निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. आवारातल्या कारल्याच्या वेलाला कारलीच लागू नयेत ( आणि मग त्याची भाजी खावी लागू नये ) म्हणून त्या कारल्याच्या वेलाची सगळी फुलेच खुडून टाकत असत. आपल्या लहान भावाला पण त्यांनी तसेच शिकवले होते. आईला वाटायचे वेलाला रोग जडला म्हणून, फुले गळत असतील स्मित>>>>>>>

२.आमच्या घरी पण कारल्याचा वेल होता. त्याला जास्त कारली लागावीत म्हणून मी कृत्रिम परागवहन ( रंगाच्या ब्रशने ) करत असे. आमची माती आमची माणसं, मधे दाखवले होते तसे.>>>>>>>>>>>> दोन्ही किस्से भारी. Happy

@ स_सा जी
धन्यवाद.

@ माधव जी
हाहा.
धन्यवाद.

@ तन्मय जी
कॅमेराच झूम कॅमेरा आहे, SLR नाही. Sad
Panasonic FZ18

सौरभ - तू जे फोटो इथे टाकले आहेस त्याला योग्य न्याय्/दाद द्यायला माझ्याकडे खरोखर विशेषणेच नाहीएत - अफलातून फोटोग्राफी आहे तुझी.... या दुसर्‍या फोटोत त्याच्या चोचीत मधमाशी व्यवस्थित दिसत आहे - आता प्रश्न असा की या मधमाशीचा डंख एवढा जबरी असतो की अशी माशी खाताना हा बी ईटर मरुनच जाईल - पण बी ईटर (वेडा राघू) अतिशय हुशार गडी - एक म्हणजे तो उडणारीच माशी पकडणार व गिळायच्या आधी त्या माशीला तो कठीण वस्तूवर जोरजोरात आपटणार - जेणेकरुन तो विषारी डंख निघून जाईल - मग हा हुशार गडी ती माशी खाणार..... कस्ला आलाय वेडा राघू - हा तर हुशार राघू Wink Happy

हा असा असतो तो मधमाशीचा स्टिंगर वा डंख वा काटा - अतिशय जबरा.... कधी कधी माणसाला प्राणघातकही....

h bee.jpgh bee1.jpghb sting.jpg

toamto1.JPG

घरचे कुंडितले टोमॅटो..पिकलेल्यांचा पण फोटो टाकते लवकरच. ह्या वेळी १/२ किलो पेक्षा जास्त मिळाले असतील :-)..
पहिल्यांदा टोमॅटो लावले तेव्हा फक्त एक आला होता Happy

वा वैशाली, ग्रेट... कस्ले मस्त टोमॅटो लागलेत - कुंडीत रोप असूनही... खूपच चांगली काळजी घेताय हे लक्षात येतंय...

वैशाली झाड अगदी हेल्दी आहे.

शशांक, मी किंगफिशरबद्दलही असे ऐकलेय. सूर्याच्या कोनानुसार त्याचा पाण्यात बुडी मारायचा कोन बदलतो. काही क्षण तो हवेत स्थिर राहतो आणि एकदम पाण्यात बुडी घेतो, पण त्या दरम्यान मासा सावध होत नाही.

शिवाय काही मासे शेपटीकडून गिळणे त्रासदायक असते. शेपटीचे काटे / कल्ले उलटे फिरून त्रास होतो. त्यावेळी तो पक्षी, तो मासा चोचीतल्या चोचीत फिरवतो आणि मगच गिळतो.

मोनाली Lol
शांकली हो ग.

दिनेशदा किस्से मस्तच.

सौरभ अप्रतिम फोटो.

वैशाली छानच बाळस धरल आहे झाडाने आणि टोमॅटोनेही.

