तिजा की फज्जा

Submitted by नितीनचंद्र on 17 October, 2012 - 23:17

अरविंद केजरीवालांनी प्रथम काँग्रेसच्या अध्यक्षांचा जावई नंतर सलमान ख्रुर्शीद आणि तिजा करुन नितीन गडकरींवर शरसंधान केले.

संध्याकाळी सहा वाजता इतका गोंधळ आणि इतके आरोप होते ( पुढे वेगवेगळ्या वाहिन्या आणि प्रतिस्पर्धी पक्षांचे नेते व कार्यकर्ते ) यात मुळ आरोप काय होता हेच समजत नव्हते.

आरोप होता कोणत्याश्या धरणाची अतिरिक्त जमीन अजित पवारांच्या काळात नितीन गडकरी यांना दिली.
आरोपाची धार अशी होती.

१) ती जमिन आता नितीन गडकरी यांच्या खाजगी मालकीची आहे
२) शेतकर्‍यांचा हक्क डावलुन नितीन गडकरी यांना देण्यात आली आहे.
३) चार दिवसात यावर निकाल झाला म्हणजे सर्व पक्षांचे एकमेकांशी साटेलोटे आहे.

प्रत्यक्षात जेव्हा टीम भाजपा रणांगणात उतरली तेव्हा सुमारे ८ वाजता बहुतेक वाहिन्यांनी गाषा गुंडाळला होता.

आरोपाची धार कायदेशीर न रहाता नैतीकतेच्या मुद्यावर केंद्रित झाली.

कम्युनिस्ट पक्षाचे श्री अभ्यंकर यांनी या निमित्ताने उपस्थित केलेला मुद्दा मात्र योग्य होता की जेव्हा पॉलिसी डिसीजन घेतले जातात ते सर्व वेळा जनहिताचे नसतात यावर विरोधी पक्ष बोलत नाही

उदा. धान्यापासुन दारु तयार करणे आणि या योजनेने लाभार्थी

हे सर्व पहाता आता केजरीवालांची पोतडी खाली झाली असे वाटते. आता इतर राजकिय पक्षांनीच काही दारुगोळा पुरवला तर ही तोफ वाजणार की काय ?

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याला तोफा वाजविण्यात विंटरेस्ट आहे, की उद्याच्या दिवशी माझे जगणे जरा सुसह्य होऊ शकेल असा करकोचा राजा* म्हणून डोक्यावर बसेल, यात?

(*इसापनीती, ओंडका, बेडूक व करकोच्याची गोष्ट)

मी आधी म्हणालोच ना, कि केजरीवाल यांचा आता स्वतःवर ताबा राहिला नाही ! मिडीयाला पण दोष देण्यात काय अर्थ ? ते खेळ करुन दाखवतात कारण आपण बघतो, आणि फक्त बघतोच.

हं.
इथे माझे मत लिहितो. कारण इतर दोन धाग्यांवर लोक वेगळ्याच लाईनवर चालत आहेत, अन माझं नेहेमी तिसरंच असतं.

केवळ केजरीवाल सांगत आहेत त्या प्रकाराने 'भ्रष्टाचार बंद करा' या एकमेव मुद्यावर मी स्वतः कुणालाही अजीबात मत देणार नाही. देश चालवण्यासाठी इतर अनेक महत्वाच्या पॉलिसीज ठरवाव्या लागतात, त्यासाठी रिसोर्सेस कुठून आणणार, व त्यांचा वापर कसा करणार याची एक व्हिजन लागते. आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दलही विचार असावे लागतात. डिफेन्स, फायनान्स, अ‍ॅग्रीकल्चर, ह्यूमन रिसोर्सेस एक ना अनेक हजार गोष्टी असतात.

या पैकी एकाही बाबीवर या बाबाने विचार केला आहे असे जाणवले नाही. इथे 'त्यांचा' भ्रष्टाचार बंद करा असा एक कलमी अन एककल्ली कार्यक्रम फक्त आहे..(त्यांचा म्हणजे मोठ्यांचा. गल्लीबोळातला नाही- तो विषय काढला की पाठीराख्यांची गर्दी गायब होते.)

