लिस्ट ही संपेचना !

Submitted by सुप्रिया जाधव. on 21 October, 2012 - 03:38

दु:ख, जखमा, वेदना....
लिस्ट ही संपेचना !

नेटके बोलू कशी ?
म्यूट करते वल्गना !

आपले मानू कुणा ?
फ्रिझ्ड जर संवेदना !

भेटुया स्वप्नामधे..
जस्ट ही संभावना !

साथ दे जन्मांतरी
ओल्ड ही संकल्पना !

एकटी धावू किती ?
लिफ्ट दे ना जीवना !

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंग्रजी शब्दांच्या ठराविक वारंवारतेने केलेल्या वापरामु़ळे हझलीश टच आला आहे गझलेला

मीटरही लहान असल्याने फार वाव नाही वाचकाला

दुखावला गेला असल्यास क्षमस्व

नेटके बोलू कशी ?
म्यूट करते वल्गना !

आपले मानू कुणा ?
फ्रिज्ड जर संवेदना !

एकटी धावू किती ?
लिफ्ट दे ना जीवना !

>>>>>>>>>> जबरदस्त !

खूप मजा आली वाचताना.. नुसता शब्दखेळ नसून, अर्थपूर्णही आहे. म्युट वल्गना, फ्रिझ्ड संवेदना आणि जीवनाकडे 'लिफ्ट मागणे' हे खूप परिणामकारक विचार वाटले.
मतल्यात दम नाही वाटला मात्र.

हझलीश टच आला आहे >>> होय ; मलाही तसे जाणवले

पण

मजा आली....अर्थपूर्णही आहे....म्युट वल्गना, फ्रिझ्ड संवेदना आणि जीवनाकडे 'लिफ्ट मागणे' हे खूप परिणामकारक विचार वाटले.>>>>> सहमत !!

मागे एकदा चर्चेत असे पुढे आले होते की छोट्या बहरींमधे वाचक गुंतत नाही.

प्रयोग नावीन्यपूर्ण आहे आणि सहज गंमत म्हणून हाताळायला ठीकच आहे.

मन डचमळवणार्‍या शेरांचा अंतर्भाव असलेल्या पुढील गझलेच्या प्रतिक्षेत.

शुभेच्छा!

कुणीतरी अवधूत गुप्तेला पाठवा रे ही रचना! Wink
ह्याआधी मराठी-उर्दू अश्या मिश्र गझला ऐकल्या होत्या....आता मराठी-इंग्रजी...
वैयक्तिक मला हा द्वैभाषिक प्रकार फारसा आवडला नाही....तरीही सांगतो की भविष्यात अश्या रचना सर्रास येण्याची दाट शक्यता आहेच....त्यावेळी आद्य मिश्रभाषा गझलकारात सुप्रियाचाही उल्लेख करावाच लागेल Happy

! Happy !