आज आमच्या समोरच्या झाडावर आला होता किंगफिशर. बराच वेळ स्थिर बसला होता..जवळ खर म्हटल तर पाणी नाही. आणि म्हटल तर समुद्र आहे Happy

सौरभ, हुशार राघूचे फोटो मस्तच. Happy
शशांकजी, हा काटा प्रथमच बघतेय. धन्यवाद!
वैशाली, मस्त आलेत टोमॅटोआणि गुलाब सुद्धा. Happy (आयडी 'वैशाली' आणि टोमॅटोचा फोटो पाहून वैशाली टोमॅटो वाटला. :स्मित:)
आम्ही कोकणात असताना टोमॅटोचे शेतच केले होते. त्याची आठवण झाली. ते पिटुकले टोमॅटो बघायला खूप छान वाटतात. Happy

मोनाली..:फिदी:

वैशाली, टोमॅटो मस्तच! खरंच खूप रसरशीत दिसताहेत.

दिनेशदा...भारीयेत किस्से.. Lol

खरंतर सर्व पशु-पक्षी खूप हुशार असतात नै! खंड्याला आम्ही एक-दोनदा मासा फांदीवर आपटून आपटून मग खाताना बघितलंय. बागेतला सरडा त्याचं डोकं खालीवर हलवताना बघणं म्हणजे एक गमतीशीर अनुभव असतो. कित्येकदा अनेक पक्षी मान वेळावून आजूबाजूला बघतात ते सुद्धा खूप मजेशीर असतं. कावळे किती बेरकीपणा करतात (अर्थात त्यात खूप निरागसपणाच असतो...माणसारखा बेरकीपणा नै कै..) हे अनेकदा बघायला मिळतं. असे छोटे छोटे प्रसंग निखळ आनंद देऊन जातात. किती ती निसर्गाची किमया!!

असे छोटे छोटे प्रसंग निखळ आनंद देऊन जातात. किती ती निसर्गाची किमया!!>>>>>>>>>>>>शांकु, १०००० मोदक. अग असे विविध अनुभव आम्ही कोकणात असताना घ्यायचो.
नदीच्या नीतळ पाण्यात पाय सोडून बसलं की छोट्या छोट्या माशांच्या झुंडी येऊन पायाला गुदगुल्या करायच्या. पाण्यातले कोळी पाण्यावर आवर्तन घ्यायचे. चालताना एखाद्या कोळ्याने मधोमध मोठ्ठे जाळे केलेल असायचे आणि त्याच्या मध्यावर हा राजासारखा विराजमान झालेला असायचा. माकडे तर आमच्याकडे नेहमीच यायचीमग त्यांच्या पिल्लांच्या करामती, बघण्यात कितीतरी वेळ जायचा. आपल्या आई-वडीलांच्या लोंबणार्‍या शेपटयांवरून खाली येता येता त्या पिल्लांचा पकडापकडीचा खेळ चालू असायचा. एखादे शेपटीला धरलेला हात (पाय) सुटून खाली पडायचे. मग वर येण्यासाठी त्याची जी धावपळ व्हायची, त्याची मज्जाच वाटायची. कधी कधी त्यांच्या मस्तीबद्दल आईकडून त्यांना मार पण मिळायचा. मग १-२ मिनिट शांत बसून परत खेळायला सुरुवात. खूप धम्माल केली आम्ही लहानपणी. Happy

शोभा, तो निसर्ग सोडून आपणच दूर आलोत. तो आहेच अजून तसा, आपणच उसंत काढून त्याच्याकडे जायला पाहिजे.
आता पुढच्या पिढीला ( सेलफोन / फेसबुक पासून दूर करत ) त्यातली मजा दाखवायला हवी...

अगदी छोटीशी कोडी असतात, रोजच पडतात. आमच्याकडे आंबे, कडुनिंब आणि शेवग्याची भरपुर झाडे आहेत.
माझ्या घरासमोरच आहेत. आंबेमोहोराचा वास आपल्याला आवडतोच आणि कडुनिंबाच्या मोहोराला पण एक
छानसा मंद सुगंध असतो. रात्री दोन्ही येत असतात.

पण या दोन झाडापेक्षा जास्त लगबग असते ती शेवग्याच्या फुलांवर. सूर्यपक्षी, बुलबुल, चिमण्या, फुलपाखरे सगळी तुटून पडलेली असतात. झाडाखालच्या फुलांसाठी बकर्‍या फेर्‍या मारत असतात पण नवलाचे ते काळे भुंगे. भले मोठे भुंगे सतत या फुलांवर रुंजी घालत असतात. या सगळ्यांना आकर्षित करु शकणारी ती फुले, पोटात मधुरसाबरोबर सुगंधही बाळगून असणार. आपणच करंटे, आपल्याला त्याचा वासही येत नाही !