जोपर्यंत तुमच्या माझ्यासारखे लोक आपल्या जगण्यातली नीतीमत्ता वाढवून लहान सहान लाचखोरी बंद करीत नाहीत, तोपर्यंत फक्त त्या अमुक मंत्र्याने इतक्या हजार कोटींचा घोटाळा केला. माझ्या १०००-५०० रुपयाच्या लाचेने काहीच फरक पडत नाही असे आपल्याला वाटते तोपर्यंत हा देश बुडितखातीच रहाणार आहे. कारण १०० कोटींचा भ्रष्टाचार करणारे मंत्री सगळे मिळून १०० असतील, या देशातले ११० कोटी लोक प्रत्येकी १०० रुपयाचा घोळ रोज करू लागलेत तर कसे व्हावे?

भ्रष्टाचार बंद करण्याचा तोच एकमेव इलाज मला तरी दिसतो. पोलीस पहात नाही म्हणून चोरी केलेली/राँगसाईडने गेलेले/नियम तोडलेले चालतील अशी मानसिकता आपली प्रत्येकाचीच आहे... पोलीसांची संख्या वाढवून, वा कायद्यांची संख्या/कडकपणा वाढवून यात फरक पडत नाही. उलट लाचखोरीची नवी कुरणे उभी राहतात, असा अनुभव आहे.

बस फक्त..........१ वर्ष अजुन थांबा........ पण जर या हिवाळी अधिवेशनात सरकार पाडल....आणी मध्यवर्ती निवडणुका झाल्या..(होउ शकत) तर मग धम्माल उडणार आहे.........

उदयन,
अहो धमाल उडेल, धुळवड होईल, चार घटका मज्जा येईल. ओंडके जाऊन करकोचे येतील डोक्यावर.
आमचा काँग्रेसी मित्र नेहेमी सांगत असे. या काँग्रेसवाल्यांनाच सत्तेवर आणायला हवे. कारण यांनी आधीच ७ पिढ्या पुरेल इतके खाल्ले आहे. आता उगा सवय म्हणून ८वीची तयारी करताहेत. पण दुसरे आले, तर आजच त्यांना ७ पिढ्या पुरेल इतकं खाण्याची घाई होणारे.
प्रत्येक मतदार संघात काँग्रेसचाच नं२ चा पुढारी, तिथे तिकिट मिळणार नाही, म्हणून इतर पक्षांत गेलेला दिसला आहे .. अपवाद असतीलही, पण हेच चित्र सगळीकडे.
अन महाराष्ट्रात तरी आत्ताच दोन्ही हातानी खाऊ असा कार्यक्रम पहायला मिळालेला आहे मला तरी.

धमाल पहायची इच्छा संपलीये माझी तरी. सुखाने, सुरक्षिततेने, स्वाभिमानाने जगता येईल असा देश असावा असं वाटतं.

मला वयक्तिक म्हणाल तर काँग्रेस नकोच आहे सत्ते वर........अजिबातच नाही.......पण दुसरे कोणीच नाही आहे.... मला पर्याय हवा तो ही सशक्त.....काँग्रेस ला देशाबाहेर हकलुन द्या.....एकाही राज्यात सत्ता नको तिची.....
.
.इथपर ठिक आहे........ पण देशभरात अजुन दुसरा पक्षाचे नाव सांगा जो स्पष्ट बहुमत मिळवेल.....????? इतर जे पक्षांची सत्ता येणार नाही अश्यांना मत देणे म्हणजे आपले मत वाया घालवने.....गुजरात मधे जसे मोदी आला... तसा कोणी आला तर मत इतरांना देणे योग्य ठरेल....परंतु तो ज्या पध्दतीने सत्तेवर आला ती पध्दत मला मंजुर नाही.....हा त्याने जो विकास केला तो काबिले तारीफ आहे.... पण मला विकासासाठी ती पध्दत नकोय.....
.
.
प्रत्येक धोरणे रस्त्यावर नाही बनत..... प्रत्येक धोरण हे सार्वमत घेवुन ठरवत बसले तर भिक नको पण कुत्रा आवर असे म्हणायची पाळी येईल... उद्या खरच दरवाढ करायची झाल्यास कोण नागरीक हो म्हणेल ?????

