PIO card आणि नविन पासपोर्ट

Submitted by प्राजक्ता३० on 27 October, 2012 - 14:23

माझ्या मुलीचा (वय ५ वर्षे) renewed US पासपोर्ट मागील आठवड्यात आला, तिचे PIO card १५ वर्षेपर्यंत आहे. आम्हाला ६ नोव्हेंबरला प्रवास करायचा असल्यामुळे नविन पासपोर्ट endorse करण्याइतका वेळ नाही. कोणी रिसेंटली नविन आणि जुना पासपोर्ट सोबत घेऊन प्रवास केलेला आहे का? Immigration च्या वेळी काही प्रॉब्लेम येऊ शकतो का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याच्या community मधल्या कोणाला तरी बोर्ड करून दिले नाही असे बेकरीवर सांगितलेले. >>
हे मी सांगितलं होतं. ऐकीव माहीती नाही, ज्याला बोर्ड करु दिलं नाही त्याच्याक्षी प्रतेक्ष बोललोय.

त्याच्या मुलाकडे PIO होतं. जुना expire झालेला passport होता आणी नवीन passport होता. पण PIO वरचा passport number आत्ताच्या passport number बरोबर मॅच होत नाही म्हणून बोर्ड करु दिलं नाही. PIO वर जो पासपोर्ट नंबर होता तो (expired) passport जवळ असून सुद्धा.

वास्तविक असा काही नियम नाहीये. पण वादावादी (airline च्या लोकांबरोबर आणी नंतर कॉन्सुलेटच्या लोकांबरोबर) + flight reschedule + ३-४ दिवस वाया + मनस्ताप हे सगळं त्याच्याच वाट्याला आलं. असामी म्हणतो तसं हे रँडम आहे, कोणाला कधी लटकवतील भरोसा नाही.

ह्याबद्दल मी आताच चौकशी करत होते .. कारण लेकाचा पासपोर्ट नुकताच रिन्यू केला आहे .. तर आमच्या एका मित्राने सांगितलं (जे आता मुंबईला जाऊन आले जुलै मध्ये) की जुना, नवा दोन्हीं पासपोर्ट जवळ असल्याने काही प्रॉब्लेम आला नाही ..

सशल वेळ असेल तर करून घे.

आमच्या ओळखीतल्या दिल्लीला जाणार्^या एका कुटुंबाला बोर्ड न करू द्यायचा अनुभव आहे. पण तशी नशीबवान, ही लोकं इतक्या लवकर गेले होते की त्यांच्या बाबाने परत गाडी घरी हाणून जुना पासपोर्ट आणला आणि कुठल्यातरी ऑनलाइन रेफरन्सचा प्रिंट जवळ ठेवला. ही लोकं तो बाबा येईपर्यंत लिटरली दारात थांबले होते आणि एका हाताने तो पासपोर्ट घेऊन सिक्युरिटी, बोर्डिंग आणि लगेच विमान सुटणे हे घडले. (आतापासून मी बॉलिवूड मुवीजवर अशा प्रसंगांना शंका घेणार नाहीये).

अगं वेका पण जुना पासपोर्ट नेऊन चलणार असेल तर कशाला फंदात पडायचं एक दिवस वाया घालवून?

ओ सी आय करताही तेच .. जर पी आय ओ आहे व्हॅलिड तर आता ओ सी आय च्या भानगडीत पडावं का?

चालतोय का ते बघून घे. मग ठीक आहे.

पण पी आय ओ जातंय म्हणतंय पब्लिक का सरकार. माझा तरी तोच प्रश्न आहे. वर अमितने म्हटलेले दोन किलो कागद कोण देणार आहे फ्री?

सशल, चाललं तर उत्तम. पण (संदिग्ध)नियम सरकार ठरवतं, आणि ते कसे पाळायचे ते विमानतळवाले आणि एअरलाईन क्रु.
प्रत्येकाला ते नियम पटवून देणं कदाचित अत्यंत जिकिरीचं होईल, मध्ये लेओव्हर असेल तर ते परत सगळं तपासतात. लगेच जायचं नसेल तर करून घे, एका दिवसात होतं.

