मामा उर्फ मायबोलीकर मावळे आपल्यासमोर घेऊन येत आहेत .... उड उड के देख जरा उड उड के..
निर्माता :- स्वखर्चाने...
दिग्दर्शक :- आपल्या कर्माने .....
छायाचित्रण :- आलटुन पालटुन ...
कलाकार :- उड्या मार तान कर उर्फ यो रॉक्स , न्यु वन उर्फ नविन आणि रो वन ... उर्फ रोहित.
तर कहानी अशी आहे की बर्याच दिवसापासुन एक प्रख्यात उड्यामार'खोर' डोंगरात धुमाकळ घालतोय.त्याच्या उड्यांनी दर्याखोर्यात दहशत पसरलेय.म्हणुन त्याचा बंदोबस्त करण्यासाठी दोन कॅमेराशुटर नेमलेत.नुकतीच खबर्याकडुन आलेल्या माहितीनुसार तो उड्यामारखोर शहरातुन उड्या मारण्यासाठी माळशेज प्रांतातल्या सिंडोळाच्या डोंगरात गेलाय.त्याला कॅमेरात कैद करण्यासाठी न्यु रो रवाना झालेत.
उड्या मारखोर सारख्या उड्या मारता याव्यात म्हणुन न्यु अन रो ची ट्रेंनिग झाली आहे.
न्यु

रो

अरे वा जमतायत उड्या ... पण तो उड्या मार तान कर कुठे हाय ...
सापडला .... बघा कसा झाडाला लटकलाय तो उड्यामार खोर ...

पळायचा प्रयत्न करु नकोस ....

या उडी पाँईट वरुन सटकला पण पुढे भेटेलेच तो....
थोडा आराम करुन न्यु रो पुढे रवाना झाले...
अन एका बेसावध क्षणी न्यु वर त्या उड्यामार खोराने हल्ला चढविला.

चवताळलेला न्यु ....

मग काय .. न्यु अन उड्या मार तानकर यांच्यात तुंबळ युध्द जुंपले.
ए ढिश्शुम ...

ढिश्शुम.....

कधी उड्यामार खोर भारी ....

तर कधी न्यु ...

एका टप्प्यावर न्यु ला वर्मी घाव लागला.

मग रो वन त्याच्या मागे लागला...
हवेतली पळापळ सुरु झाली.

उड्या खोराच्या उड्याचे उत्तर रो ने उड्यांनी दिले.


पण उड्यामार खोर तो उड्यामार खोर ...

अरे पण हे काय कहाणीला नव वळण ....
न्यु वन अन रो वन सुद्धा उड्या मार तानकर ला सामिल झाले. आता ते एकत्र मिळुन डोंगरात जाऊन उड्या मारतात.

आता तर प्रत्येक उडीमारखोराने आपआपली स्वाक्षरी अदा निर्माण केली आहे.
न्यु वन उर्फ नविनची हनुमान उडी ...

उड्या मार तान कर उर्फ यो रॉक्स ची यो स्पेशल ...

रो वन उर्फ रोहित ची गरुड झेप ....

टिप :
१) कहानीतील पात्र काल्पनिक नसुन जिवंत आहेत अन त्याचा वास्तविक जीवनाशी संबध आहे.
२) कृपया उड्या अन फायटींग स्टंट घरी करण्याचा प्रयत्न करु नये.
उड्या मारायच्याच असतील तर आमच्याबरोबर ट्रेकला या.
घाबरु नका .. पिक्चर संपला नाही अजुन मित्रांनो ... बाकीचा वृतांत यो लिव्हलच... (सिंदोळा)
आणि हो अजुन एक आपला उड्या मारतान कर उर्फ यो लवकरच उड्यांच्या दुनियेतुन वेगळ्याच दुनियेत कैद होणार आहे त्यासाठी सर्वांनी दोन मिनिटे जागेवर उड्या माराव्यात.
रोहीता.... _/\_ आतापर्यंतचा
रोहीता.... _/\_

आतापर्यंतचा बेस्ट उडी- सोहळा होता.. सुपर्ब स्टोरी बनवली आहेस.. फुल ऑन
जल्ला 'शेवट' पण लै भारी..
झक्कास!!!!!!!!!!! फुल टू
झक्कास!!!!!!!!!!! फुल टू धम्माल फोटुज आहेत

