PIO card आणि नविन पासपोर्ट

Submitted by प्राजक्ता३० on 27 October, 2012 - 14:23

माझ्या मुलीचा (वय ५ वर्षे) renewed US पासपोर्ट मागील आठवड्यात आला, तिचे PIO card १५ वर्षेपर्यंत आहे. आम्हाला ६ नोव्हेंबरला प्रवास करायचा असल्यामुळे नविन पासपोर्ट endorse करण्याइतका वेळ नाही. कोणी रिसेंटली नविन आणि जुना पासपोर्ट सोबत घेऊन प्रवास केलेला आहे का? Immigration च्या वेळी काही प्रॉब्लेम येऊ शकतो का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राजक्ता३०, एंडॉर्स करुन घ्यावे लागेल. तसा नियम आहे Happy अ‍ॅमस्टरडॅम एअरपोर्टला स्टॉप असेल तर तिथली तपासणी फार कडक असते. बाकीच्या एअरपोर्टसचं माहीत नाही. युकेत तरी आम्हाला PIO and passport घेऊन गेल्यावर त्याच दिवशी endorse करुन मिळाला होता.
तुमच्या मुलीचा जुना पासपोर्ट तुम्ही भारतात जाऊन येईपर्यंत व्हॅलिड आहे का ? पण तरी नवीन आल्यावर जुना कँसल होतो असे असते ना ?

Immigration च्या वेळी काही प्रॉब्लेम येऊ शकतो का? >>> हो, आमच्या ऐकण्यात एकांना अ‍ॅमस्टरडॅम एअरपोर्टवरुन परत अमेरिकेत पाठवून दिलेले आहे ह्याच कारणासाठी. पासपोर्ट होता पण एंडॉर्स केलेला नव्हता.

जुन्या पासपोर्ट मधे असलेला व्हिसा आणि सोबत नवा पासपोर्ट असे दोन्ही सोबत बाळगणे आवश्यक असावे असे वाटते.

नक्की नियम काय आहेत हे बघुनच प्रवासाला सुरवात करा.

तिचा नविन पासपोर्ट आल्यामुळे जुना रद्द झालेला आहे. आता कॉन्सुलेटने PIO processing Travisa नावाच्या कंपनीला outsource केले आहे, त्यामुळे same day processing शक्य नाही. २ आठवडे प्रोसेसिंग टाईम आहे.

सॅन फ्रान्सिस्को कॉन्सुलेटला फोन केला पण कोणीच उचलत नाही.

आम्ही कोरियन एअरलाईन्सनी जाणार आहे. त्यांना फोन केल्यास काही खात्रीशीर माहिती मिळू शकेल का?

प्राजक्ता सॅन फ्रान्सिस्को असेल तर त्यांच्या साईटवर एक मेल आयडी आहे. तेथे मेल कर आणि का लौकर गरज आहे ते लिही. उत्तर देतात ते. राहायला जवळ असाल तर प्रत्यक्ष एकदा जाऊन आलेले चांगले.

आम्ही भारतातून इकडे तसा प्रवास केलेला होता दोन महिन्यांपूर्वी. भारताच्या इमिग्रेशन ने आम्हाला लगेच एन्डोर्स करून घ्यायला सांगितले पण जाऊ दिले होते. पण हे सगळे सब्जेक्टिव्ह असते.

जर खूप घाई असेल तर सरळ सेम डे व्हिसा काढून घेणे उत्तम पर्याय.

एअरलाईन्सला फोन करून फारशी माहिती मिळेलसे वाटत नाही. त्यांचा काही संबंध नाही.

Don varshapurvee mothya lekicha renewed australian pp, expired aus pp aaNi oci card ase documents ghevun pravas kela hota. Ticha renewed pp aalyanantar tyavar oci che lable lavaNyasathee puresa avadhee navhata mhanun indian consulatene juna pp paN ghevun janyas sangitale hote.