सौरभ - अफलातून फोटोग्राफी आहे तुझी >> +१

शेवग्याच्या फुलांवर आपले पुर्वज(माकड) पण ताव मारतात....कोकणात त्यांना शेगट्याच्या फूलांन पासून लांब ठेवण फारच कठीण...अगदी ५-१०मीनीटात फडशा पाडतात, आणि ही माकड एवढ्या गूपचूप येतात की अंगणात काम करणार्‍या गड्याला देखिल त्यांची चाहूल लागत नाही.

कोकणात शेवग्याच्या शेंगाना 'डांबे' म्हणतात, हे नाव पडण्याच्या मागे काहीतरी गोष्ट असावी Happy

उडणारी माशीचा वर उल्लेख आला म्हणून एक....
FlyeeingBee.jpg

हो ना शोभा आणि दिनेशदा. महंमदालाच पर्वताकडे जायला पाहिजे!.......... खरंच किती साध्या साध्या गोष्टींमधूनही आपल्याला आनंद मिळतो. फक्त आपली जाणीव सतत जागी ठेवली पाहिजे नाही?...

माकडांचा असाच एक भारी किस्सा..
मी भोरला जायची तेव्हाचा... भोरला जाताना वाटेत इंगवलीहून खाली येताना एक उतार आहे. त्याच्या डाव्या हाताला खाली छोटा मळा होता. आणि उतार उतरला की दोन्ही बाजूंना महारुखाची दीपमाळेसारखी भासणारी भली मोठी झाडं लागायची. उतार उतरताना उजव्या हाताला चढ आहे. त्या चढावर कळलावीच्या वेली आणि हिरव्यागार गवताचा मऊशार गालिचा पसरलेला असायचा.... तर सांगत होते त्या मळ्याचं......एकदा त्या मळ्यात मळेकर्‍याने भुईमूग पेरला होता. संध्याकाळी आम्ही भोरवरून पुण्याला येत होतो. लांबवरून ही छोटी घाटी (घाटी म्हणजे उतारामुळे तयार झालेला छोटा घाट! छोटा असल्यामुळे घाटी!) आणि आजूबाजूचा सारा परिसर स्पष्ट दिसायचा. त्या सायंकाळी आम्हाला दिसलं की १५/२० वानरं (काळ्या तोंडाची हं) त्या भुईमुगाच्या मळ्यात बसून रोपं उपटून शेंगा सोलून दाणे खाताहेत!... आमची एस्टी वर इंगवली पर्यंत जाईतो त्यांनी सगळ्या भुईमुगाचा फडशा पाडला होता!
किती ती अक्कल! मान गये!!

मधमाशी अन डंखाचा विषय निघालाय म्हणून थोडं लिहितो.

या चित्रात दिसतोय तो मधमाशीचा काटा आहे. मधमाशी, गांधिल माशी (वास्प) या दोन्ही डंख मारणार्‍या माशा आहेत. एका माशीकडे एक डंख असतो, अन तो 'वन टाईम' आक्रमण असतो. आयुष्यात एकदाच ती माशी डंख मारते. त्यानंतर तो भाग तिच्या शरिरातून तुटून बाहेर पडतो.

हा काटा काढताना महत्वाची खबरदारी घ्यायची ती अशी, की काट्याच्या पाठी असलेला फुगीर भाग अजिबात दाबायचा नाही. त्वचेत घुसलेला काटा मुळाशी चिमट्यात धरून काढायचा. तो फुगीर भाग पॉयझन सॅक आहे. काढताना तो चिमटीत धरला, की आपण त्यातील विषाचे इंजेक्शन टोचून घेतो.

