गरमी फार झालीय ना हल्ली.. दोनचार दिवस थंडी आलीय, थंडी आलीय अश्या अफवा काय त्या उठल्या, पोरांनी एकमेकांना हॅपी थंडीचे मेसेजेसही पाठवून झाले.. पण पुन्हा परिस्थिती जैसे थे..
ऑफिसमध्ये असताना काही जाणवत नाही.. थॅंक्स टू वोल्टास एअर कंडीशनर.. पण बाहेर पडले की पाचच मिनिटांत पाण्याच्या धारा लागतात अंगाला.. नुसती चिकचिक चिक चिक वैताग आलाय..
आधीच माझ्या गोळ्या चालू असल्याने अंगातली हीट वाढलीय.. त्याचा परीणाम डोक्यावर व्हायला सुरूवात झालीय...
डोक्यावर परीणाम म्हणजे... नकोच्या नको ते अर्थ घेऊ नका... वाढलेल्या केसांच्या आत छोट्या छोट्या पुळ्या जमायला सुरुवात झालीय..
त्यामुळे शेवटी आज मनावर दगड ठेऊन केसांची कुर्बानी द्यायला तयार झालो..
मोहपाशात अडकून राहू नये म्हणून सरळ क्रमांक २ चे मशीन फिरवून टक्कल करायचे ठरवले..
सलूनवाल्याला तशी ऑर्डर सोडताच त्याचा चेहराही आंबट झाला... माझ्या घनेरी जुल्फांना सटासट करायला त्याच्याही जीवावर आले..
पण मी निश्चयावर ठाम होतो................ तोपर्यंत........... पण जसे त्याने मशीन फिरवायला सुरूवात केली तसे कसेसेच होऊ लागले..
क्षणाक्षणाला माझे बदलते रूप समोरच्या आरश्यात इथून तिथून चोहीकडून दिसत होते...
आधी त्याने दोन्ही साईडने मशीन फिरवून घेतले तसे मधला झुपका फारच मोठा आणि उठून दिसू लागला...
त्यावेळी ते विचित्रच दिसत होते, पण मधले केस थोडे त्याला सूट होतील असे केले तर मस्त दिसेल हे जाणवत होते..
क्षणात टाळला तो मोहाचा क्षण.... आणि दुसर्याच क्षणी त्याने डोक्याच्या मध्यभागी टाळूवर मशीन फिरवायला घेतली.. तिकडची जुल्फे काय उडवली, कोणीतरी माझ्या डोक्याची शकले उडवल्यासारखे वाटले.. शहाळ्याला सुरुवातीला साइडकट मारत अचानक शेवटी एकाच फटक्यात टॉप कट मारतात तेव्हा ते जसे बोडके दिसते तसे माझे डोके आता दिसू लागले..
आताच मला हे बघायला असे वाटतेय तर उद्या ऑफिसला कसे जाणार हा विचार डोक्यात येताच मी लगेच त्याला तिथेच थांबवले..
जे उरले सुरले आहेत ते तरी वाचवूया असे ठरवले.. आणि त्याला पुढचे ठेव रे बाबा थोडे असे विनंती केली.. तसे त्याने मशीन ठेऊन कैची हातात घेतली..
पुढे मग ते, काय, कसे, वरच्या टकलाशी मॅच अप करायचे ते त्याच्यावरच सोडून दिले.. आणि त्याने जो काही नवा लेटेस्ट लूक मला मिळवून दिला तो घेऊन घरी आलो..
आता घरी......
संध्याकाळची वेळ, बायको झोपेतून अर्धवट उठलेली, खिडकीतून संधीप्रकाश आत शिरत होता, त्यातच मला बघून बायको किंचाळली, आधी लाइट लाव, मला तू काहीतरी वेगळाच दिसतोयस..
मी घाबरून बाथरूममध्ये आंघोळ करायलाच पळालो...
बाहेर आलो तर पुर्ण फॅमिली समोर... पुर्ण बोले तो... आईवडील आणि बायको..
मी कसेबसे हाताने पुढचे ओले केस वर करून इज्जत झाकायचा प्रयत्न केला आणि त्यांनी काही बोलायच्या आधीच म्हणालो.. स्पाईक कट...!!
बायको - चूप बस टकल्या...
आई - हे काय मिलेट्री वाल्यांसारखे कापलेस का?
मी (पुन्हा एकदा) - नाही, स्पाईक कट.
वडील - हा आमच्या जमान्याचा कट आहे.. आता नाव आठवत नाही..
मी (पुन्हा एकदा ओले केस वर करत) - अहो तुमचा जमाना काय...... लेटेस्ट आहे... स्पाईक कट..!!
आई - बरे केलेस पण छान दिसत आहेत, सोल्जर कट वाटतोय.. त्या लोकांचे असेच असतात ना, छोटे छोटे..
मी (आता चिडून, कंबरेला गुंडाळलेले टॉवेल सुटणार नाही याची काळजी घेत दोन्ही हाताने पुढचे केस उभे करून तिला दाखवत, ‘अग हे बघ ना’च्या आविर्भावात) - अग्ग स्पाईक कट...!!
वडील अजूनही काहीतरी आठवतच होते..
बायको - मी नाही तुझ्याबरोबर कुठे येणार आता, जोपर्यंत तुझे केस वाढत नाहीत...