खरतर दरवाढ करायची असल्यास जिथे ५ रुपये तुट असेल तिथे सरळ १० रुपये दरवाढ करावी....... जो नफा होईल तेल कंपन्याना तो सरकार ने घेउन ......जेव्हा तेलाचे भाव वाढतील तेव्हा तो नफा दरवाढ न करता त्यांना वाटुन टाकावा ...... म्हणजे सारखी दरवाढ करुन करुन उगाच जनतेचा ताप वाढवु नये

उदयन,
१. इतर जे पक्षांची सत्ता येणार नाही अश्यांना मत देणे म्हणजे आपले मत वाया घालवने.<<

मत वाया घालवणे हा कन्सेप्टच मला कळत नाही.
अमक्याला मी मत दिले अन तो निवडून आला नाही, म्हणून माझे मत वाया कसे गेले? माझ्यापेक्षा जास्त लोकांचे मत माझ्यापेक्षा वेगळे होते, इतकाच त्याचा अर्थ आहे.
मत वाया जायला नको म्हणून चुकीच्या माणसाला देणे यासारखा मूर्खपणा दुसरा नाही असे मला वाटते.

२. सार्वमत

सार्वमत घेऊन धोरण ठरवत बसायला लागू नये म्हणूनच 'लोकप्रतिनिधी' तिथे असतात. अन त्यांनी साधक बाधक चर्चा करून धोरण ठरवले, ते सर्वांनाच चांगले ठरेल असे असावे अशी अपेक्षा असते.

आता या पॉईंटवर मी दिनेशदांच्या पक्षविरहिततेची चर्चा थोडी करू इच्छितो.
पक्ष असण्याचा फायदा असा असायला हवा, की त्या पक्षातील सर्वांची ध्येय धोरणे सारखी असतात.
इथे माझ्या मतदारसंघात मी मत दिलेल्या पक्षाचा उमेदवार पडला, तरी त्या पक्षाचे थोडेफारतरी लोक संसदेत पोहोचलेले असतात. यांनी प्रत्येक विधेयक चर्चेस येते तेव्हा सकारात्मक विरोध करून सत्ताधारी पक्षाला ताब्यात ठेवणे अपेक्षित आहे. This way, my vote does NOT go waste. कारण मी मत विशिष्ट विचारप्रणालीला दिलेले असते.

आज समाजाच्या सगळ्याच क्षेत्रातली नैतिकता ढासळलेली असताना, त्याचे 'लोणी' म्हणा, किंवा स्कम म्हणा, पुढार्‍यांच्या रूपाने तरंगून वर येणार नाही काय? People DO get the government they deserve.

इब्लिस / उदयन दोघांशीही सहमत...

पण प्रत्येक सत्ताधारी, या देशाची धोरणे ठरवणार का ? एक देश म्हणून आपले धोरण कधी ठरणार ?
एखाद्या लिमिटेड कंपनीची कशी स्वतःची पॉलिसी असते, मिशन स्टेटमेंट असते, तसे आपल्या देशाचे
का नसावे ?

टाटांचे व्यवस्थापन मी आणि माझ्या वडीलांनी देखील अनेक वर्षे प्रत्यक्ष अनुभवले आहे. स्वातंत्र्यानंतर त्यांना
जर देश चालवायला दिला असता, तर आज चित्र बरेच वेगळे दिसले असते, असे राहून राहून वाटतेय.

पण प्रत्येक सत्ताधारी, या देशाची धोरणे ठरवणार का ?
<<
दिनेशदा,
अहो, त्यासाठीच तर आपण त्यांच्या हाती सत्ता दिलिये/देतो आहोत ना? Its their job, and they should do it well.

आजकालच्या राजकारण्यांत बरेच उच्चशिक्षित दिसतात.. होपफुली चित्र बदलेल लवकरच. कंट्री रन ऑन कॉर्पोरेट लाईन्स?

इब्लिस
<<मत वाया घालवणे हा कन्सेप्टच मला कळत नाही.>> बरोबर माझे मित्र, माझा भाउ जेंव्हा असे म्ह्णायचे तेंव्हा मला कळ्याचे नाही "मत कसे वाया जाते?" पण मग कळाले कि ही एक "मानसिक" प्रक्रिया/आवशक्यता आहे विजेत्याबरोबर असण्याची.

<> बरोबर आणि चूकही. शिवाजी महाराज, Lincoln ... मिळाले ते not because people deserved them to get those.

