स्वप्न

Submitted by मुग्धमानसी on 31 October, 2012 - 06:15

स्वप्नात पाहिला सूर्य उषःकालाचा,
मी वक्षी त्याच्या शांत पहुडले होते.

भगभगीत तपत्या उष्ण उदास दुपारी,
चांदण्यात न्हाउन चिंब जाहले होते.

कोणत्या दिशेतुन हाक बोलकी आली,
मी दिशाहीन आकार गळाले होते.

चाहूल रातिची मधेच ऐकू आली,
मी सोबत थोडे दिवे घेतले होते.

मी थकून अलगद नेत्र झाकले थोडे
तितक्यात किती क्षण निसटुन गेले होते.

पाहिली उशाशी एक पाकळी ओली,
माझ्याच मनी ते फूल उमलले होते...!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दकळा चांगली वाटली पण कवितेचा सलग अर्थ लागला नाही.

मी थकून अलगद मिटले जरासे डोळे, - ही ओळ वगळता लयही छान.

पुन्हा वाचतो.

हवे असल्यास काही र्‍हस्व दीर्घातील बदल घ्या, वृत्तासाठी! मला कविता आवडली. शब्दकळा, कल्पना, सारेच आवडले. धन्यवाद!

चांदण्यात न्हान चिंब जाहले होते.

कोणत्या दिशेतुन हाक बोलकी आली,
मी दिशाहीन आकार गळाले होते.

चाहूल रातिची मधेच ऐकू आली, (किंवा रातची)
मी सोबत थोडे दिवे घेतले होते.

मी थकून अलगद नेत्र झाकले थोडे
तितक्यात किती क्षण निसटुन गेले होते.

पाहिली उशाशी एक पाकळी ओली,
माझ्याच मनी ते फूल उमलले होते...!

कोणत्या दिशेतून हाक बोलकी आली,
मी दिशाहीन आकार गळाले होते.
>> आवडल्या या ओळी फार...

कविताही छान!

शब्दकळा चांगली वाटली पण कवितेचा सलग अर्थ लागला नाही.

ही रचना मला गझलेच्या अंगाने जाणारी वाटली.

मी थकून अलगद नेत्र झाकले थोडे
तितक्यात किती क्षण निसटुन गेले होते.

उत्तम शेर.

स्वप्नांना असतात छंद
शब्दांपलिकडचे
त्यांचं रूपही असत स्वच्छंद
दृष्टीपलिकडचे
स्वप्नांचे अंगण मोठे असते
चराचराला व्यापून उरते
या अंगणात येना पुन्हापुह्ना
घेऊन ताज्या स्वप्नकळया.