घावनं...

Submitted by सुलेखा on 8 October, 2012 - 04:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सध्या उन्हाळा -ऑक्टोबर हीट-आहे.या दिवसात कधी कधी डेअरीतून आणलेले दूध तापायला ठेवले कि ते नासते किंवा पूर्ण चोथा-पाणी झालेले दिसत नाही पण नासल्यागत दिसते.. जर या दूधाची चव कडू नसेल तर अशा दूधाचे आपण पनीर करतो ते भाजीत वापरतो किंवा पनीर भुरजी,स्टफ पनीर पराठा ,कटलेट मध्ये वापरतो ..या पनीर मधे साखर घालुन गॅसवर आळवुन त्याचा गोड कलाकंद करतो..या अशा दूधापासुन जाळीदार आणि खूपच चवदार घावनं करता येतील .त्यासाठी लागणारं साहित्यः---
असे नासलेले दूध,
तांदळाचे पिठ,
१ किंवा २ चमचे बारीक रवा ,[एकुण साहित्याप्रमाणे]
जिरे.
हिरवी मिरची बारीक चिरलेली,
किसलेले आले,
बारीक चिरलेला कांदा,
चवीप्रमाणे मीठ,
ghavan-1111111111.JPG
कोथिंबीर बारीक चिरलेली,
तेल पाव वाटी.
नॉन स्टिक तवा /वॉक असेल तर पहिल्या घावनापुरते एक टी-स्पुन तेल तव्याला लावुन घ्यावे.त्यानंतर पुन्हा तेल वापरावे लागत नाही.

क्रमवार पाककृती: 

जितकी घावनं करायची असतील त्या अंदाजाने नासलेले दूध घेवुन मिक्सरमधे फिरवुन एकजीव करुन घ्यावे.
त्यात तांदूळपिठी व रवा घालुन मिश्रण कालवुन घ्या.
१० मिनिटे हे मिश्रण तसेच ठेवावे.
आता त्यात हि .मिरची,आले, कांदा ,कोथिंबीर व चवीपुरते मिठ घालुन मिश्र पुन्हा एकदा कालवुन घ्यावे.घावन /धिरडी घालण्यासाठी लागते तसे पिठ असावे..
नॉन स्टिक पॅन तापवुन त्यावत १ टी स्पून तेल घालुन त्यावर मिश्रण घालावे.वर झा़कण ठेवावे.शिजले कि झाकण काढुन घावन उलटवुन त्याची दुसरी बाजु ,तव्यावर पुन्हा तेल न टाकता भाजुन घ्यावी.
ghaavan 22222.JPG
अशा पद्धतीने सर्व घावनं करुन घ्यावी.
टोमॅटो-सॉस व कोथिंबीर-खोबरे-हिरवी मिरची-आले घालुन केलेल्या चटणीबरोबर खावी.
ghavan 33333.JPG

अधिक टिपा: 

गोड घावनं करताना मिक्सरमधुन एकजीव केलेल्या दूधात तांदुळ पिठ,रवा,ओले खोबरे,चवीपुरते गूळ/पिठी साखर आणि कणभर मिठ घालुन करावी.

माहितीचा स्रोत: 
माझी वहिनी..
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! नासलेल्या दुधाची ही घावनं फारच छान दिसत आहेत. केव्हा दूधातून "ढॉम्म " आवज येतोय याची वाट बघतेयं आता.

आजच ही पाकृ पाहिली आणि आजच दुध फाटलं.
लगेच केली.. फारच अप्रतिम झालेल.
कमी खाणार्‍या लेकीनही आनंदानं खाल्ली.

थँक्स अ टन!

Pages