४-२ डंख वेदना दायी असतात.
कधी जोरदार अ‍ॅलर्जी येऊ शकते, किंवा शेकडो डंख असलेत तर जीवघेणे होऊ शकतात. (मध्यंतरी एका गिर्यारोहकाचा मधमाशांमुळे मृत्यू झाल्याची बातमी माबोवर होती. पण ते उंचीवरून पडल्याने. )

प्रथमोपचार म्हणून बी-स्टिंगला सोडा/साबण लावणे. गांधिलमाशीच्या डंखावर लिंबू वा विनेगर. अनुक्रमे अ‍ॅसिडिक व अल्क्लाईन विषाला उदासिनिकरण -न्यूट्रलाइज- करण्यासाठी- (बी-बायकार्बोनेट, वास्प-विनेगर)
आपल्याकडे तुळशीतली माती लावतात. थंडावा हा त्या ओलसर मातीचा गुण. तिच्याने आग कमी होते.

आमच्या घराच्या बाजुला एक पावसाळी पाण्याचा ओढा आहे. दिनेशदा, मामी, योगेश आणि साधनाला माहीत आहे. त्यात साधारण नोव्हेंबर पर्यंत पाणी असते. तिथे एक सिताफळीच सुकलेल झाड आहे. त्या झाडावर जितके महिने त्या गोढ्यात पाणी असते तितके दिवस एक खंड्या त्या सुकलेल्या सिताफळाच्या झाडावर रोज बसत असे.

कौतुकाच्या थापेबद्दल सगळ्यांचे आभार. Happy

पुरंदरे शशांक >> मधमाशीचा डंख एवढा जबरी असतो की...

अगदी बरोबर सर.
मला एकदा याचा आस्वाद घ्यावा लागला होता.
२ दिवस घराबाहेर पडू शकलो नव्हतो.

मस्त फोटो आणि छान माहिती Happy

प्रथमोपचार म्हणून बी-स्टिंगला सोडा/साबण लावणे. गांधिलमाशीच्या डंखावर लिंबू वा विनेगर. अनुक्रमे अ‍ॅसिडिक व अल्क्लाईन विषाला उदासिनिकरण -न्यूट्रलाइज- करण्यासाठी- (बी-बायकार्बोनेट, वास्प-विनेगर)
आपल्याकडे तुळशीतली माती लावतात. थंडावा हा त्या ओलसर मातीचा गुण. तिच्याने आग कमी होते.>>>>>खायचा चूना पण लावतात का?

केनयात एक प्रकारचा पक्षी आहे. तो तिथल्या मसाई लोकांना झाडाच्या ढोलीत असलेली मधमाश्यांची पोळी दाखवतो. अक्षरशः तिथे नेतो. मग त्याची फी म्हणून त्याला पोळ्याचा थोडा तूकडा द्यावा लागतो. तो नाही दिला तर पुढच्यावेळी त्या लोकांना फसवून सिंहाकडे नेतो. ( हे सगळे ह्यूमन प्लॅनेट मधे दाखवलेय.)

गेल्या आठवड्यात वाशीला गेलो होतो तर त्या स्टेशनसमोरच्या मॉल्स मधे बरीच पोळी दिसली. आकाराने मोठी. आजूबाजूला झाडे नसल्यावर त्यांनी तरी कुठे जायचे ? पण त्यातले एखादे तरी उठले तर त्या परीसरात हाहाकार माजेल, एवढे नक्की.

मुंबईत पुर्वी एक टोळी यायची. आधी आम्ही पोळे काढतोय असे सांगून लोकांना दारेखिडक्या बंद करायला लावायची. मग थोड्या वेळाने मध आणून विकायची. पण तो बहुदा नकली असायचा.

केनया चा पक्षी फारच हुष्षार आहे.. कित्येकदा माणसांनासुद्धा , त्यांना फसवणार्‍या माणसाला अद्दल घडवता येत नाही.. कौतुक करावं तितकं थोडंय या पक्ष्याचं.. कधी फोटो मिळाला तर जरूर टाका इथे.. Happy
इब्लिस- चांगली माहिती दिलीत..

भिउ नकोस, पायरीवरन हे बघ अस उतरायच... एका छोट्या पिल्लाला त्याची आई शिकवतेय..

तुम्हाला नक्की आवडेल हा मला फेसबुकवर मित्रानी शेअर केलेला व्हिडिओ.

https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=fDKDC_IUnOA

Pages