बोंबलाच गोडं

Submitted by deepac73 on 26 October, 2012 - 00:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

६-८ ताजे बोंबील
६-८ लसुण पाकळ्यांची पेस्ट
१ मोठा चमचा तूप
२ लवंगा
१ छोटा चमचा हळद
१/२ वाटी ओले खोबरे, ४-५ काळे मिरे (चवीनुसार) आणि २-३ चमचे कोथिंबीर वाटून घ्या
मीठ चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

१. बोंबील धुवून २ इंचाचे तुकडे करून घ्या.
२. त्याला लसुण पेस्ट, हळद आणि मीठ लावून ३० मिनीटे ठेवा (जास्ती चालेल)
३. तूप गरम करून त्यात लवंगा टाका
४. आता त्यावर बोंबलाचे मिश्रण टाका
५. वाटण आणि २ वाट्या पाणी घाला
६. मिश्रण उकळून बोंबील शिजले की गरम भाताबरोबर वाढा

अधिक टिपा: 

ही "चित्रे" स्पेशल रेसिपी आहे. तापानंतर तोंडाला चव नसते तेव्हा देतात. सूपासारखी पण पीता येते.

माहितीचा स्रोत: 
साबा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users