माझं पत्र

Submitted by मी मधुरा on 19 October, 2012 - 09:56

सांग बर स्वप्नात येऊन
उगाच का छळाव ?
पाहून प्रेम आपल्यातल
जग सार जळाव

गुण नाही तरी चालेल
मन मात्र जुळाव
पण शॉपिंग साठी का बर
धन माझ उकळाव ?

मला एवढंच वाटत
माझं पत्र तुला मिळाव
मनात दडलेलं माझं
प्रेम तुला काळाव

पत्र पाहून घरच्यांना
वाटतंय मला गिळाव
मी हि करतोय विचार
लपाव... कि पळाव ??

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users