"क्वार्टर ऑफ अ‍ॅन इंच" हेअरकट

Submitted by फारएण्ड on 25 October, 2012 - 10:47

सलून मधे खुर्चीवर जाऊन बसलो, "मिडियम", आणि भांग कोठून पाडायचा हे सांगून झाले, सलून मधली ती मुलगी तिच्या कामाला लागली, आणि मी आता वेळ कसा घालवावा विचार करू लागलो. भिंतीवरच्या फ्रेम्समधल्या हेअरस्टाईल्स आधीच बघून झाल्या होत्या. त्यातील एकही गेल्या दहाबारा वर्षातली दिसत नाही याचेही नावीन्य नव्हते. तेथे बसल्यावर तो घोस्ट वर्ल्ड का कशातील संवाद नेहमी आठवतो "The 80s have called and they want their hairstyle back". काही सलून्स मधे आरशात उलटा का होईना पण टीव्हीतरी दिसतो. येथे ते ही नव्हते. इतरही काही टाईमपास नव्हता. एकूण एखाद्या गावात व्हिलन अचानक उगवायच्या आधी सगळे लोक आपआपली कामे करत असतात तसे काहीसे वातावरण होते.

तेव्हढ्यात सलूनच्या दारात कोणीतरी आले म्हणून सलूनवाल्या कोणीतरी 'हाय' केले आणि मीही सहज तिकडे बघितले. तर साधारण नरेन्द्र हिरवाणीसारखा दिसणारा, अगदी ८७-८८ मधल्या तेंडुलकरची हेअर स्टाईल असणारा पण स्वतःला बहुधा चिरंजीवी, मिथुन किंवा रजनी समजणारा एकजण गुंडांच्या अड्ड्याच्या दारात एण्ट्री मारायला उभा राहतो तसा मधोमध उभा होता.

"Do you need a haircut?" सलूनवालीने विचारले.

"You think?" मी तिच्याकडे वळून ऑल्मोस्ट विचारले. कारण त्याच्याकडे एकदा बघितल्यावर हा प्रश्न पडायलाच नको होता. आणि त्यात एखादी 'एण्णोबडी लाईक' देसी गर्ल आली असती तरी ठीक आहे, पण वीकेंडला दुपारी २ वाजता एखादा देसी गाय सलूनमधे काय पेडिक्युअर करायला जाणार आहे? हे म्हणजे चिरंजीवीला "मै ये तुम्हारी लंका जलाने आया हू" वगैरे प्लेझंट्रीज झाल्यावर त्या गुंडांच्या म्होरक्याने "नमस्कार, मी आपली काय मदत करू शकतो?" विचारल्यासारखे झाले.

मग तो खुर्चीवर बसला. "how do you need your hair cut?" हा नेहमीचा प्रश्न आल्यावर त्याने लांबी, रूंदी मोजण्याची विविध मापे, दशमान पद्धती - इंच, सेमी वगैरेची स्वतःच्या हेअर स्टाईलशी गुंफण घालत माहिती दिली. त्यात "quarter of an inch" खूप वेळा येत होते. सुमारे पंधरा मिनीटे ते ऐकल्यावर साधारण कळाले की त्याला आहे ती हेअर स्टाईल ठेवायची होती, पण फक्त १/४ इंच कमी करायचे होते. त्यात 'मिडियम', 'स्मॉल', 'हेअर कट' वगैरे कीवर्ड्स नव्हते. सलूनवालीला वाटले की तो दुसर्‍याच कोणाशी तरी बोलत असावा. कारण हमाम मे सब काय काय असतात त्याप्रमाणे सलूनमधे सगळेच कोणाशीही बोलत असले तरी बहुतेक वेळा समोर आरशात बघून बोलतात.

त्यामुळे सर्व ऐकून घेऊन तिने शांतपणे विचारले, "so how do you need your hair cut?"