@अगो, पासपोर्ट एंडोर्स करून घेतलाच पाहिजे असा नियम कुठे दिला आहे त्याची माहिती देता येईल का? माझ्या माहितीप्रमाणे जुना पासपोर्ट बरोबर असेल तर पी आय ओ कार्ड एंडोर्स करून घेण्याची गरज नाही. एंडोर्सिंग हे ऑप्शनल आहे आणि जुना पासपोर्ट असतानाही कुणाला परत पाठवल्याची एकही केस मी ऐकलेली नाही! तुमची ऐकीव माहिती नक्की बरोबर आहे का? Wink

ट्रॅविसाच्या साईट्वर हे लिहीलं आहे. (त्यांनी रिन्युलची प्रोसेस दिली आहे, पण एंडोर्समेंट केलीच पाहिजे असं कुठेही लिहिलेलं मला दिसलं नाही)

Question: What is the procedure for change of Passport particulars on the PIO Card when a new Passport is obtained.
Answer: If a new passport has been obtained after issue of PIO card, you can apply to have the PIO re-issued on a new passport. Requirements for this service are listed online at https://indiavisa.travisaoutsourcing.com/pio/guidelines.

हे देखील पहा. तुम्हाला नक्की माहिती मिळाली तर आम्हाला कळवा.

https://indiavisa.travisaoutsourcing.com/pio/faqs

याबद्दल १००% अचूक माहिती ही अर्थातच Indian Bureau of Immigration मध्ये मिळेल. ज्या देशात तुम्ही जात आहात तिथल्या Immigration Authority चे नियम तपासावे लागतात. sfo, वा तत्सम भारतीय दूतावासात याबद्दल मार्गदर्शक माहिती मिळेल, निश्चीत नियम नाही.. (अर्थात भारतीय दूतावास हे भारतीय नागरीकांना मदत करणारे असते तर त्यांनी तशी माहिती ऊपलब्ध करून दिली असती.. तो वेगळा विषय!).

तरिही खालील दोन संकेतस्थळांवरून माहिती मिळू शकेलः
http://www.immihelp.com/nri/pio-vs-oci.html
(वरील तक्यात new foreign passport चा रकाना वाचा).

Bureau of Immigration, India:
http://www.immigrationindia.nic.in/Pio_Card2.htm
(दुर्दैवाने यात pio प्रवासा संदर्भात फार माहिती नाही!. ईमेल करून पहा ऊत्तर मिळते का. त्या ईमेल चे ऊत्तर प्रिंट करून घेवून जा बरोबर तो सर्वात सुरक्षित मार्ग असेल! )

अमिराती मधिल भारतीय दूतावासातील खुद्द अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, जुना (संपलेला)पासपोर्ट, नवा पासपोर्ट व pio कार्ड घेवून प्रवास करता येवू शकतो- पण pio वर नविन पासपोर्ट ची नोंद करून घेणे केव्हाही सर्वात सेफ व १००% कायदेशीर मार्ग आहे. oci मात्र नविनच करून घ्यावे लागते! कारण साधे आहे (oci is almost like passport... pio is visa of longer duration- 15 yrs)

शेवटी भारतीय विमानतळावरील ईमी. अधिकारी यात काय तो अंतीम निर्णय घेवू शकतो (शक्यतो लहान मुलांच्या बाबतीत अडवणूक करत नाहीत..). जसे अमेरीकेला जाताना अगदी विमानात बसण्याची परवानगी नाकारणे वा अमेरीकेत ईमी. अधिकार्‍याने प्रवेश नाकारणे (कुठल्याहि कारणास्तव!) हे घडू शकते तसेच. Happy

अमेरीकन विमानतळावर देखिल कधी कधी या बाबतीत, म्हणजे तुम्हाला विमानात चढू द्यायचे वा नाही, ground staff/clearance in charge निर्णय घेतात. त्यांचा निर्णय मात्र विमान प्रवासापुरता असतो-- भारतात ऊतरल्यावर प्रवेश देणे वा नाकारणे हे वर लिहीले तसे भारतीय ईमी. अधिकार्‍याच्या निर्णयावर अवलंबून असते.

असो.
>>माझ्या मुलीचा (वय ५ वर्षे) renewed US पासपोर्ट मागील आठवड्यात आला, तिचे PIO card १५ वर्षेपर्यंत आहे. आम्हाला ६ नोव्हेंबरला प्रवास करायचा असल्यामुळे नविन पासपोर्ट endorse करण्याइतका वेळ नाही.
पुढील खेपेस, (emergency नसेल तर.. आणि emeregency ची व्याख्या मात्र सप्ष्ट ऊपलब्ध आहे!) सर्व कागदपत्रे १००% योग्य आहेत व अपडेटेड आहेत ही खात्री बाळगूनच मगच प्रवास (प्लॅनिंग) करा म्हणजे नसत्या चिंता लागणार नाहीत! Happy

शुभेच्छा!

