स्कायफॉल अन शुन्य शुन्य सात

Submitted by रोहित ..एक मावळा on 1 November, 2012 - 13:23

मामा उर्फ मायबोलीकर मावळे तुमच्यासमोर पुन्हा घेऊन येत आहेत ... स्कायफॉल अन शुन्य शुन्य सात..

जेम्सराव बॉंड सह्याद्रीच्या डोंगरात काय करतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच..
तर काय झाल .. हालीवुडच्या बाँड्याला कुणकण लागली की सह्याद्रीच्या एका गडावर खजिना लपवुन ठेवलाय.. त्याच्या शोधात तो निघाला. आजोबाच्या माथ्यावर त्याच्या चॉप्टरचे लँडिग झाले.तेथुन त्याने दुर्बिण लावली अन रतनदुर्गाला न्याहळु लागला. पण त्याला काही खजिना दिसला नाही.पण त्याच्याआधी सात उडीपुरकरांची गँग तेथे पोहोचली होती. उडीपुरकरांच्या उडया बघुन मात्र बाँड्या चाट पडला.त्याच्याजवळची हत्यारे त्याला खेळणी वाटु लागली होती. मग काय बाँड्याने उडीपुरकरांना उड्या शिकण्याकरता गळ घातली.त्याच्या नव्या स्कायफॉल सिनेमासाठी मायबोलीकर उडीपुरकरांनी बाँड्याला उड्यांचे प्रशिक्षण दिले.

प्रचि १. यो

प्रचि २. रो

प्रचि ३. गिरि

प्रचि ४. पुन्हा यो

प्रचि ५. नविन

प्रचि ६ डेविल

प्रचि ७ रो

प्रचि ८

प्रचि ९ नविन

प्रचि १० यो ची खुटा उडी ..

उडीपुरकरांच्या उड्या बघुन जेम्सराव बाँड्या भलताच खुश झाला.
आगामी स्कायफॉलमध्ये बाँड्या अशा उड्या मारताना दिसला तर उडिपुरकरांना मात्र विसरु नका.
काय .. बरोबर ना....
पुन्हा भेटुया ... Happy
प्रचि ११

तळटिप : ( फोटु ... यो ,रो अन इंद्राच्या कॅमेरातुन )

आधीचे उड्रांत येथे पाहु शकता.
उड उड के देख जरा उड उड के
गँग ऑफ उडीपुरकर्स...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सह्ही रे....
त्या बांड्याला काय जमाव्यात अशा उड्या मारायला? त्याच्या नशिबात कुठला आलाय सह्याद्री? Happy

जेम्सराव बॉंड सह्याद्रीच्या डोंगरात.....
समोर एक डुक्कर...

जेम्स - आय अ‍ॅम बाँड, जेम्स बाँड...

डुक्कर - आय अ‍ॅम डुक्कर, रान डुक्कर....

(सध्या आंतरजालावर फिरणारा पेशल मर्‍हाठ्ठी इनोद....)

अवांतर - भारी फोटु......

रोएमा,

०७, ०८ आणि १० झक्कपैकी जमल्यात! कल्पना मोप आवडली. Happy पण अनोश्यापोटी एव्हढा व्यायाम बघवत नाही. भज्ज्या, कटिंग, बटाटेवडे वगैरे दिसले नाहीत! तेव्हढीच भूक भागली असती! Proud

आ.न.,
-गा.पै.

मस्तच !!
<< इतक्या उड्या मारुन पॅन्ट फाटत नाही का ? >> जळत्या जहाजावरून उडी मारून समुद्रातून पोहून आला तरी बाँड्याच्या सूटाची इस्त्री पण नाही बिघडत !! Wink