सुरक्षीत ड्रायव्हिंग व कार्स संबंधी इतर गोष्टी

Submitted by इब्लिस on 3 November, 2012 - 03:05

साजिरा यांच्या कोणती गाडी घ्यावी या धाग्यावर भुंगा यांनी त्यांना झालेल्या अपघाता विषयी लिहिले. त्यावरून सुरू झालेल्या चर्चेत सेफ्टी फीचर्स व सेफ ड्रायव्हिंगच्या संदर्भात मी खालील पोस्ट टाकली होती.

***
इब्लिस | 2 November, 2012 - 18:50
>>मधली लेन पासिंग लेन असते हेच ठाऊक नसतं<<

आर.टी.ओ. व कार डीलर्स /सर्व्हिस इंजि. ना बोलावून एकदा सेफ ड्रायव्हिंगवर वर्कशॉप अ‍ॅरेंज केला होता त्याची आठवण आली. तो कार्यक्रम फार लोकांना आवडलेला होता व उपयोगी आहे असा अभिप्राय भरपूर लोकांकडुन मिळाला होता.

यानिमित्ताने इथे चर्चा सुरू आहेच, तर एक सूचना करतो.

सेफ ड्रायव्हिंगवर एक धागा काढावा, व जाणकारांनी त्यात माहिती द्यावी.
यात,
१. रहदारीचे नियम.

२. गाडीच्या (मो.सा., चारचाकी) यांचे कोणते मेण्टेनन्स शिकून घेणे गरजेचे आहे? घरी काय काय करावे?
उदा. टायर बदलणे. ट्यूबलेसचे पंक्चर स्वतः काढता येतील अशा किट्स आजकाल मिळतात. कूलंट, पाणी, इंजिन ऑइल इ. कसे तपासावे?

३. हॉर्न/लाईट/इंडिकेटर्सचा वापर कसा करावा? (वळण्याची सूचना देण्यासाठी ऐवजी साईड देण्यासाठी इंडीकेटर आहे अशीही एक समजूत आढळते)

४. सोबत कागदपत्रे कोणती बाळगावीत. इन्शुरन्स कोणता चांगला? थर्ड पार्टी/कॉम्प्रिहेन्सिव्ह इ. थोडक्यात म्हणजे नुसती गाडी चालवणेच नाही, तर एक चांगला गाडीवान (च्याच्याकडे धन तो धनवान, या चालीवर) कसे व्हावे, याबद्दलचा बाफ निघाला तर उत्तम होईल.

५. याव्यतिरिक्त एक महत्वाचा विषय म्हणजे ड्रायव्हर नोकरीस ठेवणे. वेगवेगळ्या शहरात वेगळे पगार असतात. पण त्याला नोकरीस ठेवताना आपण काय काय चौकशा करणे गरजेचे असते? काहीवेळा आपली गाडी चालवून नेण्यासाठी अनुभवी व भरवशाचा माणुस टेंपररी बेसिसवर हवा असतो. तशा लोकांचे काही कॉण्टॅक्टस उपलब्ध असतील तर शेयर करणे इ. करता येईल.

६. इतर फुटकळ गोष्टी. जसे उन्हात रंग खराब होतो का? गाडीला अ‍ॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्या? कोणत्या टाळाव्या? इ.

बघा विचार करून लोकहो.

***
यास अनुसरून बर्‍याच माबोकरांनी वेगळा धागा सुरु केल्यास चांगले असे अनुमोदन दिले. म्हणून हा धागा सुरू करीत आहे.
आपले अनुभव / एक्पर्टाईज इथे कृपया शेयर करा.
धन्यवाद!
(यासंदर्भातले प्रतिसाद इकडे हलविले जातील असे हिम्सकूल यांनी सांगितले. संपादकांनाच ते करता येईल. तसे करावे ही विनंती. लेखन कुठे टाकावे ते समजत नव्हते, म्हणून तंत्र आणि मंत्र मधे समावेश केला आहे. कार्स संबंधी धाग्यांचा वेगळा ग्रूप केला तरी चालेलसे वाटते)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंतर मी लिहितोय ते ह्या बाफवर न लिहिता मी वेगळा लेख लिहिणार होतो. गेल्या महिनाभर हे लिहून न पोस्ट् करता पडून आहे. कारण त्या लेखाचे टायटल मी आय हेट दीज बास्टर्डस ! हे दिले होते. ते सर्व इथे टाकतो कारण ते पण "सुरक्षित ड्रायव्हिंग" संबंधी आहे पण हे रूल नाहीत.