बापरे काय खतरनाक उड्या आहेत.
बापरे काय खतरनाक उड्या आहेत. सांभाळून उड्या मारा रे बाबांनो.
खलास.. खलास्..खलास... जबरदस्त
खलास.. खलास्..खलास...
जबरदस्त कलाकारी...
यो रॉक्स चे नाव आता यो (जम्पींग) ऑन द रॉक्स असे करावे....
योगेशने आत्तापर्यंत एवढ्या उड्या मारल्या असतील की तेवढ्या उड्या त्याने ऑलम्पीकला मारल्या तर गोल्ड मेडल नक्की घेऊन येईल...
सगळे फोटो अफलातून... (उड्याच जर एवढ्या मारल्यात तर ट्रेक तरी कधी केलात)
यो आता रोहीतच्या स्टोरीला वृत्तांताची फोडणी दे..
ज ह ब ह र !! ए उडी उडी... !!
ज ह ब ह र !!
ए उडी उडी... !!
हिर्वीण_कुठे?
हिर्वीण_कुठे?
झक्कास रे..! मला एवढ्या
झक्कास रे..! मला एवढ्या मोठ्या उड्या नाही येत पण तुमच्याबरोबर ट्रेक करायला पाहीजे...
बाकी शेपटीवाले पण अचंबीत झाले असतील नाही
रोम, सह्हीच रे आत्तापर्यंत
रोम, सह्हीच रे
आत्तापर्यंत एवढ्या उड्या मारल्या असतील की तेवढ्या उड्या त्याने ऑलम्पीकला मारल्या तर गोल्ड मेडल नक्की घेऊन येईल... >>>>>>+१
बाकी शेपटीवाले पण अचंबीत झाले
बाकी शेपटीवाले पण अचंबीत झाले असतील नाही >>
असे ?
उड्या, फोटो आणि कॉमेंट्स - सर्वच भन्नाट........
लई भारी राव.....
कल्ला!!! सगळेच जंपिंग जॅक्स
कल्ला!!!
सगळेच जंपिंग जॅक्स
काही उड्या खरच खतरी
काही उड्या खरच खतरी दिसताहेत...
बाकी सुरुवातीपासुन शेवटपर्यंत खिळवुन ठेवलं.. एकही उडी, कमेंट बोर झाली नाही...
मस्तच
मस्तच
मस्त उ ड्रां त
मस्त उ ड्रां त
उ ड्रां त >>>>
उ ड्रां त >>>>:फिदी:
लई भारी....
लई भारी....
खूपदा प्रयत्न केला, पण
खूपदा प्रयत्न केला, पण पहिल्या फोटोशिवाय बाकी फोटो दिसलेच नाहीत. धमालच केलेली असणार ! फोटो न दिसल्यामुळे हळहळणारा बाहुला!
यो, रो, न्यु वन गेलात उडत..!
यो, रो, न्यु वन गेलात उडत..!
माय बोलीवुड
सॉलिड
सॉलिड
मुजरा सरकार !!! ग्रेट आहातच
मुजरा सरकार !!!
ग्रेट आहातच सगळेच...............
लई भारी!
लई भारी!
आज डार्विन ची थिअरी पुन्हा
आज डार्विन ची थिअरी पुन्हा एकदा जोमाने सिद्ध केली रे तुम्ही सर्वांनी
गग्र्रेट आहात ..
@ यो- 'वेगळ्याच दुनियेत कैद''.. ? त्या दुनियेतून उडी मारून सटकायचा प्रयत्न करू नकोस हां
सही. एकुणातच धमाल केलेली
सही. एकुणातच धमाल केलेली दिसतेय.
त्या दुनियेतून उडी मारून
त्या दुनियेतून उडी मारून सटकायचा प्रयत्न करू नकोस हां>>>>>चान्सच नाही
पुरता गुरफटलांय त्यात. 
स्टनिंग क्लिक्स ! यो, तू
स्टनिंग क्लिक्स !
यो, तू स्प्रिंगवाले बुट घालतो का रे बाबा ?
उडी बाबा!! धम्माल!
उडी बाबा!! धम्माल!
@ यो- 'वेगळ्याच दुनियेत
@ यो- 'वेगळ्याच दुनियेत कैद''.. ? त्या दुनियेतून उडी मारून सटकायचा प्रयत्न करू नकोस हां >>
नुकत्याच आलेल्या खबरीनुसार उड्या मार तान च्या घरच्या फॅमिली कोर्टाने त्याला कायमची जन्मठेप सुनावली आहे

... त्यामुळे त्याची सुटका नाही ...
मस्त मस्त मस्तच.. आणि हो
मस्त मस्त मस्तच..
आणि हो अजुन एक आपला उड्या मारतान कर उर्फ यो लवकरच उड्यांच्या दुनियेतुन वेगळ्याच दुनियेत कैद होणार आहे त्यासाठी सर्वांनी दोन मिनिटे जागेवर उड्या माराव्यात.... :ड :ड
(No subject)
हा घ्या झब्बु .... एक नविन
हा घ्या झब्बु .... एक नविन उडीमार खोर



(No subject)
Pages