आता पुन्हा "गुंडांच्या अड्ड्यातील चिरंजीवी" मोडमधे एक उत्तर आले "I said, a quarter of an inch!". हे आधीच्या वाक्याच्या संदर्भाने येणारे "I said" फार डोक्यात जाते. बर्‍याच देसी लोकांना असे बोलायची सवय असते. त्याचा टोन साधारण असा असतो की मला सांगायचे ते मी आधी बरोबर सांगितले होते पण ही तुमची चूक आहे की तुम्ही माझा शब्द न शब्द अमृताप्रमाणे प्राशन केला नाहीत.

नंतर बहुधा त्याला काय सांगायचे होते ते तिला कळाले असे दोघांनाही वाटले असावे. मग १०-१५ मिनीटे त्या आघाडीवर शांतता होती.

पण मग एकदम ऐकू आले "you have cut way too much". बहुधा सलूनमधल्या सर्वांनीच तिकडे बघितले. तर त्याचे केस एकदम सरळ झालेले होते. मग त्याने तक्रार केल्यावर तिने त्यांचे मिशन स्टेटमेंट सांगितले "I follow what you say. I don't cut too much". मात्र येथे माझे काम झाल्याने उठावे लागले. तशी तेथे 'कामाशिवाय जास्त वेळ बसू नये' पाटी नव्हती, पण नाहीतरी त्याच्या शेजारच्या खुर्चीत बसून हसू आवरणे कठीण झाले होते. पण नंतर नक्की काय झाले कोणास ठाऊक. त्या सलूनची सर्वेलन्स व्हिडीओ टेप असेल तर बघायला हवी Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>पण वीकेंडला दुपारी २ वाजता एखादा देसी गाय सलूनमधे काय पेडिक्युअर करायला जाणार आहे>>><<

देसी गाय करतात की पेडिक्युअर... इथे वियतनामीज सलून मध्ये असतात एखादे अंकल... त्यांचे रबरासारखे रप्पड पाय घेवून पेडिक्युअर करायला बसलेले दिसतात की.. व दात फाकून इथे इथे बघत नाहीतर .. धिस साईड .. करत त्या पेडिक्युअर बाईला सांगत.

एका हेअरकट वर पेडिक्युअर वर सवलत व बॉडी मसाज हाफ प्राईस मध्ये , अंकल एकदम मजा करतात. बरोबर बायको नसतेच अर्थात त्या दिवशी. ४०$ मह्ये मजा. Proud

Lol

मस्त.. आवडला लेख.
कालच हेअर कट करून आलो. बयेला about half an inch same everywhere असं सांगितलं. यावेळेला तिला पण ते लगेच कळल्याचं जाणवलं. हुश्श करत निवान्त बसलो. बयेनी डायरेक्ट मशिन ने डोक्याच्या मधून पहीली लाईन मारली होती. मशीन बहुतेक एक इंचाची होती. मी म्हणालो this is way too short. बया उलट मलाच विचारते han?? you want shorter than this?? this is the last size I have..
बोलून काही उपयोग नव्हता कारण damage was already done.डोक्याच्या मधूनच लाईन गेली होती त्यामूळे इलाज नव्हता. an (half) inch everywhere एकदाचं झालं.
military cut पेक्षाही बारीक हेअर कट झाला होता. बया विचारते hope you like the cut.
वरुन या बयेला टीप द्या आणि घरी बयकोची बोलणी खा..

>>
फारएण्ड, तू थांबायला हवं होतंस, सगळी स्टोरी तरी कळली असती.
>> मग फार एन्ड चे केस एकदम सरळ झाले असते ़ Lol

मजा आहे. किमान तिथे इंग्रजीत बोललेलं कळेल, इथे .... Happy

माझ्या एका मैत्रिणिची चक्क बेबी कट केली. ती कोरियन मुलींची टिपिकल कट असते, कपाळावर केस. बिचारी महिनाभर डोक्याला ओढणी वगैरे बांधुन जायची. Happy

हायला Proud
एशियनच्या वाट्याला एकतर जात नाही आणि आलेच तर अज्याबात वाद घालत नाही. आता केस कापताना अगदीच एकमेकांना समजतं नाहीये वाटलं (ते वाटतच) की कोरियन कट असलं भलतं सांगीन. ड्यामेजात फ्याशन. Proud

Pages