सशल, तू या जुलै मधे भारतात गेली होतीस का? कारण जानेवारीपासून नियम बदलले आहेत आणि मायनरसाठी ओसीआय पासपोर्ट रीन्यू केला की करावा लागत आहे. जरी तो लाईफलाँग व्हॅलीड असला तरीही... १८ वर्षानंतर वयाच्या ५० पर्यंत रीन्यू करण्याची जरूरी नाही.

सशल, कॉक्स अँड किंग्स च्या साईटवर मी हे वाचले होते (आठवड्याभरापासून हे नक्की आहे. परत कधी बदलेल माहित नाही)

20 years of age or younger :
OCI registration certificate and ‘U’ Visa must be RE-ISSUED EACH TIME A NEW PASSPORT is issued up to the completion of 20 years of age in view of biological changes in face of the applicant.

21 to 49 years of age :
Re-issuance of OCI registration certificate and ‘U’ Visa is NOT mandatory, each time a new passport is issued between 21-49 years of age. However, if the applicant wishes to avail this service, he / she can request re-issue of the OCI document to update the new passport number. It is also sufficient if the cardholder carries the OCI registration certificate, old passport carrying the 'U' visa and the current valid Passport while travelling to India.

50 years of age or older :
For existing OCI registration certificate and ‘U’ Visa holders who had their documents issued before 50 years of age, OCI documents must be re-issued ONCE after the issuance of a new passport after completing 50 years of age in view of biological changes in face of the applicant.

If the OCI card is issued for the first time after the age of 50 years, then there is no need for re-issuance of OCI. It is also sufficient if the cardholder carries the OCI registration certificate, old passport carrying the 'U' visa and the current valid Passport while travelling to India.

मायनर साठी इथे पासपोर्ट रेन्यू केला तरी PIO वर नव्या पासपोर्टचा नंबर ष्टांप करून देतायत.
माझं ओसीआय करणारे तर २ किलोत आणि ५० ग्राम कागद घातले तर पोराचं oci पण होणारे म्हणालेत. तर ते गेले २ महिने मी करतोय. आणखी किती महिने मी हेच लिहिणारे कोण जाणे. Wink
वेका, निःसंदिग्ध धन्यवाद. Happy

धन्यवाद सगळ्यांनां!

अंजली, मी नाही .. आमचा एक मित्र सहकुटूंब अगदी सेम आमच्या बोटीत असलेला जाऊन आला .. त्यांचं अडलं नाही पी आय ओ वर नविन पासपोर्ट व्हाउच /अटेस्ट केलेला नव्हता तरी .. जुना/नविन दोन्हीं पासपोर्टस घेऊन प्रवास केला त्यांनीं ..

पण कॉशन म्हणून एकदा तो अटेस्ट केलेला बरा ..

आता प्रश्न हा उरला की पी आय ओ आहे तर ओ सी आय घ्यायलाच हवंय का (पी आय ओ काढून टाकणार वगैरे वगैरे चर्चा वाचली मगाशी? परत एकदा संदिग्धता अ‍ॅझ्युम करून टू एर् ऑन द साइड ऑफ गेटींग ओ सी आय असंच उत्तर असणार आहे असं वाटतंय ..)

पी आय ओ आहे तर ओ सी आय घ्यायलाच हवंय का >>>
याच्या उत्तराच्या शोधात गेले अनेक दिवस आहे Happy

वेका, २ किलो कागद मी पुरवतो. ओसीआयचे पैसे दे मला. अरे एकदम ३०० मागतात. सगळ्यांचं करायचं म्हणजे पंचवार्षिक योजना करायला लागते.