आय हेट दीज बास्टर्डस !

१. जेंव्हा रस्त्याच्या उलट बाजूने लोकं कार, टू व्हिलर आणि ट्रक चालवत असतात.

२. जेंव्हा सिग्नल सुटायला अजूनही ६ सेंकद अवधी असतो पण तरी हे लोक सरळ गाडी चालवतात.

३. जेंव्हा दोन गाड्यांच्या मध्ये केवळ एखाद फूट असताना, एखादा टू व्हिलर वाला गाडी आडवी करून तिथून पुढे जातो तेंव्हा.

४. जेंव्हा सिग्नल सुरू होत आहे पण झाला नाही, अशा वेळेला पाठीमागून जोरजोरात हॉर्न वाजवून समोरच्या माणसांना विनाकारण अपराधी ठरवाणारे महाभाग.

५. सिग्नल सुरू झाला तुम्ही सरळ जाणार असता, उजव्या लाईनीतले लोक उजवीकडे वळतात पण अचानक तुमच्या डाव्या बाजूने एखादी गाडी अचानक ९० अंशात वळून तुमच्या उजवीकडे वळते तेंव्हा.

६. लाल दिवा लागलाय, किंवा खोळंबलेल्या ट्रॅफिक मुळे तुम्ही थांबलात, आणि अचानक एखादा टू व्हिलर वाला गाडी वळवून वळवून आणून पुढे जायचा प्रयत्न करतो. जणू काही तेवढी "रियल इस्टेट" वाया चालली आहे.

७. ब्रिज वरून पण उलट्या दिशेने येऊन तुम्हालाच "लाईट दाखवतात" तेंव्हा. (हिंजवडी फ्लायओव्हर)

८. गाडी चालवत असताना फोन वर बोलतात तेंव्हा.

९ फास्ट लेन मध्ये कासवाच्या गतीने गाडी चालवून देखील इतरांना साईड न देणारे महाभाग भेटतात तेंव्हा.

१०. उजवीकडे वळणारा सिग्नल लागलाय, तुम्ही गाडी वळवताय, तोच पायी रस्ता क्रॉस करणार्‍यांना अचानक आठवण येते की लाल दिवा (त्यांना) असतानाच रस्ता क्रॉस करायचा.

११. बाईक आणि कार वाले रस्ता मोकळा असतानाही विनाकारण हॉर्न वाजवत जातात. त्यांच्या अंगठ्याच्या सवयीचा परिणाम ..

१२ दोन लाईन मध्ये दोन वेगवेगळ्या कार्स असताना, अचानक तिसरी छोटी कार तुमच्या सोबत धावू लागते. कारण ती दोन लाईन्सच्या मधून धावते तेंव्हा.

१३. ओव्हर टेक करू देत नाहीत तेंव्हा.

१४ कमी वेगात गाडी चालवता चालवता अचानक दरवाजा उघडून पचकन बाहेर थुंकतात तेंव्हा.

१५ ट्रॅफिक जाम आहे, पण आपली गाडी कुठूनही, कशीही सर्व जॅमच्या आधीच निघाली पाहिजे असे समजून चालविणारे.

१६. रेल्वे सिग्नलला उलट बाजूने लवकर जाता यावं असा विचार करून गर्दी करणार्‍यांना. मग तो ट्रॅफिक जाम गरज नसताना १५ मिनिटे घालवून जातो.

१७ रस्ता केवळ आपल्याच नाही तर इतरांच्याही बापाचा आहे असे मानणार्‍या सर्वाचा.

this is experienced by everybody. I could not understand why is it here. I think to give suggetions is purpose of this thread.

