भरलेले पापलेटांसाठी खालील जिन्नस:-
१. ४ भरलेल पापलेट.
२. वाटणासाठी: १ अख्खा ओला नारळ खिसलेला, जिरे १ लहान चमचा, १ कांदा लसुण, १/२ ईंच आले, अर्धी वाटी कोथिंबीर, ४-५ हिर्व्य मिरच्या. (तिखट आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करु शकता.)
थोडे मीठ आणि हळद.
३. मेरीनेशन साठी: हळद १ मोठा चमचा, लाल मसाला २ मोठे चमचे, मीठ चवीनुसार.
४. तेल खरपुस तळण्यासाठी.
कृती:
१. पापलेट स्वच्छ धुवुन कापुन घ्यावे. ( एकाबाजुने सारण भरता येईल असे. दुसर्या बाजुने नुसत्या चर्या पाडाव्यात म्हणजे मेरीनेशन व्यवस्थित लागेल.)
२. पापलेटला मीठ, मसाला, हळद वरील प्रमाणात लावुन मेरीनेट करावे. (हवे तर थोडे लिंबु पिळावे.) हे मेरीनेशन फ्रीझ मध्ये लावुन ठेवावे. (वेळ बघत बसायची गरज नाही. जेवढा वेळ तयारीला लागेल तेवढा वेळ ठेवुन द्यावा. जेणेकरुन पाणी सुटणार नाही.
३. १ अख्खा ओला नारळ खिसलेला, जिरे १ लहान चमचा, १ कांदा लसुण, १/२ ईंच आले, अर्धी वाटी कोथिंबीर, ४-५ हिर्व्य मिरच्या. (तिखट आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करु शकता.)
थोडे मीठ आणि हळद चवीनुसार घालावे आणि मिक्सर मध्ये बारीक वाटुन घेणे.
४. एका भांड्यात थोडे तेल गरम करणे आणि वरील सारण पाणि सुके पर्यंत शिजवणे. ह्याने सारणही शिजते आणि पाणी ही आटते.
५. वरील सारण थोडे थंड झाल्यावर ते मेरीनेट केलेल्या पापलेट मध्ये एका बाजुने स्टफ कारणे. चांगले दाबुन भरावे. जेणेकरुण तळताना बाहेर येणार नाही.
६. एका नॉनस्टिक तव्यात २ चमचे तेल टाकुन एक एक असे दोन पापलेट सोडावे.
७. एकदा गँस फास्ट करुन एक बाजु कुरकुरीत करावी आणि मग पलटुन घ्यावे. दुसरी बाजु थोडी मंद आचेव खरपुस तळावी.
८. लिंबु पिळुन फस्त करावे................
टीपः बुधवारी घाई असल्याने फोटो काढणे जमले नाही..... कोणि प्रयत्न केलात तर फोटो जरुर टाकावा.........
१. सारण भरताना थोडा कांदा वापरावा. आवड्त असेल तरच.....
२. लिंबु पिळावे. मेरीनेशन करताना.
३. खोबर्याचे प्रमाण सुसंगत असावे.
वा, वाचून तोंडाला पाणी सुटले.
वा, वाचून तोंडाला पाणी सुटले. आता मस्त सिझन सुरु झाला आहे तेंव्हा लवकरच हे ट्राय करून पाहतो.
अरे देवा शुक्रवारी अशा
अरे देवा शुक्रवारी अशा रेस्प्या वाचायच्या म्हंजे
बरं आहे फोटु नाहिये ते...
सारण शिजवून एकदा करून पाहिलं पाहिजे....
हुश्श! संपली एकदाची
हुश्श! संपली एकदाची दुर्गाष्टमी