सुरक्षीत ड्रायव्हिंग व कार्स संबंधी इतर गोष्टी

Submitted by इब्लिस on 3 November, 2012 - 03:05

साजिरा यांच्या कोणती गाडी घ्यावी या धाग्यावर भुंगा यांनी त्यांना झालेल्या अपघाता विषयी लिहिले. त्यावरून सुरू झालेल्या चर्चेत सेफ्टी फीचर्स व सेफ ड्रायव्हिंगच्या संदर्भात मी खालील पोस्ट टाकली होती.

***
इब्लिस | 2 November, 2012 - 18:50
>>मधली लेन पासिंग लेन असते हेच ठाऊक नसतं<<

आर.टी.ओ. व कार डीलर्स /सर्व्हिस इंजि. ना बोलावून एकदा सेफ ड्रायव्हिंगवर वर्कशॉप अ‍ॅरेंज केला होता त्याची आठवण आली. तो कार्यक्रम फार लोकांना आवडलेला होता व उपयोगी आहे असा अभिप्राय भरपूर लोकांकडुन मिळाला होता.

यानिमित्ताने इथे चर्चा सुरू आहेच, तर एक सूचना करतो.

सेफ ड्रायव्हिंगवर एक धागा काढावा, व जाणकारांनी त्यात माहिती द्यावी.
यात,
१. रहदारीचे नियम.

२. गाडीच्या (मो.सा., चारचाकी) यांचे कोणते मेण्टेनन्स शिकून घेणे गरजेचे आहे? घरी काय काय करावे?
उदा. टायर बदलणे. ट्यूबलेसचे पंक्चर स्वतः काढता येतील अशा किट्स आजकाल मिळतात. कूलंट, पाणी, इंजिन ऑइल इ. कसे तपासावे?

३. हॉर्न/लाईट/इंडिकेटर्सचा वापर कसा करावा? (वळण्याची सूचना देण्यासाठी ऐवजी साईड देण्यासाठी इंडीकेटर आहे अशीही एक समजूत आढळते)

४. सोबत कागदपत्रे कोणती बाळगावीत. इन्शुरन्स कोणता चांगला? थर्ड पार्टी/कॉम्प्रिहेन्सिव्ह इ. थोडक्यात म्हणजे नुसती गाडी चालवणेच नाही, तर एक चांगला गाडीवान (च्याच्याकडे धन तो धनवान, या चालीवर) कसे व्हावे, याबद्दलचा बाफ निघाला तर उत्तम होईल.

५. याव्यतिरिक्त एक महत्वाचा विषय म्हणजे ड्रायव्हर नोकरीस ठेवणे. वेगवेगळ्या शहरात वेगळे पगार असतात. पण त्याला नोकरीस ठेवताना आपण काय काय चौकशा करणे गरजेचे असते? काहीवेळा आपली गाडी चालवून नेण्यासाठी अनुभवी व भरवशाचा माणुस टेंपररी बेसिसवर हवा असतो. तशा लोकांचे काही कॉण्टॅक्टस उपलब्ध असतील तर शेयर करणे इ. करता येईल.

६. इतर फुटकळ गोष्टी. जसे उन्हात रंग खराब होतो का? गाडीला अ‍ॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्या? कोणत्या टाळाव्या? इ.

बघा विचार करून लोकहो.

***
यास अनुसरून बर्‍याच माबोकरांनी वेगळा धागा सुरु केल्यास चांगले असे अनुमोदन दिले. म्हणून हा धागा सुरू करीत आहे.
आपले अनुभव / एक्पर्टाईज इथे कृपया शेयर करा.
धन्यवाद!
(यासंदर्भातले प्रतिसाद इकडे हलविले जातील असे हिम्सकूल यांनी सांगितले. संपादकांनाच ते करता येईल. तसे करावे ही विनंती. लेखन कुठे टाकावे ते समजत नव्हते, म्हणून तंत्र आणि मंत्र मधे समावेश केला आहे. कार्स संबंधी धाग्यांचा वेगळा ग्रूप केला तरी चालेलसे वाटते)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतीशय लक्षात ठेवण्याचे वाक्य :
>
आत्तापर्यंतचा research असे दाखवतो कि धडक झाल्यानंतरच्या impact energy मधली ७०% impact energy सीट बेल्टस dissipate करतात. त्यामुळे पुढच्या सीटवर असो वा मागच्या सीटवर सीट बेल्ट लावणे कधीही चांगलेच.
<
धन्यवाद दूर्योधन.