मला एक बेसिक प्रश्न आहे. रात्रीच्या वेळी गाडी चालवताना लो बीम / हाय बीम या बद्दल काही नियम आहेत का?

आनंदयात्रीजी,

१. अप्पर (हाय बीम) लाईट हायवेवर साधारणत: समोरचा रस्ता दूरवर दिसावा यासाठी वापरात येतो. समोरून वाहन येत नसेल अशावेळी आपण हाय बीम सुरू ठेवावा. समोरचे वाहन दिव्याच्या टप्प्यात आल्यास दोघांनीही लो बीम वापरावा असा संकेत आहे. (जो कुणी पाळताना दिसत नाही. ट्रकवाले मात्र बर्‍यचदा हा नियम नीट पाळतात)
२. शहरात जिथे स्ट्रीट लाईट आहेत, तिथे लोअर बीम (डिपर) वापरावा, अथवा पार्किंग व 'फॉग लाईट' वापरून गाडी चालवावी असाही एक संकेत आहे.
३. रस्ता ४ लेन चा असेल व मधे झाडे अथवा प्लॅस्टिकचे टे.टे. बॅट सारखे बॅरियर्स तयार केलेले असतील तर हे हाय लो करणे गरजेचे नाही, कारण समोरच्या माणसास आपल्या व आपल्याला त्याचा त्रास होत नाही.
४. आळीपाळीने अप्पर-डिपर करीत आपल्याच दिशेने जाणार्‍या वाहनास रात्री पुढे जाण्याची परवानगी विचारली जाते. हेच दिवसाही करता येते, किंवा हॉर्न वाजविला जातो.(रात्री शक्यतो हॉर्न टाळायचा असतो) यावेळी लाईटस्विच (सामान्यत:) वर स्टिअरिंगकडे खेचायचा असतो. यामुळे लाईटचे दोन्ही पॉईंट्स एकाच वेळी पेटतात, हा बीम नॉर्मल अप्पर पेक्षा जास्त पॉवरफुल असतो.
५. एकदा साईड मिळाल्यावर पूर्ण अप्पर बीम सुरु करून वाहन पार करून जावे. परत आपल्या लेन मधे आल्याशिवाय बीम डिपर करू नये. हा ४ लेन व साध्या दोन्ही रस्त्यांकरिता संकेत आहे.
६. ओव्हरटेक करताना समोरून येणार्‍या वाहनाने डोळे वटारले, किंवा सारखे लहान मोठे केले, तर ओव्हरटेक करताना विचार करावा. ती धोक्याची सूचना असते, व ओव्हरटेक करू नकोस असे सांगितलेले असते. (याचा ही मूर्खपणे गैरवापर हायवेवर चालणारे मोटारसायकलवाले करतात, त्यामुळे याही संकेताचा उपयोग नीटसा होताना दिसत नाही)

बेसिकली, आपल्याला व समोरून येणार्‍यालाही त्रास न होता रस्ता नीट दिसावा हा उद्देश पाळला तर अडचण येऊ नये.

***

धन्यवाद @ सामोपचार.

'लेनची शिस्त पाळा' म्हणजे नक्की काय? मुंबई-पुणे द्रुगती महामार्गावरुन जाताना अश्या पाट्या वाचायला मिळतात.

धन्यवाद इब्लिस!
हे नियम आठवत होते, पण यातलं काहीही न पाळणारे कारवाले दिसले की टाळकं नेहमी सटकतं. आणि कुणालाच माहित कसं नाही यावरून आश्चर्य आणि चिडचिड! शहरामध्ये फुल्ल स्ट्रीट लाईटमध्येही कंप्प्लीट अपर लावून लोकं कार आणि बाईक चालवतात, डोळ्यांना ज्जाम त्रास होतो. याबद्दल अवेअरनेस साठी काही करता येईल का?