अरे ओसीआय फुकट करतात ना? आय मीन ज्यांचं पीआयओ आहे त्यांचं. आम्हाला सध्यातरी मुलांसाठीच हा प्रश्न आहे आणि अवांतर या ट्रीपमध्ये पोरं इतकी आजारी पडली की मुलांना इंड्याला न्यायच्या ऐवजी आपापल्या मुंबई ट्रीपा एक्केटयाने कराव्या का? का? या प्रश्नाला आलोय आम्ही. तरी आम्हाला मंदारला पडलेला प्रश्न पडावा म्हणजे Happy

अरे ओसीआय फुकट करतात ना? आय मीन ज्यांचं पीआयओ आहे त्यांचं. >> तिथे मोठी गम्मत आहे. http://in.ckgs.us/oci/oci-categories/oci-in-lieu-of-pio-us-adult.shtml हि लिंक पहा, धक्का बसेल. मग परत मुख्य पानावर जाऊन तिथला पहिला पॅरा वाच Happy

पंचवार्षिक योजना करायला लागते. >> खरय रे ...

PIO->OCI पूर्वी "नाममात्र" (म्हणजे नवीन ओसीआय पेक्षा कमी Happy ) चार्ज पडत असे. सध्याचे माहीत नाही.

अंजली, आम्ही फेब मधे गेलो होतो. काही अडचण आली नाही. पण तेव्हा काउन्सुलेटच्या वेबसाईट्सवर तसे लिहीलेले होते (दोन्ही पासपोर्ट जवळ ठेवा म्हणून). अर्थात ते आम्ही तिकडे गेल्यावर चेक केले होते Happy

पण हे सगळे anecdotal अनुभव. पण कोणत्याही वेळी काउन्सुलेट च्या वेब साईटवरचे ब्रह्मवाक्य हेच खरे Happy

असामीची लिंक पाहिली. त्यातून एक नवा विंग्रजी शब्द शिकले gratis. मग मुख्य पान म्हणजे कुठलं? होम पेज?

बरं ते जाउदे. फारेण्ड तुम्ही PIO->OCI का केलं होतं. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या काय फरक पडतो का assuming PIO पण व्हॅलिड राहिल. आम्ही PIO->OCI करणार होतो कारण PIO हे स्टेट्स जातंय असं कानावर आलं. पण सध्या तरी असं त्या साईटवर लिहिलं नाहीये.

असामी च्या लिंक वर "एन्करेज्ड् " असं लिहीलेलं असलं तरी पी आय ओ ची व्हॅलिडिटी लाइफलाँग वगैरे आहे असंही लिहीलंय .. अजूनही माझा प्रश्न अनुत्तरीतच (मंदारसारखाच) ..

पुर्वी जन्माने अमेरिकन असलेल्या मुलांनां तेव्हाच ओ सी आय मिळायचं जेव्हा किमान एखाद्या पालकाकडे ओ सी आय असेल .. तात्पर्य पालक पर्मनन्ट रेसिडन्ट्स असतील किंवा पालकांनीं ओ सी आय घेतलं नसेल (पी आय ओ वर असतील) तर त्यांच्या मुलांनां एलिजिबिलिटी नव्हती ओ सी आय साठी .. तो नियम बदलून आता सगळ्या एकेकाळी (म्हणजे अजूनही) इन्डियन पासपोर्ट धारक पालकांच्या मुलांनां ओ सी आय देणार का? आणि व्हॅलिड पी आय ओ असेल आणि ओ सी आय घेण्याची इच्छा नसेल तरी ओ सी आय घ्यावंच लागणार का? ह्या प्रश्नांची (स्थलकालसापेक्ष) उत्तरं फक्त कॉन्स्युलेट ला धडक देऊनच मिळावावी लागणार किंवा मग एखादा डिसअपॉइन्टिंग अनुभव (विमानात बोर्ड करू न देणे आणि ट्रिप चा खेळ खंडोबा) आल्याशिवाय मिळणार नाहीत बहुतेक .. :|

आत्ताच्या माहीतीनुसार PIO लाइफलाँग वॅलीड असणार आहे. पण पुढे नियम बदलून OCI कंपल्सरी केलं तर काय घ्या? त्यावेळी OCI ची फी $३०० असू शकेल. त्यापेक्षा आत्ता OCI फुकटात मिळतय तर घ्या करुन.

आत्तापर्यंत जितक्यांशी OCI घेतलंय त्यांनी घेण्यामागचं वरील कारण सांगितलेलं आहे.

