तिचेच नंतर जगणे 'जीतू'मयही होते

Submitted by रसप on 2 October, 2012 - 00:08

चर्चा करण्यासाठी नविन विषयही होते
त्यांना चर्चा हरण्याचे पण भयही होते

ज्यांना माफी मिळते ज्यांची गयही होते
त्यांच्या दानाची देवास सवयही होते

जखमच होते गेलेल्या प्रत्येक क्षणाची
क्वचितप्रसंगी एक लाघवी सयही होते

अनेक वेळा असेल माझा पाय घसरला
थोडी होती संगत थोडे वयही होते

तिच्या गुंतण्यावरची बंदी गळ्यातले सर..
पण नजरेला होकाराचे भयही होते

सुरुवातीला ती नसल्याचा त्रास वाटतो
हळूहळू त्या नसण्याचीच सवयही होते

तिला पाहिल्यावर हृदयाची साद वाढली
धडधडते ठोके मग चुकले लयही होते

नाक कान डोळे अन होते हात-पायही
प्रेमानंतर कळले एक हृदयही होते

त्या काळी मी विचारले तर 'नको' म्हणाली
तिचेच नंतर जगणे 'जीतू'मयही होते

....रसप....
२७ सप्टेंबर २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/10/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रणजीता!
अरे आमच्या कडकलक्ष्मी तुला अजून माहित नाहीत! तुला द्यायचा प्रतिसाद काल पूर्ण करताना मंडळींनी compवरूनच (मेन स्विचच off करून) बंद करून टाकला!
नंतर सुमारे अर्धा तास आमची हजामत झाली व मग आम्ही झोपी गेलो, सकाळ होण्याच्या प्रतिक्षेत!
आता सकाळी सकाळीच परत आम्ही compवर बसून तुला हे लिहीत आहोत, कारण मंडळी घोरत पडल्या आहेत, बाहेर hallमधे येवून, आमच्यावर पाळत ठेवता ठेवता!
होते कधी कधी अशी चांदी आमची!
..........प्रा.सतीश देवपूरकर

वैभवा!

प्रस्थ आमचे स्वीकाराया सोपे नव्हते!
काय करावे? आम्ही होतो जात्या प्रस्तर!!

प्रस्तर म्हणजे layer. In geology, we say stratification or bedding, which is a fundamental characteristic of sedimentary rocks. Sedimentary rocks are generally layerd, stratified or bedded. However, igneous lava flows are also layered. Even metamorphic rocks like schistose & gneissose rocks are also layerd.

All these rocks occur like sheet like bodies in three dimensions & cover hundreds or thousands of sqare kms area. In short, they are very huge bodies showing wide areal extent!

वैभवा, माझ्यातील भूशास्त्राचा प्राध्यापक जागृत झाला, म्हणून बरळलो इतकेच!
टीप: भूशास्त्रीय संकल्पनांचा असा चतुराईने व कलात्मक वापर मी अधूनमधून गझलेत करत असतो व वर्गात देखिल भूशास्त्रातील आध्यात्म व शायरी विद्यार्थ्यांना सुनावतो. तेही enjoy करतात!

एक उदाहरण देतो.............
River action, F.Y.B.Sc.च्या विद्यार्थ्यांना शिकवताना,. कालच हा शेर आम्ही सुनावला.........

एवढ्या मोठ्या नदीच्या राहुनी पात्रामधे......
हाय! हे पाषाण सारे कोरडेच्या कोरडे!

माझे पाल्हाळ सोसल्याबद्दल धन्यवाद!
...........प्रा.सतीश देवपूरकर

जखमच होते गेलेल्या प्रत्येक क्षणाची
क्वचितप्रसंगी एक लाघवी सयही होते

अनेक वेळा असेल माझा पाय घसरला
थोडी होती संगत थोडे वयही होते

सुरुवातीला ती नसल्याचा त्रास वाटतो
हळूहळू त्या नसण्याचीच सवयही होते

त्या काळी मी विचारले तर 'नको' म्हणाली
तिचेच नंतर जगणे 'जीतू'मयही होते<<<

मस्त गझल झालेली आहे

अभिनंदन

Pages