मी - वाढतील ग दहा पंधरा दिवसांत..
बायको - दहा-पंधरा दिव्वस.... दिवाळी आहे पुढच्या आठवड्यात... माझ्या घरी पण येऊ नकोस आता.. आधी तरी कापायचेत... जरा कमी तरी कापायचेत...
बायकोची नॉनस्टॉप कॅसेट सुसाट सुरूच झाली अन तेवढ्यात आमचे परमपूज्य पिताश्री उद्गारले -- हा हा हा.... आता आठवले... कोंबडा कट....!!
बायकोला मला चिडवायला नवीन नाव मिळायच्या आधीच मी विषयाला तिथेच कट मारून तिथून कल्टी घेतली.
हा हा हा.. ती शहाळं सोलायची
हा हा हा..
ती शहाळं सोलायची उपमा आवड्ली
मस्त लिहिलय ! हॅप्पी थंडी
मस्त लिहिलय !
हॅप्पी थंडी >>> असे पण मेसेज असतात ?
हॅप्पी थंडी >>> असे पण मेसेज
हॅप्पी थंडी >>> असे पण मेसेज असतात?
>>
तर काय
या अभिषेकदादानेच पाठवलेला मला एक
आमच्या कॉलेजात एकजण होता त्याचा कोंबडा कट होता
आम्ही म्हणजे मी आणि माझ्या २ मैत्रिणी त्याला कोंबडाच म्हणत होतो कित्ती दिवस!
(No subject)
छान लिहिलेय... कोंबडा कट
छान लिहिलेय... कोंबडा कट म्हणजे खोया खोया चाँद गाण्यातला देवानंद आठवायचा... केसाचा कोंबडा कट आणि नाचाची स्टाईल, कट केलेल्या कोंबड्यासारखी !
स्पाईक कट कोंबडा कट आता
स्पाईक कट
कोंबडा कट
आता आपला दाखवा..
अभिषेक.. हॅप्पी न्यू हेअर
अभिषेक.. हॅप्पी न्यू हेअर ईश्टाईल..
अभि.....................फोटो
अभि.....................फोटो टाकायला हवा मात्र..........:खोखो:.
.
.
.मायबोली मधे अजुन एका कोंबड्याची भर पडली
आमच्या कॉलेजमधे पण एक मुलगा
आमच्या कॉलेजमधे पण एक मुलगा होता जो केस वरती फुगवाय्चा.. आम्ही त्याला तुर्रेवाला असं नाव ठेवलं होत!!
अभि.....................फोटो
अभि.....................फोटो टाकायला हवा मात्र.........
>>>>>>>>>>>
बस मित्रा याचीच वाट बघत होतो की ही फर्माईश कोण करते...
हॅप्पी थंडी >>> असे पण मेसेज
हॅप्पी थंडी >>> असे पण मेसेज असतात ?
>>>>>>>>>
थंडीचेच काय, गरमीचे , पावसाळ्याचे, वसंत बहार बरखा प्रत्येक ऋतूचे समस असतात आजकाल..
थंडीचा समस
आयुष्यात डोळे पुसणारे बरेच भेटतील,
पण नाक पुसणारं कोणी नाही,
म्हणून आपली काळजी घ्या... थंडी सुरू झालीय..
हॅपी थंडी..
उन्हाळी समस
गरमीचा सीजन सुरू झाला आहे.
घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल घ्यायला विसरू नका.
असे म्हणतात, भुसा लवकर पेट घेतो..
पावसाळी समस
पावसाळा सुरू झालाय,
घराबाहेर पडताना छत्री न्यायला विसरू नका
डोक्यावर प्लास्टीक टाकून त्याला कवर करा
तुम्हाला माहीतच असेल, खाली जागेत पाणी लवकर भरते.
वर्षू दी ... थँक्यू
वर्षू दी ... थँक्यू थँक्यू....
रिया... गेले दोन दिवस माझी बायको पण मला एक कोंबड्या म्हणूनच हाक मारतेय..
अंड्या... टाकलाय बघ वर फोटो... आता तो स्पाईक कट आहे की अभिषेक नाईक कट आहे हे तुझे तूच ठरव..
वा! कस्ली गर्दन आहे! गूड.
वा! कस्ली गर्दन आहे!
गूड. असाच व्यायाम करत जा. मग ते कट फिट अवांतर ठरतात.
हा हा हा...अभिषेक डोन्ट टेल
हा हा हा...अभिषेक डोन्ट टेल मी की हे वरच्या सगळ्या इनोदी समसचा कर्ता तूच आहेस ते ...
@ इब्लिसभाऊ, फोटो पढने मे
@ इब्लिसभाऊ,
फोटो पढने मे आपसे कुछ गलती हो गयी है, गर्दन कमानदार असू शकते, पण माझी शरीरयष्टी लुक्खीसुक्खीच आहे.
असो, कॉम्प्लिमेंटबद्दल धन्यवाद, आणि माझ्या लेखाबरोबर स्वछायाचित्रालाही प्रसिद्धी मिळवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मायबोलीचे आभार ..
@वेका,
इतर ठिकाणी खोटे खोटे हा म्हणालो असतो... पण हे सारे मोबाईलवर आलेले मेसेज आहेत ..