CST दंगलखोरांच्या अटकेचा फेरविचार

Submitted by डँबिस१ on 25 October, 2012 - 03:27

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16950096.cms

मुंबई पोलिसांचे नीतीधैर्य वाढविण्याच्या गोष्टी करणारे आणि पोलिसांवर हात उचलणा - यांच्या नाकाबंदीच्या घोषणा करणारे मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ . सत्यपाल सिंह मुस्लिम समाजातील नेत्यांच्या दबावापुढे झुकले आहेत . सीएसटी हिंसाचाराप्रकरणी अटक करण्यात आलेल्या समाजकंटकांच्या अटकेचा फेरविचार करण्याचे आदेश सत्यपाल सिंह यांनी क्राइम ब्रँचला दिले आहेत .

गेल्या आठवड्यात मुंबईतील इस्लाम जिमखान्यात मुस्लिम समाजातर्फे सत्यपाल सिंह यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी मुस्लिम समाजातील काही नेत्यांची भाषणे झाली . या भाषणांचा रोख सीएसटी
दंगलीनंतर झालेल्या अटकांवरच होता . या प्रकरणाला हवा देण्यासाठी पोलिसांनी अनेक निष्पाप तरुणांना अटक केल्याचा आरोप मुस्लिम नेत्यांनी यावेळी केला . आझाद मैदानाजवळ पार्क केलेल्या बाइक आणण्यासाठी गेलेल्या तरुणांना पोलिसांनी आकसाने अटक केली आहे , असे सुनावतनाच , या तरुणांना ताबडतोब सोडून देण्याची मागणी या नेत्यांनी आयुक्तांकडे केली . पोलीस आयुक्तांवर मुस्लिम नेत्यांची ही दादागिरी पाहून उपस्थित पोलीस अधिकारीही अवाक् झाले . सिंग यांनी मुस्लिम नेत्यांपुढे तत्काळ शरणागती पत्करत अटकेचा फेरविचार करण्याची मागणी मान्य केली . इतकेच नव्हे तर पोलिसांनी चुका केल्याची कबुली दिली .

प्रत्यक्षात हिंसाचारानंतर अटक करण्यात आलेल्या तीन तरुणांना पुरा्व्याअभावी कोर्टाने आधीच सोडून दिले आहे . तर इतरांवर शस्त्रास्त्र बाळगणे , दंगल घडवणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे ही कलमे लावण्यात आली आहेत . मात्र , आयुक्तांच्या आदेशानंतर या सगळ्यांच्या अटकेचा फेरविचार करण्याचा दबाव आता पोलिसांवर वाढला आहे

मुस्लिम समाजालाही आता कळून चुकलय की पोलिस आयुक्ता वर ही दबाव आणता येतो.

बाकी हा विषय सुरु झाला तेंव्हा बर्याच लोकांनी आपले तारे तोडले होते, आपली अक्क्ल पाजळली होती.

आता तुमचा काय विचार आहे ?

तुमचेच विचार ईथे बघता येतिल, http://www.maayboli.com/node/37093

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्यक्षात हिंसाचारानंतर अटक करण्यात आलेल्या तीन तरुणांना पुरा्व्याअभावी कोर्टाने आधीच सोडून दिले आहे .

कोर्टाने सर्व पुरावे बघूनच निर्णय घेतला असणार... कोर्ट पारदर्शक व्यावहार करते, गुन्हा शाबीत झाले तर जबर शिक्षा देते, हे माया कोदलानी, बजरंगी केसमध्ये सिद्ध झालेले आहेच.. त्यामुळे केवळ तीन लोकाना सोडून दिले आणि ते तीघे एका विशिष्ट धर्माचे होते, याचा संबंध जोडण्यात काही अर्थ नाही.

आंबासाहेब,

कोर्टाने सर्व पुरावे बघूनच निर्णय घेतला असणार... कोर्ट पारदर्शक व्यावहार करते, १००% मान्य आहे.

पण पुरावे कोण जमा करत ? पोलीस

पोलीसांवर दबाव आल्यानंतर पोलीसांनी नीट तपास केला नाही आणि अपुर्‍या पुराव्याअभावी सुटका अशी प्रकरणे आजवर घडली नाहीत का ? माझ्या मते आहेत.

पण इतका उघड दबाब आणण्याची हिंमत कोणत्याही समाजात कशामुळे होते ? माझ्या मते मतपेटी

मग सामोपचार साहेब आपण मतपेटी द्वारे जे मताच्या दबावाला बळी पडणार नाही असे राज्य आणायला हवे.

मुस्लिम समाजालाही आता कळून चुकलय की पोलिस आयुक्ता वर ही दबाव आणता येतो.

त्यात चूक काय आहे? पोलिसानी निष्पाप लोकाना पकडले आहे, इनोसंट बायस्टंडर्सना पकडले, अशी कबुली स्वतः आयुक्तानी दिली, असे बातमीतच दिले आहे ना?? मग दबाव टाकणार्‍यांना दोष द्यायचे कारण काय? केवळ ते मुसलमान आहेत म्हणून??

त्यातूनही, फोटो, फिल्म यांच्या आधारे जे दोषी सिद्ध होतील , त्याना कायदा शिक्षा देईल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नसावी.

मुंबईत तोडफोड आणि बस जाळाजाळी असे आजवर मुस्लमानच कशाला हिंदुनीही केलेले आहेच ना? त्यातल्या किती प्रकरणात किती जणाना शिक्षा झाली??? त्यातही पकडले गेलेले लोक चार दिवसाने सुटतातच ना? त्याना हारतुरे घालायला तुम्हीच जाता ना??

संघटनेच्या आदेशानुसार झालेल्या मोर्चाने काही केले तर संघटनेला जबाबदार धरायची कायद्यात तरतूद आहे... लोक किती सुटले, यापेक्षा आता त्या संघटनेच्या खिशात कसा हात घालता घेईल, हे पहा ना!!

तर इतरांवर शस्त्रास्त्र बाळगणे , दंगल घडवणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे ही कलमे लावण्यात आली आहेत . मात्र , आयुक्तांच्या आदेशानंतर या सगळ्यांच्या अटकेचा फेरविचार करण्याचा दबाव आता पोलिसांवर वाढला आहे

हे पण त्यात आले का ?

<<<<<<< त्यातूनही, फोटो, फिल्म यांच्या आधारे जे दोषी सिद्ध होतील , त्याना कायदा शिक्षा देईल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नसावी.>>>>>>>>>>>

आंबा १ ....

Biggrin Biggrin Biggrin

Biggrin Biggrin Biggrin

पोलिसांना म्हणे आणखी लोकांचा सुगावा लागला आहे पण त्यांना ईद संपल्यावर अटक केले जाईल. आणि चक्क असे वर्तमानपत्रात छापले आहे.
आनंद आहे