रच्याकने: आजकाल नवरा बायकोच्या नावांची नोंद (भारतीय) पासपोर्ट मध्ये असणे "सक्तीचे" केले आहे असे ऐकून आहे.. त्या बद्दल ठोस नियम (प्रवासा संदर्भात) कुठे वाचलेले नाहीत. पण पासपोर्ट नविन करून घेताना मात्र हे निश्चीतच सक्तीचे आहे.

सगळ्यांच्या त्वरित प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

@फारेंड, आता PIO, Visa TraVisa ला outsource केल्यामुळे कॉन्स्युलेट वाले त्याबाबतीत मेल्स किंवा फोनला उत्तर देत नाही असे त्यांच्या साईटवर लिहीले आहे. जर तुमच्या जवळ ती मेल आयडी असल्यास मला पाठवू शकाल का?

@खवचट खान, पासपोर्ट एंडोर्स करून घेतलाच पाहिजे असा लेखी नियम कुठेही दिलेला नाही, पण मी TraVisa च्या ऑफिसमध्ये फोन केला तेव्हा त्यांनी एंडोर्स करायला लागेल असे सांगितले.

immihlelp व इतरही काही इमिग्रेशन फोरम्सवर दोन्ही पासपोर्ट सोबत बाळगल्यास काही प्रॉब्लेम होत नाही असे लिहीले आहे, त्यामुळे कंन्फ्युजन होते आहे.

सध्यातरी पुढच्या आठवड्यात PIO endorsement साठी अपॉईंटमेंट घेतली आहे आणि त्यांना विनंती करून बघू लवकर करण्याबद्दल, बघू काय होते तर.

जसे अमेरीकेला जाताना अगदी विमानात बसण्याची परवानगी नाकारणे वा अमेरीकेत ईमी. अधिकार्‍याने प्रवेश नाकारणे (कुठल्याहि कारणास्तव!) हे घडू शकते तसेच. >>> + १.
human factor महत्वाचा असतोच. एकंदर सारासार विचार करुन संबंधित अधिकारी निर्णय घेऊ शकतो.

तुमची ऐकीव माहिती नक्की बरोबर आहे का? >>> जसे घडले तसे सांगते. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये मी मुलाला घेऊन अमेरिकेतून भारतात येणार होते. मुलाच्या वर्गमित्राच्या आईला हे कळल्यावर तिने मला मुद्दाम हे अधोरेखित करुन सांगितले होते की पीआयओ वर पासपोर्टची नोंद आहे ना, माझ्या मैत्रिणीला नुकतंच अ‍ॅमस्टरडॅम एअरपोर्टवरुन परत पाठवले ह्या कारणासाठी. तिच्यासाठी ही माहिती ऐकीव नव्हती. आता ती बरोबर आहे की नाही ह्याचा निर्णय वाचकांनी घ्यावा Happy

आता अ‍ॅमस्टरडॅम एअरपोर्टवरचा माझा अनुभव. आम्ही कायम अ‍ॅमस्टरडॅममधूनच जात येत आलो. आधी म्हटल्याप्रमाणे तिथे अतिशय कडक तपासणी असते असा आमचा अनुभव आहे. त्या मैत्रिणीने हे सांगितले तेव्हा माझ्या मुलाच्या PIO वरचा पासपोर्ट नंबर चांगला वर्षभर व्हॅलिड होता त्यामुळे मी फारसा विचार केला नाही.
तिथे गेल्यावर तिथल्या अधिकार्‍यांनी अडवले कारण माझे आणि मुलाचे आडनाव वेगळे. आत्तापर्यंत मुलाला एकटे घेऊन कधी प्रवास केलेलाच नसल्याने ही बाब लक्षातच आली नव्हती. गंमत म्हणजे त्याच प्रवासात अमेरिकेत कुणीही काहीही विचारले नाही, भारतातही विचारले नाही पण अ‍ॅमस्टरडॅमला मात्र विचारले. माझ्याकडे बर्थ सर्टिफिकेट नाही म्हटल्यावर त्यांनी मला बाजूला काढले आणि तूच मुलाची आई आहेस हे सिद्ध करणारा पुरावा हवा असे सांगितले. तेवढ्यात मला आठवले की माझ्या पासपोर्टवर मी नवर्‍याचे नाव एंडोर्स करुन घेतले होते ( खरंतर त्याची गरज नसते पण तरी उगीच extra precaution म्हणून केले होते पहिल्यांदा डिपेंडंट व्हिसासाठी अ‍ॅप्लाय करताना ). ते दाखवले. मग त्या अधिकार्‍याने दुसर्‍या अधिकार्‍याला बोलावले आणि हा पुरावा चालेल का असे विचारले. मग अर्धा मिनिट चर्चा करुन त्यांनी मला पुढे सोडले. हा सगळा प्रसंग अत्यंत नाट्यमय पद्धतीने घडला. हा माझा स्वतःचा अनुभव आहे.

