रान...

Submitted by पुरंदरे शशांक on 1 November, 2012 - 00:16

रान...

रान मनात वसलं
पान पान तरारलं
रंग हिरवा लेऊन
सारं काळीज दाटलं

काळी भुई होती साधी
जरा बरड बरड
थेंब येता अवकाळी
कोंब उगवलं ग्वाड

निरखितो मीच मला
जरा दुरुन दुरुन
तण माजता माजता
घेतो जरा खुरपून

उन्हा वार्‍याचा तो जोर
देतो जोम जगण्यास
हिरवाई जपताना
उगा मानावा का त्रास....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक, आज पहिल्यांदाच बालगीत सोडुन वेगळी कविता लिहिलीत तुम्ही (किंवा पुर्वीच्या कविता मी वाचल्या नसतील). ही सुद्धा फार सुंदर जमली आहे. आवडली.

निरखितो मीच मला
जरा दुरुन दुरुन
तण माजता माजता
घेतो जरा खुरपून

हा ध्यानयोग आहे बर !

निरखितो मीच मला
जरा दुरुन दुरुन
तण माजता माजता
घेतो जरा खुरपून

खुपच छान ओळी....
शेतात जसं लागवड न करताही तण उगवतं....उगवतं कसं हेही समजत नाही....... नंतर वाढत जातं.... तेही मुख्य पिकापेक्षा जोराने......
तसच माणसाच्या मनाचं आहे......

अमेलिया, मनिमाऊ, शाम, विक्रांत, श्यामराव, वैवकु - सर्वांचे मनापासून आभार.

हा ध्यानयोग आहे बर ! >>> विक्रांत - खरी गोष्ट आहे ही - प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असतात असे माझे मत. प्रत्येकाने केले तर जगातले बहुसंख्य प्रॉब्लेम्स संपूनच जातील असे वाटते.

निरखितो मीच मला
जरा दुरुन दुरुन
तण माजता माजता
घेतो जरा खुरपून <<< वा वा

उन्हा वार्‍याचा तो जोर
देतो जोम जगण्यास
हिरवाई जपताना
उगा मानावा का त्रास....<<< मस्त