'महफिल-ए-गझल'- पंकज उधास (पासेस उपलब्ध)

Submitted by माध्यम_प्रायोजक on 25 October, 2012 - 01:44

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझलगायक म्हणून मान्यता पावलेले पद्मश्री श्री. पंकज उधास यांच्या मैफलीचा लाभ पुणेकरांना बर्‍याच वर्षांनी मिळणार आहे. २७ ऑक्टोबर २०१२ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता राजाराम पुलाजवळील 'महालक्ष्मी लॉन्स' (कर्वेनगर) येथे ही 'महफिल-ए-गझल' संपन्न होईल.

pankaj.jpg

'महफिल-ए-गझल' साठीचं आपलं तिकिट खालील पत्त्यावर संपर्क साधून मिळवता येईल.
एलिगंट शोबिझ प्रा. लि.
२१४८, विजयानगर कॉलनी,
हॉटेल कावेरीसमोर, सदाशिव पेठ, पुणे

किंवा
८८०५०२७३३० या क्रमांकावरही यासाठी संपर्क साधता येईल.

***
खास मायबोलीकरांसाठी या कार्यक्रमाचे काही पासेस उपलब्ध झाले आहेत. हा पास मिळवण्यासाठी खेळायचा आहे 'क्विझ' चा एक साधा सोपा खेळ. खालील सोप्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला संपर्कातून कळवा. उपलब्ध पासेसपेक्षा जास्त मायबोलीकरांनी उत्तरं दिल्यास 'ड्रॉ' पद्धतीने नावे निवडून त्यांना पासेस देण्यात येतील.

१) पंकज उधासांच्या गझलांचा पहिला अल्बम कोणता? तो कधी प्रसिद्ध झाला?
२) त्यांच्या इतर कुठच्याही तीन अल्बम्सची नावे सांगा.
३) पंकज उधासांनी कुठच्याही दूरदर्शन वाहिनीवर सादर केलेल्य्ता एखाद्या कार्यक्रमाचं नाव सांगा.
४) त्यांच्या बंधूंचं नाव काय? कुठच्या क्षेत्रात त्यांचं नाव प्रसिद्ध आहे?
५) पंकज उधास यांना मिळालेल्या कुठच्याही दोन पुरस्कार / पारितोषिकांची नावं सांगा.

ऑल द बेस्ट!! Happy

***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तरे पाठवली आहेत. २ पासेस मिळतील का? (हवे असल्यास दोनदा उत्तरे पाठवते. Happy )
मायबोली असे कार्यक्रम वारंवार आयोजित करो. शुभेच्छा.

धन्यवाद मित्रहो. एकच पास देणे शक्य होणार आहे. पासेस शिल्लक राहिल्यास किंवा ऐनवेळेला जास्तीची तिकिटे उपलब्ध झाल्यास दोन देता येतील, पण त्यासंदर्भात नक्की काय ते उद्याच कळेल.

उत्तरं पाठलेल्यांनी कृपया ०७३८७९९९१६८ वर आपला आयडी, खरं नाव आणि राहण्याचं ठिकाण ही माहिती एसएमएस करावी, ही विनंती.