आता पासपोर्टवर आई आणि मुलाचे नाव वेगळे असणे आणि तरी आई-मुलाने एकत्र प्रवास करणे हे इतके कॉमन आहे तरी दुसर्‍या कुणाला हा अनुभव आलेला माझ्या तरी ऐकीवात नाही Wink पण मला आला. आणि त्यांनी ( नसलेल्या ) नियमावर बोट ठेवले असेल तरी त्यांचे म्हणणे चुकीचे आहे असेही म्हणता येत नाही.

तेव्हा ह्या सगळ्या चर्चेचे सार काय, तर प्राजक्ता३० PIO वर नवीन पासपोर्ट नंबर नसेल तर निदान अ‍ॅमस्टरडॅमच्या थ्रू प्रवास करु नका Wink

>>अ‍ॅमस्टरडॅम एअरपोर्टवरुन परत पाठवले ह्या कारणासाठी
तिच्याजवळ जुना पासपोर्ट होता का?

>>आता पासपोर्टवर आई आणि मुलाचे नाव वेगळे असणे आणि तरी आई-मुलाने एकत्र प्रवास करणे हे इतके >>कॉमन आहे तरी दुसर्‍या कुणाला हा अनुभव आलेला माझ्या तरी ऐकीवात नाही
मला तुझ्यासारखा अनुभव आलेला नाही, कारण मी बर्थ सर्टिफिकेट जवळ ठेवते. Wink आणि १-२ वेळा ते दाखवावे लागले आहे, अमेरिकेतून बाहेर पडतानाच.

माझ्या मुलाचा २०१० मध्ये नवीन पासपोर्ट आला तेव्हा आम्ही कॉन्सुलेट मध्ये ह्याबद्दल चौकशी केली असता आम्हाला एन्डॉर्स करून घेणे जरूरी आहेच असे सांगितले. शिवाय नवीन पासपोर्टच्या एन्डॉर्स्मेंटसाठी जुना पासपोर्ट व पीयाओ पाठवावे लागते. त्यामुळे आमच्याकडे एक वेगळाच घोळ झाला. माझ्या मुलाच्या आधीच्या पासपोर्टावर मिडल नेम होते आणि नव्यावर नाही. (आईची चूक- फॉर्म भरताना :फिदी:) इंडीयन कॉन्सुलेटने एन्डॉर्स करायला नकार दिला. कारण त्यांचे म्हणणे पीआयओ व जुन्या पासपोर्टवरचे नाव नवीनशी जुळत नसल्याने हे एकाच व्यक्तीची कागदपत्रे नाहीत (?) नवीन पासपोर्टवरचे नाव बदला म्हणे किंवा नवा पासपोर्ट आणा. Uhoh नाव बदल्ण्याबद्दल चौकशी केली असता प्रोबेट कोर्ट वगैरे भानगडी होत्या. नवीन पासपोर्ट पुन्हा घेणे शक्य नव्हते.
ट्रीपच्या अगोदर हातात वेळ कमी असल्याने आम्ही फक्त नवीन पासपोर्ट पाठवून सरळ व्हिसा काढून घेतला.

माझे दोन पैसे.. VFS कंपनी बरीच कार्यक्षम आहे. त्यांना इमेल किंवा फोन करुन तात्काळ एन्डोर्स करुन घेता येईल का हे पाहुन इथेच करुन घेणे उत्तम. प्रवासात मनस्ताप घडण्यापेक्षा इथे थोडे कष्ट पडलेले बरे. कारण वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे ह्युमन फॅक्टर आडवा येतो आणी एक नाहीतर ४-५ वेगवेगळ्या ठीकाणी ह्यातुन जावे लागेल.

