आता कळाले जनावरांचे चरणे म्हणजे ! (विडंबन)

Submitted by A M I T on 1 October, 2012 - 07:29

वैवकुंच्या बरेच अवघड असते या गझलेचं स्वैर विडंबन अर्थात त्यांची क्षमा मागून..

दहा दुकाने फिरूनी साडी घेते एक
वैतागवाडी पत्नीसोबत फिरणे म्हणजे

रोजच ताटात भाज्या भेटती अर्ध्या कच्या
आता कळाले जनावरांचे चरणे म्हणजे

तुम्हांस ठाऊक नाही, ही पण कला आहे
बायकोसमोर शेजारणीला पाहणे म्हणजे

काल जराशी काय मी पिऊनी आलो !
आणि कळाले, काय असते लाटणे म्हणजे

जन्मानंतर पहिल्यांदाच आज रडलो मी
बरेच अवघड असते कांदा चिरणे म्हणजे

किती दिसांचा घडेल उपास माहीत नाही?
ध्यानी ठेवा लग्नाचा बड्डे विसरणे म्हणजे

जिच्यासंगे प्रेम केलं, लग्नही मग
मला कळाले आयुष्यातील फसणे म्हणजे

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अफाट !

Proud

आभार Happy

नंतर अ‍ॅडलेल्या काही ओळी

तुम्हांस ठाऊक नाही, ही पण कला आहे
बायकोसमोर शेजारणीला पाहणे म्हणजे


काल जराशी काय मी पिऊनी आलो !
आणि कळाले, काय असते लाटणे म्हणजे

<<तुम्हांस ठाऊक नाही, ही पण कला आहे
बायकोसमोर शेजारणीला पाहणे म्हणजे<<

Rofl
आम्ट्या..तु आम्हाला सांगत नाहीस, पण तुझी नक्कीच एक शिक्रेट बायको आहे.