Submitted by -शाम on 31 October, 2012 - 11:50
उरी अमृताचा पान्हा गोड गळ्यात अंगाई
देवा साऱ्यांना मिळू दे माझ्या आईवानी आई....|
वितभर पोटासाठी जायी तुडवीत रान
मोळी घेऊन यायची दरी डोंगरामधून
गंध तापल्या रानाचा तिच्या घामातून वाही.....|
दंड घातल्या साडीचा घेई नेटका पदर
लावी रुपया एवढे कुंकू गोऱ्या भाळावर
कधी सोन्यानाण्यासाठी डोळा पाणावला नाही...|
धान उसनं-पासनं अर्ध्याराती दळायची
नावं घेत लेकरांची ओवी ओवी घुमायची
घास भरवी पिलांना एक चिऊ वेडाबाई...........|
नाही कधी जुमानलं तिने दुखणं-खुपणं
घरट्याच्या सुखासाठी दिलं उधळून जिनं
सोसलेल्या दुःखापोटी बोल कडू झाला नाही.....|
.
.
.
जन्मोजन्मी तुझ्यासाठी कुस तुझीच मागेन
कुणी पुसता “कुणाचा” नाव तुझेच सांगेन
तुझ्यापोटी जन्मा आलो कुण्या जन्माची पुण्याई....|
..........................................................................शाम
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अफाट,,,,...
अफाट,,,,...
जन्मोजन्मी तुझ्यासाठी कुस
जन्मोजन्मी तुझ्यासाठी कुस तुझीच मागेन
कुणी पुसता “कुणाचा” नाव तुझेच सांगेन
तुझ्यापोटी जन्मा आलो कुण्या जन्माची पुण्याई....<<<<<<<
अप्रतिम..अप्रतिम....अप्रतिम..ह्रदयस्पर्शी
खूप खूप आभार दोस्तांनो!!
खूप खूप आभार दोस्तांनो!!
नि श ब्द !
नि श ब्द !
शब्द थिटे पडतात श्याम
शब्द थिटे पडतात श्याम
Pages