माझ्या मते - जर नंतर PIO बंदच करणार असतील तर मग ते लाइफलाँग करण्याचं प्रयोजन काय? त्यामुळे अजून OCI घ्यावं का नाही हा प्रश्नंच आहे.
इंग्लंडला जाताना पाउंड किती न्यावेत या प्रश्नाइतकाच अवघड प्रश्न आहे Happy

सशल, सॅफ्रा च्या काउन्सुलेट ला जर मेल ने विचारले तर (ते काउन्सुलेट लिहून इतका कंटाळलो की यापुढे फक्त हापिस लिहीणार आहे) २-३ दिवसांनी का होईना पण उत्तर येते. त्यामुळे प्लॅन करू लागलात जायचा आणि शंका असेल तर तो एक ऑप्शन आहे.

त्यापेक्षा आत्ता OCI फुकटात मिळतय तर घ्या करुन. >>> अर्र्र उगाच घाई केली तेव्हा. ११० डॉ भरले होते बहुधा Happy

आणि त्यांनी समजा हेच ओसीआय च्या बाबतीत केलं तर. मग म्हणतील कसं फसवलं.

>>इंग्लंडला जाताना पाउंड किती न्यावेत या प्रश्नाइतकाच अवघड प्रश्न आहे Lol

आमच्या कडे PIO/OCI नाही. भारतभेट ४-५ वर्षांनी होते. आता घ्यायचे झाले तर OCI घ्यावे लागेल का?

इंग्लंडला जाताना पाउंड किती न्यावेत या प्रश्नाइतकाच अवघड प्रश्न आहे >> Lol

एकूण सगळा घोळ नि सरकते नियम पाहता मधल्या मधे राहण्यापेक्षा उडी मारून पार या. इथे किंवा तिथे airport वर अडकून वेळ नि पैसे वाया घालवण्याची रिस्क घेण्यात काय मतलब असा विचार करा.

हा प्रश्न लवकरच ऐरणीवर येईल म्हणून आताच बेकरीवरून हाती आलेल्या वॄत्तानुसार कॉपी/पेस्ट..

काय एडीट करायचं तर सांगा नंतर करेन.

असामी | 11 February, 2016 - 07:00 नवीन
मंदार ह्या pages वर आहेत बघ.

https://www.in.ckgs.us/oci/oci-categories/oci-in-lieu-of-pio-nonus-minor...
https://www.in.ckgs.us/oci/oci-categories/oci-in-lieu-of-pio-nonus-adult...
https://www.in.ckgs.us/oci/oci-categories/oci-in-lieu-of-pio-us-minor.shtml
https://www.in.ckgs.us/oci/oci-categories/oci-in-lieu-of-pio-us-adult.shtml

मंदार | 11 February, 2016 - 07:09 नवीन
हा हा हा
ही ही ही
हु हु हु

असामी, तु दिलेल्या OCI in Lieu of PIO - Minor साठीच्या लिस्टमधे १८ डॉक्युमेंट्स आहेत.
New OCI Application - Minor साठीच्या लिस्टमधे १६ डॉक्युमेंट्स आहेत.
आता तू म्हणशील, मेरे चेकलिस्ट मे १८ डॉक्युमेंट्स है, १६ डॉक्युमेंट्स है, और क्या है तुम्हारे पास?

यावर मी शशी कपूरच्या बाणेदारपणे म्हणेन, की मेरे चेकलिस्टमे २४ डॉक्युमेंट्स है फिदीफिदी

तु दिलेल्या चेकलिस्टप्रमाणे सर्व डॉक्युमेंटस घेउन मागच्या आठवड्यातच जाउन आलो. तेव्हा त्यांनी वाटाण्याच्या अक्षता आणी सोबत ही नवी चेकलिस्ट दिली ज्यात काही अजून डॉक्युमेंट्स मागितली आहेत, उदा. बर्थ सर्टीफिकेट, मॅरेज सर्टीफिकेट ई. स्मित

rmd | 11 February, 2016 - 07:11 नवीन
त्या दिलेल्या वाटाण्याच्या अक्षता पण परत द्यायच्या आहेत का त्यांना? फिदीफिदी