रच्याकने, अ‍ॅम्स्टरडॅम येथील अधिकारी फारच चिकीत्सक आहेत. काहिही कारण नसता उगाच चिकीत्सा करत बसतात. एकदा अमेरिकेतून भारतात जाताना अ‍ॅम्स्टरडॅम हॉल्ट होता तिथे बाहेरही सोडले नव्हते, एका खोलीत सगळ्यांना बसवुन ठेवले होते तरिही परत सगळी चिकित्सा केली (विशेषतः भारतीय पासपोर्टधारकांची)

अजून एक पैसा-
नाव सारखे असो-नसो, आई किंवा वडील एकाबरोबरच मूल प्रवास करत असेल तर अनुपस्थित पालकाचे 'हरकत नाही' सर्टिफिकेटही जवळ ठेवा असे सांगतात. एकदा नवीन पासपोर्ट घ्यायला पासपोर्ट ऑफिसमध्ये वडील-मुलगा जाणार होते तेव्हाही आईचे 'हरकत नाही' पत्र बरोबर घेऊन या असे आधीच सांगितले होते.

अगो,

>> मग त्या अधिकार्‍याने दुसर्‍या अधिकार्‍याला बोलावले आणि हा पुरावा चालेल का असे विचारले. मग
>> अर्धा मिनिट चर्चा करुन त्यांनी मला पुढे सोडले. हा सगळा प्रसंग अत्यंत नाट्यमय पद्धतीने घडला. हा
>> माझा स्वतःचा अनुभव आहे.

माझ्या अंदाजाप्रमाणे असे मुलाचे पालकत्व सिद्ध करावयास सांगणे बेकायदेशीर आहे. तुम्ही भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक असल्याने खूप आरडाओरडा होईल असा त्या अधिकार्‍यांनी कयास बांधला असावा. अर्ध्या मिनिटात ही बाब त्यांच्या लक्षात आली असणार.

आ.न.,
-गा.पै.

बिल्वा, आपल्याजवळ पीआयओ असतांना व्हिसा घेतलेला चालतो का?

https://indiavisa.travisaoutsourcing.com/pio/explain-services वर सांगितले आहे की 'Visa cannot be held along with OCI or PIO.'

तुमच्याकडे पीआयओ आणि व्हिसा दोन्ही आहेत का?

>>माझ्या अंदाजाप्रमाणे असे मुलाचे पालकत्व सिद्ध करावयास सांगणे बेकायदेशीर आहे.
कुठल्या सरकारी कागदपत्रांत आहे असं करायला सांगणं बेकायदेशीर असल्याचं? पालकत्त्व सिध्द करणं वयानं मायनर मुलाच्या सुरक्षीततेच्या दृष्टीनं आवश्यक आहे हा विचार त्यामागे असावा. मूल पळवून नेल्या जातंय का (कधीकधी पालकही मूल पळवून नेण्याच्या केसेस घडतात म्हणून आणखी खोलात चौकशी), ह्यूमन (चाइल्ड) ट्रॅफिकिंगची केस तर नाही, हे सगळं कन्फर्म करणं यात काहीही गैर नाही.

नो ऑबजेक्शन सर्टीफिकेट अमेरिकन नागरीक असलेलं मूल देशाबाहेर नेताना जवळ ठेवावं लागतं तसं भारतीय नागरीक असलेलं मूल भारतातून बाहेर नेताना बघितलं नाही.

आम्ही इमिग्रेशन दरम्यान पीयाओ दाखवलेच नाही.ते दाखावावे काही गरजेचे वाटले नाही. आणि त्यांनीही विचारले नाही. कारण नवीन पासपोर्ट्वर पीयाओचा काहीच उल्लेख नाही. तो पासपोर्ट आणि त्यावरचा व्हॅलिड व्हिसा एवढ्यावर एमिग्रेशन झाले.
आमच्याकडे त्यावेळी पीआयओ व व्हिसा दोन्ही होते. पीआयओ आहे आत्तापण , पण नवीन पासपोर्ट्वर एन्डॉर्स केले नसल्याने ते व्हॅलिड ठरते का मुळात माहिती नाही. व्हिसा ३ महिन्यांचा होता.