आनंदयात्रीजी,

धाग्याच्या प्रस्तावातच मी म्हटल्याप्रमाणे आम्ही जनरल पब्लिकसाठी अवेअरनेस वर्कशॉप घेतला होता. तसे आपापल्या भागातील मित्रमंडळांस भरीस घालून घेता आलेत तर सुंदर होईल. (लायन्स रोटरी इ. वाल्या रिकामटेकड्यांच्या गळ्यात मारायला हा एक चांगला उद्योग आहे. मेंब्रांच्या ड्रायवर लोकांसाठी असा वर्कशॉप विथ डोळे तपासणी वै करायला सांगता येईल ;))

गणेशोत्सवात या नियमांची किमाण फ्लेक्स वर पोस्टर्स करून लावायची आयडीया परिसरातील भाऊ/दादा लोकांच्या गळी मारता आली तर बघा. बहुतेक गावांतून गणेशोत्सव आरास स्पर्धा असतात, त्यात असे समाजप्रबोधनपर काही करता आले तर मुन्सिपाल्टीचे बक्षिस वगैरे मिळते Wink हे सांगितले तर फायदा होतो.

शिवाय मायबोलीच्या ११ लाख वाचकांपैकी नुसते वाचून १.१ लाखांचा तरी अवेअरनेस वाढेलच ना?

लेनची शिस्त पाळा अशा पोस्टरसोबत नक्की ती शिस्त काय असते याचा बोर्ड त्या हायवेच्या सगळ्या फूड मॉल्स मधे लावता आला तर? कुणाचे काही कॉण्टॅक्ट्स असतील तर पहा ना वापरून?

केदार | 5 November, 2012 - 20:07>>>> केदार, ह्या लोकांना मी शक्य तेतक्या वेळा गाडी थांबवुन ते चुकिचे करताहेत आणि यांच्याबरोबर जर असे झाले तर ते सुध्हा मरु शकतात हे सांगतो. अतिशय 'विनम्र'पणे. ९० % लोक तरी एकुन घेतात बाकिचे #######.

आणि आमच्याकडे अजुन थोडी लिस्ट आहे ती लवकरच अ‍ॅड करतो.

हाय बीमवर गाडी चालवायचं प्रमाण हल्ली खूप वाढलय का? मला पूर्वी कधी त्रास झाल्याचं आठवत नाही पण गेल्या ८-१० महिन्यांत काही काही वेळा समोरच्या गाड्यांच्या हाय बीमचा फार त्रास झाला.. ! मुख्यतः गावात..
अमेरिकेत ह्याबद्दल खूप कडक नियम (आणि अंमलबजावणी) आहेत. आपल्याकडे लोकांना आपण हाय बीमवर गाडी चालवतो आहे हे लक्षातही येत नाही कधी कधी.. !

आपल्याकडे लोकांना आपण हाय बीमवर गाडी चालवतो आहे हे लक्षातही येत नाही कधी कधी.. ! <<
कधी कधी नाही कायमच.

हाय बीमवर गाडी चालवतो आहे हे लक्षातही येत नाही
>> मुद्दाम सुरु ठेवतात अरेच लोक..

आणि ते फॉग लाईट कशाला सुरु असतात काही कळत नाही.... Proud

मी चार चाकी चालवायला शिकुन रीतसर लायसेन्स काढुन घेतलं.. तेव्हा प्रॅक्टिस असल्याने फायनल ट्रायल देताना काही प्रॉब्लेम आला नाही.. पण आता परत प्रॅक्टीस करायची म्हटलं तर गाडी मधेच बंद पडणे वगैरे प्रकार होण्याची जास्त शक्यता आहे. तर पर्मनन्ट लायसेन्स असतानादेखील मी गाडीवर "एल" लावुन काही दिवस गाडी चालवु शकते का जेणेकरुन बाकीच्यांना चालक अजुन शिकत आहे असा संदेश जाइल.. की असं करणं चुकीचं आहे?

पर्मनन्ट लायसेन्स असतानादेखील मी गाडीवर "एल" लावुन काही दिवस गाडी चालवु शकते का > नक्कीच. ते सगळ्यांच्या फायद्याचे आहे. Happy

हाय बिमचा सगळ्यात जास्त त्रास मुरबाड ते कल्याण रोड वर होतो. दोन बाईक वाले एकाच वेळी चक्क दोन्ही बाजूने ओव्हरटेक करतात. Uhoh

छानच धागा आहे हा.

