यांची स्वतंत्र गझल दिसते का कुठे ते सांगा बरे!

Happy

अजय,

कैलासरावांच्या भरपूर गझला आहेत. Happy

तरही हा उपक्रम त्यांनी माबोसाठी खास सुरू केला कारण येथे अनेक वेगवेगळे गझलकार होते आणि त्यामुळे तरही उपक्रम व्यवस्थित चालण्याइतके पोटेन्शिअल येथे होते.

कैलासरावांनी अनेक ठिकाणी आपल्या स्वतंत्र स्वरचित व उत्तम गझला पेश केलेल्या आहेत व त्या रसिकांनी भरपूर दाद देऊन ऐकलेल्याही आहेत. कार्यबाहुल्यामुळे डॉक्टरांना अनेक गझला अप्रकाशित ठेवाव्या लागलेल्या आहेत हे अनेकांना माहीतच नसेल. Happy

असो

बेफिकीर,

हे कोल्हापूरकर कि कोण ते आल्यापासून त्यांनी कैलास यांना किती वेळा वाचले असेल. तरी ते कैलासरावांचे नाव घेतात. म्हणजेच, काहितरी गोचि आहे.

खालील संधी म्हणजे ओढूनताणून,जुळवलेला..बादरायण संबंध....असे समजा....माबोच्या भाषेत दिवा घ्या.

गझल लिहिणारे म्हणजे....ग ची बाधा झालेले कवी. Proud

असे नाही काही प्रमोदजी,

ग-झ-ल

'ग' 'झ'टकून लिहिणारे कवी...

Pages