आकाशवाणी कविसंमेलनात मायबोलीकर क्रांती साडेकर

Submitted by भरत. on 5 October, 2012 - 02:33

आत्ताच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर एक उद्घोषणा ऐकली. आज शुक्रवार ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजून तीस मिनिटांनी आकाशवाणीच्या सभागृहात 'चांदणे शिंपीत जाशी' हा कविसंमेलनाचा कार्यक्रम आहे. कवींच्या नामावलीत मायबोलीकर कवयित्री क्रांती साडेकर यांचा उल्लेख आहे.
कार्यक्रम विनामूल्य असून त्यासाठीच्या प्रवेशिका आकाशवाणीच्या चर्चगेट येथील स्वागतकक्षात मिळतील.

कार्यक्रमाचे प्रसारण आकाशवाणीवरून कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने होणार असावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रांति,
अभिनंदन आणि शुभेच्छा.
मायबोलीकरांसाठी आनंदाची आणि अभिमानास्पद बाब आहे ही.
---------------------------------------------------------------------------
भरत,
ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

अभिनंदन क्रांती! Happy

कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने होणार असावे >>
कोजागरी पौर्णिमे ला अजून वेळ आहे ना! Uhoh

कोजागरी पौर्णिमे ला अजून वेळ आहे ना! >>>
कोजागिरी २९ ऑक्टोबरला आहे.
त्या रात्री हा कार्यक्रम प्रसारित होईल.
अधिक तपशील लवकरच समजतील असा अंदाज आहे.

मयेकर साहेब आम्हाला प्रत्यक्ष जाणे शक्य नाही मुम्बईची रेडियो वाहिनी आम्हाला इथे पंढरपुरातून कशी ऐकू येणार असाही प्रश्न पडला आहे
क्रान्तीताईन्ची कविता ऐकायला मिळणार मग हा चान्स मिस तरी कसा करायचा आम्ही ?

काहीतरी मार्ग काढाल का ?...................... आमच्यासारख्या असन्ख्य माबोकरान्साठी !!

क्रांती ताई मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन Happy
भरत सरांचे ह्या धाग्यासाठी आभार Happy

अरे वा ! अभिनंदन. कोणी कार्यक्रमाला जाल / रेडिओवर ऐकाल तर वृत्तांत लिहा प्लीज

क्रांतीजी
आकाशवाणीची परवानगी असेल तर कार्यक्रमाची माहिती अगोदरच आमच्यासाठी
सांगता येईल का ? आणि हो मनपूर्वक अभिनंदन.

Pages