धनि | 11 February, 2016 - 07:12 नवीन
तू मॅरेज सर्टिफिकेट नव्हते नेलेस म्हणूनच तुला वाटाण्याच्या अक्षता लावल्यात हाहा

सशल | 11 February, 2016 - 07:13 नवीन
हाहा

>> हा हा हा
ही ही ही
हु हु हु

हे गोविंदा चं "अ आ इ उ ऊ ओ" आहे की राहुल सोलापुरकर सारखं बाराखडी मध्ये हसणं की फिबी आणि जोई चं ते छद्मी हास्य ते कळेना दोन क्षण .. हाहा

rmd | 11 February, 2016 - 07:15 नवीन
ते कळेना दोन क्षण >>> मला अजूनही नाही कळलेलं फिदीफिदी

पारु | 11 February, 2016 - 08:00 नवीन
OCI झालं आमचं हुश्य ! खुपच कटकटीचं काम होतं. ती काय १८-२० डॉक्युमेंट्स आहेत त्यातली काही काही नोटराइज्ड करुन घ्यावी लागतात. सगळ्यात कठीण काम होतं applicant चा अंगठा घेण्याचं.. एका छोटासा चौकोनाच्या बाहेर जर thumbprint गेलां तर aaplication रद्द अरेरे मला ते OCI कार्ड मिळेपर्यंत धाकधुक वाटत होती. अजुन एक म्ह्णजे कार्ड मिळण्यासाठी प्रीपेड फेडेक्स चे पायोरीटी पॅकेज पाठवले तर consulate म्ह्णे आम्ही फेडेक्स अ‍ॅक्सेप्ट नाही करत ! सॅन फ्रॅन indinan consulate मध्ये तर सावळा गोंधळ होता. सकाळी १० वाजताची रीतसर आधी appointment घेउन गेले तर दुपारी १ ला नंबर आला. तिथे एक कॉपींग मशीन ठेवली आहे. बरीच लोकं तिथेच कॉपीज काढत होते. तुमची जरी फाइल नीट असेल तरी तुमच्या आधी आलेल्या लोकांची कागदपत्र नीट लागे पर्यंत तुम्हाला थांबावे लागते. अजुनही खूप गोंधळ झाले पण शेवटी गंगेत घोडं न्हालं स्मित

नवीन ओसीआय सॅन फ्रान्सिस्को साठी ही लिस्ट होती. लेटेस्ट info वेबसाइटवर क्न्फर्म करा.

1) OCI application form : Original : Applicant's left thumb and parent's both signature
2) Applicant's photo 2 inches x 2 inches: original
3) Additional particular's form : original
4) Parental authorization form notarized
5) Applicant's passport : information page, endorsement/amendment pages copy: self attested
6) Copy of parent's passport self attested: information page, endorsement/amendment pages
7) Parents green card copy both sides
8) Applicant's birth certificate
9) Proof of address
Both parents driving license copy ( 6 months validity)
10) Copy of parent's marriage certificate
11) Parent's birth certificates
12) CKGS disclaimer form : original
13) Prepaid envelope with AWB no with service provider name
13) Online payment receipt / check

तर परत एकदा तोच प्रश्न.
मुलाचं पीआयओ वॅलिड आहे, पासपोर्ट बदलला आहे. नव्या पासपोर्टचा नंबर PIO वर नाही तर तो एनडोर्स करून घ्यावा का? मिळतो का? (san francisco)
सगळीकडे शोधलं तर जुना पासपोर्ट + नवा + PIO हे पुरेसं आहे असे अनुभव दिसले.

मी जानेवारी २०१६ मधे माझ्या मुलीला घेऊन भारतात जाऊन आले. तिचा जुना पासपोर्ट, नविन पासपोर्ट आणि PIO Card (valid till 2027) बरोबर घेऊन प्रवास केला. नव्या पासपोर्टचा नंबर PIO card वर endorse केला नव्हता. कुठेही काही अडथळा आला नाही.

Pages