डेंगीरोगाची खबरदारी

Submitted by हरिहर on 1 November, 2012 - 12:30

महाराष्ट्र सरकारने कालच प्रकाशित केलेली "डेंगीरोगाची खबरदारी' यासंदर्भात जाहिरात वाचण्यात आली. त्यामध्ये असे म्हटलेले आहे की, डेंगीचा मादी डास स्वच्छ पाण्यात अंडी घालत असल्यामुळे या डासाची उत्पत्ती रोखण्यासाठी लोकांनी दर दहा दिवसांनी साठवलेल्या पाण्याचा निचरा करावा. त्याचप्रमाणे तेथे अन्य काही बाबींचे मार्गदर्शन केलेले आहे. ते सर्व ठीक आहे. पण येथे मला एक शंका आहे की, हा डास चावल्यामुळे डेंगी होतो की डेंगी झालेल्याला डास चावल्यानंतर तो दुसऱ्याला चावल्यावर त्याला डेंगी होतो. जर दुसरी शक्यता जर असेल ही साथ चालू असताना ताप आलेल्या व्यक्तीला डास चावणार नाही ह्याची मुख्य खबरदारी घेतली पाहिजे. त्या अनुषंगाने लोकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे असे मला वाटते.विद्वान मायबोलीकर ह्याविषयी आपले मतप्रदर्शन व मार्गदर्शन करतीलच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर दुसरी शक्यता जर असेल ही साथ चालू असताना ताप आलेल्या व्यक्तीला डास चावणार नाही ह्याची मुख्य खबरदारी घेतली पाहिजे.

हरिहराण्णा, व्यक्तीला डास चावू नये साठी जास्तीत जास्त काय करु शकता?? रात्री मच्चरदाणी लावणे, खिडकीला जाळी लावणे किंवा कछुआ लावणे... पण दिवसा दारे खिडक्या उघडी असताना किंवा रस्त्यावर फिरताना हे संरक्षण उपयोगी ठरेल का? शिवाय या सर्व गोष्टी ज्याने त्याने स्वखर्चाने करायच्या असतात, त्यामुळे यात सरकारने मुद्दाम सांगावे असे काही नाही. ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार/ गरजेनुसार हे करावे.

सामाजिक सुरक्षितता म्हणून डास नष्ट करणे, हेही महत्वाचे . त्यासाठी ड्राय डे पाळायचा असतो.