ओसीय बद्दल मला माहिती नाही. ओसीआय असताना असही व्हिसा कोण काढेल?

मध्यंतरी आम्ही मित्राच्या मुलाला आमच्याबरोबर भारतात घेऊन गेलो आणि येताना परत घेऊन आलो. इथून निघताना मला काहीच कागदपत्रं विचारले नाहीत पण भारतातून निघताना त्याच्या आईवडिलांचं 'एन ओ सी' का नाहीये हे विचारलं होतं तसंच त्याला बाजूला घेऊन प्रश्नही विचारले होते.
माझ्या नणंदेलाही मुलाबरोबर प्रवास करताना वडिलांचं 'एन ओ सी' नाहीये का, विचारल्याचं आठवतंय.

माझ्या अंदाजाप्रमाणे असे मुलाचे पालकत्व सिद्ध करावयास सांगणे बेकायदेशीर आहे. >>> हे लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी फायद्याचेच असल्याने कायदेशीर / बेकायदेशीर ही चर्चा करण्यात मला काहीच रस नाही. त्यांनी तसा आग्रह धरणे मला तेव्हाही चूक वाटले नव्हते आणि आत्ताही वाटत नाही. आपल्याकडे व्यवस्थित कागदपत्रे पाहिजेत एवढे खरे.

तुम्ही भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक असल्याने खूप आरडाओरडा होईल असा त्या अधिकार्‍यांनी कयास बांधला असावा. >>> ह्याचा परस्परसंबंध कळला नाही. आम्ही अमेरिकन नागरिक नाही Happy

मृण्मयी,

>> कुठल्या सरकारी कागदपत्रांत आहे असं करायला सांगणं बेकायदेशीर असल्याचं?

कागदपत्र असलंच तर ते कायदेशीर तरतुदींचं असतं! Lol

माझा केवळ अंदाज आहे की संक्रमणात (ट्रांझिटमध्ये) अशा रीतीने अडवणं कायद्याला धरून नाही. नक्की नियम पहिला पाहिजे. कारण की उतारू इथे हॉलंडमध्ये शिरत नाहीयेत. त्यामुळे डच कायदा लागू होत नसून आंतरराष्ट्रीय कायदा लागू पडत असावा. असं असेल तर सगळ्या विमानतळांच्या संक्रमणात (ट्रांझिटमध्ये) तो समान असायला हवा होता. ज्याअर्थी दुबई किंवा फ्रँकफर्ट येथे असे प्रकरण ऐकलेले नाही त्याअर्थी अ‍ॅमस्टरडॅमची अडवणूक तरतुदींप्रमाणे नसावी. तसेच अ‍ॅमस्टरडॅम विमानतळाच्या (शिफॉल) संकेतस्थळा‍वर काही माहीती सापडली नाही.

मात्र तुमचा मानवी तस्करीचा मुद्दा पूर्णपणे पटला.

आ.न.,
-गा.पै.

विषयांतर: ह्यावेळी पहिल्यांदाच व्हाया अ‍ॅम्स्टरडॅम प्रवास केला. एअरपोर्ट बराच (१९९८च्या मानाने) सुधारला आहे. पण मलाही ते ट्रांझिटवाल्यांचा पासपोर्ट चेक करण्याचे नाटक काही कळले नाही. उगाचच त्रास!

मी सगळे प्रतिसाद वाचले नाहीत.
पण प्राजक्ता, तुम्ही ट्रॅव्हिझा ला फोन केलात का? खूप चांगली सर्व्हिस आहे ती. माझ्या मुलाच्या पीआयओच्या वेळेस त्यांना फोन करून प्रश्न विचारून भंडावून सोडले होते आम्ही, परंतू एकदम व्यवस्थित उत्तरे दिली आहेत त्यांनी. बर्‍याचदा काही गोष्टी स्पेसिफिक कॉन्सुलेटनुसार बदलतात..
फोन करून सांगा त्यांना अडचण, दे विल शुअरली हेल्प यु आउट.. ऑल द बेस्ट! Happy

या आठवड्यात ट्रॅव्हिसाच्या ऑफिसमध्ये पीआयओसाठी गेलो पण इतक्या लवकर पीआयओ येणार नाही म्हटल्यावर व्हिसासाठी अर्ज दिला. सोबत "आमच्याजवळ व्हॅलिड पीआयओ आहे, पण पुढच्या आठवड्यात प्रवास करायचा आहे व त्याआधी एंडॉर्समेंट होणार नाही म्हणून व्हिसा हवा आहे" असे पत्रही दिले.
त्याचदिवशी संध्याकाळी व्हिसा मिळाला.