केदारच्या नोवेंबरच्या पोस्टला पुर्ण अनुमोदन. यामधे एक दोन पॉइंट अ‍ॅड करावेसे वाटतात -

>> गाड्यांचा हिरवा सिग्नल असताना रस्ता क्रॉस करणारे मुर्ख. यांना एक एक टाइट स्लॅपची गरज आहे.

>> गाडीमधे कॉफी, मिल्कशेक, लेज खावुन्/पिवुन प्लॅस्टिक चालत्या गाडीतुन बाहेर फेकणारे मुर्ख.

हाय बिम लो बिम सारखे हॉर्नचे काही नियम आहेत का? Uhoh

रस्त्यातून कर्णकर्क्कश्श हॉर्न वाजवत जातात काही लोक. माझे स्वतःचे कित्येक वेळेला अशाने लक्ष विचलित झाले आहे. असे हॉर्न ऐकून इतर वाहन चालवणार्‍या व्यक्ती, व्यवस्थितपणे रस्ता क्रॉस करणारे वृद्ध वगैरे यांचे लक्ष विचलित होऊन अपघात झाला तर कोण जबाबदार? Sad
पण हॉर्न वाजवत वाट्टेल तशा गाड्या चालवणे लोकांना थ्रिल वाटते. नॉट ओन्ली दॅट एकदा मी रस्ता क्रॉस करताना एका गाडीवरून ३ जण जात होते, एक तर रेड सिग्नल होता, मी व्यवस्थित झेक्रॉवरून जात होते, सिग्नल तोडून माझ्यासमोरून झुप्पकन निघून जाताना हे तिघेही बेंबीच्या देठापासून ओरडले, मी जे दचललेय.. त्याचं नाव तेच. अशांचे परवानेच काढून घ्यायला हवेत. Angry

१५ ऑगस्ट २०११, वर्षुनील गटग. मी सकाळी रेड सिग्नलला उभी असताना मागुन एक छोटा ट्रक आला आणि त्याचे म्हणे ब्रेक्स फेल झाले. माझ्या कारची डावी बाजु पुर्ण घासत, दरवाजाची वाट लावत तो थांबला. कारच्या एवढ्याशा घासण्यामुळे तो कसा काय थांबु शकला? मी इन्सिस्ट केलं तरीही ट्रॅफिक पोलिसनेच 'मिटवुन टाका' अशी भुमिका घेतली. अशा वेळी काय करायचं?

अजुन एक गोष्ट, म्हातारी माणसे रस्ता क्रॉस करताना हात वर करुन गाडीकडे न पाहता सरळ रस्ता क्रॉस करतात. आता हात वर करुन गाडीला थांबण्याचा इशारा देतात ते ठिक आहे पण गाडी किती दुर आहे ते नको पाहायला? ५०-६० च्या वेगावर असलेली गाडी अचानक समोर म्हातारा हात वर करुन उभा आहे म्हणुन जागच्याजागी थांबणार नाही, थोडी पुढे जाऊनच थांबेल, त्यापेक्षा जास्त स्पिड असेल तर.... आणि अशा गाडीचा जर त्या म्हाता-याला धक्का लागला तर चुक कोणाची?? अर्थातच गाडी चालवणा-याची Angry

हाय बिमचा इतका त्रास होतो.... मुंबईच्या रस्त्यांवर इतका चकचकाट असतो की हेडलाईट न लावता नुसते डिपर लावले तरी चालु शकते. गाडीच्या दिव्यांचा रस्ता पाहण्यासाठी उपयोग करायची गरज नसते, रस्त्यावर भरपुर प्रकाश असतो. पण लोक हाय बिम, आणि तेही गाडी जेवढी भारी तेवढ्या जास्त शक्तीचे हॅलोजन लॅम्पस लावुन समोरच्याला ठार आंधळे करतात. आणि त्याच वेळी जिथे थोडाफार काळोख असतो अशा जागी टु व्हिलरवाले चक्क दिवे बंद करुन गाडी चालवतात... Happy ही सिद्धी त्यांना कशी काय प्राप्त होते माहित नाही, पण मी खुपदा असे लोक पाहिलेत जे विजेचा अनावश्यक वापर टाळतात आणि समोरच्या गाडीवाल्यावर आफत आणतात.