<<कारण १०० कोटींचा भ्रष्टाचार करणारे मंत्री सगळे मिळून १०० असतील, या देशातले ११० कोटी लोक प्रत्येकी १०० रुपयाचा घोळ रोज करू लागलेत तर कसे व्हावे?>> गणित चुकते आहे. दोन्ही आकडे जवळपास समानच आहेत "रोज" वगळल्यास. असो तुमचे वाक्य उदाहरण म्हणून आहे हे माहीत आहे पण दोन्ही भ्रष्टाचार एकाच पारड्यात तोलणे म्हणजे "हरिण आणि वाघ यांना एकच खाणे द्या" म्हणण्यासारखे आहे.

सुसुकु,
१. बद्दल सहमत.
२. लिंकनचं ठाऊक नाही. त्यांच्याबद्दल तितका अभ्यास नाही माझा. पण, शिवाजी महाराज.
त्यांना त्यांच्या समकालीनांनी, लहान-थोर सर्वच. साथ दिली नसती, तर काय झाले असते? साथ देणार्‍यांनी दिली. प्रजेने दिली, म्हणून राजे उभे राहू शकले. त्यांच्यापाशी उत्तुंग क्षमता अन दृष्टी होतीच. पण एकट्याने तोरणा मिळाला असता काय? सोबत नोकरांना घेऊन शपथ नव्हती घेतली थोरल्या राजांनी. सोबत होते, सोबती सवंगडी. यू सी? पीपल. & पीपल गॉट द गव्हर्नमेंट दे डिझर्वड!
३. इथेच तर लोचा आहे. ऑफकोर्स एकच खाणे अन शिक्षाही द्यायला हवी.
२ हजार कोटीचा लोचा २ रुपयाच्या लाचेपेक्षा वाईट, २ रुपयांची लाच सोडून द्या, असे म्हटले, तर तोच २ रुपयेवाला उद्या उठून २ हजार कोटीवर पोहोचतो. फाशी चढताना त्या मुलाने आईचा कान चावल्याची कथा आठवतेय ना?
२ रुपये खाल्लेत तरी किमाण २०० फट्के. Wink

प्रतिसाद झडु लागले ? धन्यवाद

मुद्दा फक्त केजरीवाल आणि त्यांच्या भ्रष्टाचार विरुध्दच्या वार्ताहर परिषद आणि लोकांना समजलेले आत्तापर्यंतचे सत्य यावर केंद्रित व्हावी.

( आत्तापर्यंतचे सत्य असे लिहीण्याचे कारण की मध्यंतरी डॉ अभय बंग यांच्या मुलाखतीत सत्याग्रह म्हणजे संपुर्ण सत्य नव्हे तर जास्तीत जास्त सत्य माहित करुन घेण्याचा आग्रह ही नवीन गोष्ट समजली. त्यांच्या मते संपुर्ण सत्य बाहेर येण्यास काही काळ जावा लागतो. पण यावर चर्चा कृपया नको. या विषयाच्या तज्ञांनी दुसरा धागा उघडावा)

तुमच्या प्रवानगी शिवाय तुमचा धागा हायज्याक करण्यात आलेला आहे @ नितीन्चन्द्र Wink शिवाय माबोच्या चालीरीतींनुसार प्रस्तावास धरूनच प्रतिसाद हवेत असे थोडेच आहे?

विनंती आहे. जे अजिबात प्रतिसादच देत नाहित त्यांना मुद्याला धरुन वाचायला मिळावे इतकी माफक अपेक्षा लिहण्यास @ इब्लीस आपली हरकत नसावी.

तुमच्या प्रवानगी शिवाय तुमचा धागा हायज्याक करण्यात आलेला आहे
परवानगी घेण्याची आणि मुळ मुद्याला धरुन आदरपुर्वक ( लिहीणार्‍याचा व त्याच्या मताचा ) लिहण्याची सुध्दा आवश्यकता इथे नसते हे मला माहित आहे.

आज दिग्विजयसाहेबांनी केजरीवालांना प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना केजरीवाल म्हणाले प्रथम कोळसा प्रकरणावर पंतप्रधान, वड्रा आणि हरीयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत.

