Submitted by सुप्रिया जाधव. on 21 October, 2012 - 03:38
दु:ख, जखमा, वेदना....
लिस्ट ही संपेचना !
नेटके बोलू कशी ?
म्यूट करते वल्गना !
आपले मानू कुणा ?
फ्रिझ्ड जर संवेदना !
भेटुया स्वप्नामधे..
जस्ट ही संभावना !
साथ दे जन्मांतरी
ओल्ड ही संकल्पना !
एकटी धावू किती ?
लिफ्ट दे ना जीवना !
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इंग्रजी शब्दांच्या ठराविक
इंग्रजी शब्दांच्या ठराविक वारंवारतेने केलेल्या वापरामु़ळे हझलीश टच आला आहे गझलेला
मीटरही लहान असल्याने फार वाव नाही वाचकाला
दुखावला गेला असल्यास क्षमस्व
गजलची आहे तुझ्या, चांगली ही
गजलची आहे तुझ्या,
चांगली ही कल्पना!!!
नेटके बोलू कशी ? म्यूट करते
नेटके बोलू कशी ?
म्यूट करते वल्गना !
आपले मानू कुणा ?
फ्रिज्ड जर संवेदना !
एकटी धावू किती ?
लिफ्ट दे ना जीवना !
>>>>>>>>>> जबरदस्त !
खूप मजा आली वाचताना.. नुसता शब्दखेळ नसून, अर्थपूर्णही आहे. म्युट वल्गना, फ्रिझ्ड संवेदना आणि जीवनाकडे 'लिफ्ट मागणे' हे खूप परिणामकारक विचार वाटले.
मतल्यात दम नाही वाटला मात्र.
हझलीश टच आला आहे >>> होय ;
हझलीश टच आला आहे >>> होय ; मलाही तसे जाणवले
पण
मजा आली....अर्थपूर्णही आहे....म्युट वल्गना, फ्रिझ्ड संवेदना आणि जीवनाकडे 'लिफ्ट मागणे' हे खूप परिणामकारक विचार वाटले.>>>>> सहमत !!
मस्त आहे..
मस्त आहे..
मागे एकदा चर्चेत असे पुढे आले
मागे एकदा चर्चेत असे पुढे आले होते की छोट्या बहरींमधे वाचक गुंतत नाही.
प्रयोग नावीन्यपूर्ण आहे आणि सहज गंमत म्हणून हाताळायला ठीकच आहे.
मन डचमळवणार्या शेरांचा अंतर्भाव असलेल्या पुढील गझलेच्या प्रतिक्षेत.
शुभेच्छा!
एकटी धावू किती ? लिफ्ट दे ना
एकटी धावू किती ?
लिफ्ट दे ना जीवना !
सुप्रिया छानच!
'फ्रिझ्ड' शब्द 'फ्रोझन रॉक'
'फ्रिझ्ड' शब्द 'फ्रोझन रॉक' सारखा खटकतोय. बाकी मस्त कल्पना.
कुणीतरी अवधूत गुप्तेला पाठवा
कुणीतरी अवधूत गुप्तेला पाठवा रे ही रचना!
ह्याआधी मराठी-उर्दू अश्या मिश्र गझला ऐकल्या होत्या....आता मराठी-इंग्रजी...
वैयक्तिक मला हा द्वैभाषिक प्रकार फारसा आवडला नाही....तरीही सांगतो की भविष्यात अश्या रचना सर्रास येण्याची दाट शक्यता आहेच....त्यावेळी आद्य मिश्रभाषा गझलकारात सुप्रियाचाही उल्लेख करावाच लागेल
<<आपले मानू कुणा ? फ्रिझ्ड जर
<<आपले मानू कुणा ?
फ्रिझ्ड जर संवेदना !>> हा शेर जास्त आवडला
आवडली .
आवडली .
थोडक्यात पण अर्थपूर्ण !
थोडक्यात पण अर्थपूर्ण !
चांगली वाटली सुप्रिया..
चांगली वाटली सुप्रिया..
छान वाटली, आवडली..
छान वाटली, आवडली..
मस्त गझल... आवडली.
मस्त गझल... आवडली.
चांगला प्रयोग आहे. आवडला.
चांगला प्रयोग आहे. आवडला.
सगळ्या प्रतिसादकांचे
सगळ्या प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार !
-सुप्रिया.
छान. मला आवडली ही गझल.
छान.
मला आवडली ही गझल.
नवीन प्रयोग आवडला!
नवीन प्रयोग आवडला!
गंमतशीर प्रयोग आहे. पण शेवटी
गंमतशीर प्रयोग आहे.
पण शेवटी गंमतच! कधी तरी करण्यास हरकत नसावी..!
छान आहे.
! !
! !
छान गं सुप्रिया! आवडली
छान गं सुप्रिया! आवडली
धन्स मंडळी .
धन्स मंडळी .