इथे सगळ्यांनी दिलेल्या तत्पर प्रतिसादाबद्दल सगळ्यांना थँक्स.

अतिशय अर्जन्ट मदत हवि आहे, नवरा साबा साबु ना सोडायला भारतात गेला आहे, तिथे त्याचा पासपोर्ट हरवला आहे, ८ दिवसात परतिचे टीकिट आहे, अर्जन्ट पासपोर्ट कुथे आणि कसा मिळेल..प्लिज लवकर मदत सुचवा.

अग १८०० ... नबर वर उचलत नाहियेत..तो आता पासपोर्ट ऑफिसला जातोय..अग जस्ट सकाळि तिथे पोहचला आणि पुधे घरि ़जाताना हरवला..कस ते काय कळ्त नाहि..

हो!

हर्वलेला पास्पोर्ट मिळाला, मुन्बै वरुन निघाल्यावर एका हॉटेल ला चहाला थान्बले होते तिथे पडला होता, कुणा प्रवाशाला मिळाला त्याने घरपोच आणून दिला... हुस्श वाटतय.

Great!!

धन्यवाद फारेन्ड्,देवकी,वत्सला, हो अमोल पत्ता होता सध्याचा..
झाल अस फ्रायडे लेट नाईट फ्लाईटआल्यावर
नवर्‍याने एअरपोर्ट्लाच पैसे exchange केले आणी नन्तर ठेवु म्हनुन पासपोर्ट जॅकेटच्या खिशत टाकला.. तिथुन निघुन घरी येताना एका ठिकाणि चहा साठी था.न्बले..वॉलेट काढताना पासपोर्ट पडला तो मागुन आलेल्या एका बस मधिल प्रवाशाला दिसला त्याने पता वाचुन नाशिकच्या कडक्टर कडे सुपुर्ट केला.. त्या माणसाने दुसर्‍या दिअव्शी अगदी सकाळी घरी आणुन दिला..इथे आमचा जिव भान्ड्यात पडला..कारण रिट्र्ण टिकिट काढ्लेले होते..त्याच्या आत नवा पासपोर्ट काढणे खरच कठिन होते.

इकडे तिकडे PIO vs OCI विषय सुरु झाल्याने अनुभवी ओसीआय धारक (किंवा कन्व्हर्टर्स) ना इथे लिहायचं भावनिक आवाहन करण्यासाठी हा धागा वर काढते आहे.

बेकरीवरचे निवडक प्रतिसाद कॉपी करतेय. आक्षेप असल्यास प्लीज सांगा. तुमचा भाग उडवेन

शूम्पी | 11 September, 2015 - 01:59
आम्ही आत्ताच ह्या जूनमध्ये भारतात जाउन आलो त्यामुळे ताजी खबर आहे(तुका म्हणे त्यातल्या त्यात) मुलिंचे आधीचे युएस चे पासपोर्ट एक्ष्सपायर झाले त्यामुळे U(OCI) विसा चा स्टिकर नव्या पासपोर्टवर नव्हता त्यामुळे २ महिने घालवून OCI renew करावं लागलं. कॉक्स & किंग्ज थ्रू काम करायचं होतं. दर फोनकॉलवर वेगेळी इंफो मिळत होती पण झालं एकदाचं!
ही प्रोसेस मुली १८ होइतो त्यांच्या प्रत्येक नव्या पासपोर्ट्साठी करावी लागणार आहे.
काय शिंचा त्रास अहे.

मंदार | 11 September, 2015 - 02:52
All existing valid PIO cardholders are expected to apply for an OCI card in lieu of PIO card before 31 March 2016 - असं ह्युस्टन कॉन्सुलेट च्या वेबसाईटवर लिहीलंय.

तर

PIO cardholder is encouraged to apply for OCI card in lieu of PIO card - असं Cox and Kings Global Services च्या वेबसाईटवर लिहीलंय.