कारमध्ये ECU (electronic control unit) असतो, जो एअरबॅग उघडण्याचे कार्य करतो. तो कारच्या battery वर चालतो. कार जर बंद असेल (ignition off) तर ECU काम करणार नाही आणि एअरबॅग उघडणार नाही.

माझ्या गाडीत स्पेअर एयर बॅग उघडू नये म्हणून एक कुलुप आहे. ते बंद असल्यास (मी एकटाच गाडीत आहे असे गृहित धरून) फक्त एक स्टिअरींगची बॅग उघडेल अशी व्यवस्था आहे.

असे कुलुप पॅसेंजर असताना उघडायचे लक्षात ठेवावे, ही अजून एक सूचना.

घरातील सर्व लहान मुलांना गाडीचे दार नक्की कसे उघडायचे ते शिकवून त्यांचेकडून करवून घ्यावे.
त्यांना कधीही अन सुपरवाइज्ड गाडीत खेळू देऊ नये. अगदी दोन मिनिटासाठी देखील मुले, पेट्स गाडीत ठेवून काचा वर करून जाऊ नये.

माझ्या गाडीत स्पेअर एयर बॅग उघडू नये म्हणून एक कुलुप आहे. ते बंद असल्यास (मी एकटाच गाडीत आहे असे गृहित धरून) फक्त एक स्टिअरींगची बॅग उघडेल अशी व्यवस्था आहे.

असे कुलुप पॅसेंजर असताना उघडायचे लक्षात ठेवावे, ही अजून एक सूचना.

>>>

असे manually operated कुलुपही असते हे माहित नव्हते. साधारणतः passenger seat मध्ये असलेला weight sensor हे काम करतो.

अगो

तुम्ही क्रॅश टेस्ट सुचवताय ना ?
IS:11939/ECE-R-12 , ECE R95/AIS 99 या स्टॅण्डर्डस प्रमाणे टेस्टची सर्टिफिकेटस तुम्ही विचारू शकता. AIRI मध्ये टेस्ट फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. या टेस्टस कंपल्सरी आहेत किंवा कसं याबद्दल कल्पना नाही.

https://www.araiindia.com/facilities_safety_passive_safety.asp

ही लिंक कदाचित उपयोगी ठरेल.
http://www.rediff.com/money/2005/aug/23motoring.htm

ब-याचशा शेवर्ले इ. अमेरिकन आणि जर्मन कार्स फ्रंटल कोलिजन ( युरोपिअन रेगुलेशन्स / Euro NCAP ) प्रमाणे असतात. अजून तरी त्यांच्याकडे भारतीय रिक्वायर्मेंट प्रमाणे वेगळं मॉडेल आणि बाहेर वेगळं असा प्रकार नाही. भारतात ४० % क्रॅश टेस्ट चालते.

>>>५. याव्यतिरिक्त एक महत्वाचा विषय म्हणजे ड्रायव्हर नोकरीस ठेवणे. वेगवेगळ्या शहरात वेगळे पगार असतात. पण त्याला नोकरीस ठेवताना आपण काय काय चौकशा करणे गरजेचे असते? काहीवेळा आपली गाडी चालवून नेण्यासाठी अनुभवी व भरवशाचा माणुस टेंपररी बेसिसवर हवा असतो. तशा लोकांचे काही कॉण्टॅक्टस उपलब्ध असतील तर शेयर करणे इ. करता ये>>>>>

ही साईट चेक करा. बहुतेक ही सेवा दिल्ली/एन्सीआर मध्येच आहे बहुतेक.
http://www.driverbulao.com/default.aspx

महाराष्ट्रात PUC सर्टिफ़िकेट चे काय नियम आहेत ? नवीन गाडी साठी किती दिवसांनी / वर्षाने सर्टिफ़िकेट घ्यावे लागते ?

thanks Iblis & udyan ..

हुदाई I -१० नवीन गाडी जेव्हा घेतली तेव्हा त्यात १ sticker येतो ह्युंदाई - NON POLLUTING VEHICLE असे लिहिलेला. डीलर म्हणाला कि ६ महिन्यांनी तो गाडीवर लावा. त्या मुळे मी confuse होतो. पण शेवटी PUC करून टाकली. १०० रुपाये ची तर गोष्ट , उगाच रिस्क कशाला ?

Pages