अशांचे परवानेच काढून घ्यायला हवेत.
<< त्यांच्याकडे परवाने असतील अस वाटते का? Sad

**
मी इन्सिस्ट केलं तरीही ट्रॅफिक पोलिसनेच 'मिटवुन टाका' अशी भुमिका घेतली. अशा वेळी काय करायचं?
<<
मोबाईलने आपली व त्याच्या गाडीचा फोटो काढून ठेवायचा. ट्रॅफिकपोलिसाचाही फोटो घ्यायचा, नाव, बक्कल नं विचारायचे. माझ्या गाडीच्या इन्शुरन्स साठी हवंय सांगायचं.

ह्म्म. तेव्हा अचानक बसलेल्या धडकेने आणि नंतर गाडीच्या झालेल्या अवस्थेमुळे इतका धक्का बसला कि काही सुचलंच नाही. पोलिसने ड्रायवरला कॉम्पेनसेशन दे सांगितल्यावर त्याने ' मी गरीब माणुस आहे. पैसे नाही. अंगठी घ्या' वगैरे नाटक चालु केल्यावर मला दयाही आली. शिवाय लोक उभे राहुन बघत होते त्यामुळे ट्रॅफिक जॅमही व्हायला लागलं होतं. त्यामुळे माझी चुक नसताना मी एवढी एम्बॅरॅस्ड होते कि सगळं लवकर संपवुन मी पटकन कारमधे जावुन कधी लपते असं झालं होतं. फक्त मी खात्री केली कि पोलिसने ट्रकला माझ्याआधी जावुन दिलं. नाही तर मी गेल्यावर त्यानेच पैसे/अंगठी खिशात घातली असती.

फोटोजचं मात्र लक्षात यायला हवं होतं. माझीच चुक आहे.

'आनंद अभ्यंकर' यांच्यासोबत झालेल्या अपघातात ज्याला आपण गमावले असा गुणी कलाकार 'अक्षय पेंडसे' याचा लहान भाऊ 'तन्मय पेंडसे' हा "Movement Against Road Accidents" सुरु करतो आहे. ज्यांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी त्याला संपर्क करावा:

Tanmay Pendse
9604389735
naturecubs@gmail.com

atta exprs hwy la 3 shalakari pore eka scooter varun chalali aahet. Punyala wakad nantar davikade valun jo hwy suru hoto tithe 2 wheeler allowed nahi, tyat he triple seat ani shalkari mhanaje nakkich without license.... madhalya lane madhe jat hote. He kiti dangerous aahe!
mi aaj svatachya gadit nahiye tyamule thambun hataku shakale nahi. Amachi gadi barich pudhe aali. I hope evhana tya poranna pakadale asel. Pan hi ashi vrutti kiti jananche jeev dhokyat ghalu shakate.

सगळ्यांचीच माहिती छान आहे.
एअर बॅग बद्दल : नुकतच मी एअर बॅग संबंधी फिल्मस पाहिल्या. त्यात जर सिटबेल्ट लावला नसेल तर एअर बॅगचा काहिच उपयोग नाही उलट जास्त इंजुरी होते असं दाखवलं होतं. कारण बेल्ट लावला नसेल तर माणूस बॅगवरच आपटेल असं नाही आणि बॅग वरच गेला तरी बेल्ट नसल्याने ज्या स्पिडनी माणूस पुढे आपटतो त्याच किवा जास्त स्पिडनी मागे फेकला जातो त्यावेळी डोकं हेड रेस्टवर आपटतं किंवा बाजुला जातं व मणका डॅमेज होतो.

Pages