त्याहीपुढे गेलात तर Cox and Kings Global Services च्या वेबसाईटवरच इथे ते strongly encouraged to apply म्हणतात.

अजून must apply सांगणारी लिंक मिळालेली नाही, कोणाला आढळल्यास कळवणेचे करावे Happy

वेका | 11 September, 2015 - 02:50
http://www.cgisf.org/page/display/31/231

हिथं म्हटलंय
This is to notify that submission of application for OCI card in lieu of PIO card is voluntary and optional. OCI card in lieu of PIO card can be applied at https://passport.gov.in/oci. All extant PIO cards will continue to be valid until further instructions on the matter are conveyed by MHA.

ही बोंब जून २०१५ ची आहे नंतर काय?

प्रश्न काय आहे नेमका? पासपोर्ट एक्स्पायर, पिआयो एक्स्पायर का तिसरंच काहितरी?

बायदवे, आम्ही मुलांच्या रिनुड पासपोर्टवर ओसीआय कधीच ट्रांस्फर करुन घेतला नाहि, नेहेमी ओसीआय स्टँप असलेला जुना पासपोर्ट बरोबर नेला. लंडन, अॅम्स्टरडॅम, पॅरीस, मुंबई कुठेहि प्राॅब्लेम झाला नाहि...

आम्हि उभयतांनी रिनंशिएन लेटर हि घेतलेलं नाहि... Happy

आम्हि उभयतांनी रिनंशिएन लेटर हि घेतलेलं नाहि... >> हे तुम्ही तेव्हढ्याच अभिमानाने consulate ला पुढच्या applications च्या वेळी कळवा Lol

मूळ विषय हा होता कि OCI किंवा visa ची procedure एव्हढी भयंकर complicated का आहे. अगदी consulate consulate प्रमाणे बदलते.

>>आम्हि उभयतांनी रिनंशिएन लेटर हि घेतलेलं नाहि... >> हे तुम्ही तेव्हढ्याच अभिमानाने consulate ला पुढच्या applications च्या वेळी कळवा हाहा<<

हा हा. तशी संधी यायला हवि ना? ओसीआय लाइफलाॅंग वॅलिड असते...

सध्या PIO धारकांना नाममात्र किमतींत (आणि २ किलो कागदाच्या बदल्यात) OCI देतायत. लवकरच लाभ घेणारे.
जुनं PIO लाईफ टाईम साठी रिन्यू करून देतायत, पण काही वर्षांनी PIO प्रवेश बंद करू शकतील असं बीएलएस वाल्यांच स्पेक्युलेशन आहे.

ओसीआय लाइफलाॅंग वॅलिड असते...>> हो पण पासपोर्ट नाही नि नव्या पासपोर्ट वर OCI transfer करून घ्यायला हवे कि नाही ह्याबद्दल संदिग्धता आहे जरी होम मिनिस्ट्रीने तसे अजिबात जरुरी नाही हे म्हटलय ह्यावरून हे वरचे discussion सुरू झाले होते.

असामी, माझी वरची पोस्ट जरा वाचा, कळेस्तोवर... > > तुमचा अनुभव तो असला तरी सगळ्यांचाच तोच नाहीये. ह्यावरूनच ही चर्चा सुरु झालेली. प्रश्न काहीच नव्हता. ता वरून ताकभात ओळखा कि हो जरा.

अरेच्चा, माझा अनुभव युनीक आहे, असं म्हणायचंय? नविन पासपोर्टवर ओसीआय स्टॅंप नाहि आणि स्टॅंप असलेला जुना पासपोर्ट हि जवळ नाहि म्हणुन डिटेन केलं अशी केस माझ्यातरी पाहण्यात नाहि. तुमच्या पाहण्यात आहे?

तुमची युनीक केस आहे म्हणण्यापेक्षा हे भयंकर random आहे असे म्हणता येईल. बॉस्ट्नमधे दोन फॅमिली ज्या आठवड्याच्या अंतराने गेल्या त्यातल्या एकाला तुमच्यासारखा तर दुसर्‍यांना उलट अनुभव आला. डिटेन केले नाही पण जुन्या पासपोर्टच्या कॉपीज फॅक्स कराव्या लागल्या. नंद्याने आज त्याच्या community मधल्या कोणाला तरी बोर्ड करून दिले नाही असे बेकरीवर सांगितलेले.

Pages