आत्ता आपण कोळशाबद्दल बोलू. प्रथम मी जातोय दिग्विजयांकडे, दिग्विजय, उत्तर द्या! दिग्विजयांचा संपर्क तुटलेला दिसतोय, आपण परत बोलू या. सध्या एक ब्रेक..

@इब्लिस
या देशातले ११० कोटी लोक प्रत्येकी १०० रुपयाचा घोळ रोज करू लागलेत तर कसे व्हावे?<<

इतक्या मोठ्या लोकसंख्येला भ्रष्टाचाराने पैसे कमावण्याची संधी नसते हो.

वादासाठी मान्य करतो तुमचं. जितक्यांना अस्ते, त्या सर्वांच्या संधी अन टोट्ल काढा. हा तुमचा होमवर्क आजचा Wink

केजरीवाल, तुमची रणनीति चुकली आहे.
मुळात तुम्ही इतक्यातच राजकारणात शिरून सध्यातरी अर्धी लढाई हारलाच आहात.
आता तुमची रणनीती उरलेली अर्धि लढाईही हारण्यासाठीच आखली अस्ल्यासारखी वाटते आहे.
तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था निर्माण करायचि आहे ना? तर त्यासाठी नवे कायदे, घटना दुरुस्त्या, कायद्यांची अंमलबजावणी इ. करून घ्यायला शेवटी जे कोणी सत्तेवर असतील त्यांच्यावर प्रचंड दबाव आणावा लागेल वा स्वता सत्तारूढ व्हावे लागेल. तुमचे सत्तारूढ होणे ही सध्यातरी अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे जे कोणी केंद्रात सत्तेवर आहेत, ज्यांच्या हाती इन्कम टॅक्स, सीबीआय इ आहेत अशांवर दबाव आणणे हा एकच मार्ग आहे. तुमच्या दोन तीन हजार कार्यकर्त्यांच्या जोरावर हे अशक्य आहे.
सत्तेत असणार्‍यांना भ्रष्टाचार करणे व तो पचवणे यासाठीच्या संधी अधिक असतात. तुलनेने विरोधकांजवळ त्या खूप कमी असतात.
त्यांच्या त्यांच्या स्वार्थासाठी का होईना सत्तेवर नसलेले लोक तुमच्या मागे उभे राहू शकतात. त्यांच्यातही भ्रष्ट असतीलच पण ते सध्या तरी सत्तारूढांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यास हातभार लावतील. हे काम तुमच्या उद्दिष्टाला पूरकच आहे ना? आता सत्तेत नसलेल्यांचा भ्रष्टाचार अवेळी बाहेर आणून तुम्ही तुमचे बळ तर कमी केले आहेच पण सत्तारूढ पार्टीचे हात बळकट केले आहेत. नव्हे भ्रष्ट व्यवस्थाच बळकट केली आहे. तुमची रणनीति चुकली आहे.
आताच्या विरोधि पक्षियांचा भ्रष्टाचार उघड करायला सत्तारूढ पक्ष उत्सुक आहेतच. ते काम त्यांना करू द्या. आपल्या तुटपुंज्या साधनसामुग्रीचा उपयोग तुम्ही फक्त सत्तारूढ पक्षांविरुद्धच वापरायला हवा.
आजचे विरोधक यदाकदाचित सत्तेवर आले तर हाच न्याय तुम्हाला त्यांच्याविरुद्धही वापरता येइल.
तुमच्या समर्थकांनाही तुमच्या या रणनीतीने चकीत केले आहे. तुम्ही हारण्यासाठी लढताय का?

त्यांच्या त्यांच्या स्वार्थासाठी का होईना सत्तेवर नसलेले लोक तुमच्या मागे उभे राहू शकतात. त्यांच्यातही भ्रष्ट असतीलच पण ते सध्या तरी सत्तारूढांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यास हातभार लावतील. हे काम तुमच्या उद्दिष्टाला पूरकच आहे ना? आता सत्तेत नसलेल्यांचा भ्रष्टाचार अवेळी बाहेर आणून तुम्ही तुमचे बळ तर कमी केले आहेच पण सत्तारूढ पार्टीचे हात बळकट केले आहेत. नव्हे भ्रष्ट व्यवस्थाच बळकट केली आहे. तुमची रणनीति चुकली आहे.
आताच्या विरोधि पक्षियांचा भ्रष्टाचार उघड करायला सत्तारूढ पक्ष उत्सुक आहेतच. ते काम त्यांना करू द्या. आपल्या तुटपुंज्या साधनसामुग्रीचा उपयोग तुम्ही फक्त सत्तारूढ पक्षांविरुद्धच वापरायला हवा.
आजचे विरोधक यदाकदाचित सत्तेवर आले तर हाच न्याय तुम्हाला त्यांच्याविरुद्धही वापरता येइल.
तुमच्या समर्थकांनाही तुमच्या या रणनीतीने चकीत केले आहे. तुम्ही हारण्यासाठी लढताय का?
------ संपुर्ण पोस्ट मधिल विचारांशी असहमत.... एक वेळा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढायचे म्हटल्यावर त्यात विरोधी आणि सत्ता पक्ष असा भेद आपण करत नाही आहोत हे केजरीवालांना "दाखवायचे" आहे.

आता असे करतांना ते काही लोकांना दुरावतील पण याच रणनितीमुळे ते काहींना (ज्यांना कुणाचाच भ्रष्टाचार मान्य नाही आहे) आकर्षित करतील.

आपण निष्कर्ष काढायची घाई करु नाही. १-२ वर्षांत केजरीवाल किती खरे आणि किती गंभिर आहेत ह्याचे परिणाम दिसतीलच... आपण आज त्यांना आणि त्यांच्या लढ्याला केवळ शुभेच्छा द्यायचे काम करणार.

@उदय | 28 October, 2012 - 10:36 नवीन
------ संपुर्ण पोस्ट मधिल विचारांशी असहमत.... एक वेळा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढायचे म्हटल्यावर त्यात विरोधी आणि सत्ता पक्ष असा भेद आपण करत नाही आहोत हे केजरीवालांना "दाखवायचे" आहे.<<

अंतीमतः भ्रष्टाचार कमी करणे हे लक्ष्य असल्यावर विरोधी आणि सत्ता पक्ष हा भेद करण्याचे कारण नाही हे बरोबर. पण सरकार हाताशी असलेली सर्व ताकद वापरून त्यांच्या विरोधकांचा भ्रष्टाचार
उघड करण्यास उत्सुक असतेच आणि त्यांना कोंडित पकडण्याची संधी कधीच सोडित नसते. ते त्यांचे त्यांना करू द्यावे. तुमची मर्यादित ताकद पुन्हा त्याच कामी कशाला वापरायची? ती सत्तारूढांविरुद्ध वापरावी ही अपेक्षा.
योग्य रणनितिशिवाय चळवळ वाया जाईल.

>.आपण आज त्यांना आणि त्यांच्या लढ्याला केवळ शुभेच्छा द्यायचे काम करणार.<<
सहमत.

काँग्रेसच्या प्रश्नांमुळे केजरीवाल घायाळ
.
काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी सोडलेल्या प्रश्नबाणांनी घायाळ झालेले ' इंडिया अगेन्स्ट करप्शन ' चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आपल्या बचावासाठी नवी पळवाट काढली आहे . दिग्विजय सिंगांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी केजरीवाल यांनी पंतप्रधान डॉ . मनमोहन सिंग , काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे .

सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा , केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्यावर आरोप करून त्यांना सवाल करणा - या केजरीवाल यांनी दिग्विजय सिंग यांनी शनिवारी त्यांच्या संस्थेतील भ्रष्टाचाराबद्दल तब्बल २७ प्रश्न विचारले होते . दिग्गीराजांच्या या हल्ल्यामुळे टीम केजरीवाल अस्वस्थ झाल्याचे सूत्रांकडून समजते . दिग्विजय यांच्या प्रश्नांना उत्तर दिल्यास ते पुन्हा नव्याने प्रश्न विचारतील . तसेच त्यांच्या एकही प्रश्नाचा देशहिताशी संबंध नसल्याचा टीम केजरीवालचा युक्तिवाद आहे . यातून मार्ग काढण्यासाठी केजरीवाल यांनी सोनिया व पंतप्रधानांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवर खुली चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे . पंतप्रधान किंवा सोनिया अशा चर्चेस तयार होणार नाहीत हे माहीत असल्यामुळेच केजरीवालांनी हा डाव टाकल्याचे बोलले जात आहे .
.
.
काय हे Lol