हरबरा डाळीचे वडे

Submitted by वेब on 30 September, 2012 - 22:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य
१ किलो हरबरा डाळ
१० हिरव्या मिरच्या
दिड इंच आले
१/२ चमचा दालचीनी पूड
१ जुडी कोथिम्बिर

क्रमवार पाककृती: 

साहित्य
१ किलो हरबरा डाळ
१० मिरच्या
दिड इंच आले
१/२ चमचा दालचीनी पूड
१ जुडी कोथिम्बिर

हरबरा डाळ रात्री भीजत घाला. सकाळी ती अरतबोबडी (जरा जाडसर ) वाटा.
वाटताना त्यात आले ,हिरवी मिरची ,दलिचिनी किंचित , मीठ आणि भरपूर कोथिम्बिर घाला. लसुण चालेल . गणपतीचा प्रसाद असल्याने मी लसुण कांदा घातला नाही. प्रथम थोडा वेळ मंद आचेवर तलुन नंतर लालसर रंग येइपर्यंत वडे तळणे.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेब
आमच्या कडेही असे वडे करतात पण मिक्स डाळींचे. आणि मी तर ते सगळ्या डाळी सकाळीच भिजत घालते. ४-५ तास भिजल्या तरी छान होतात वडे. Happy
आणि हो, मी मिश्रण वाटल्यावर त्यात मेथीचे दाणे तळुन, जाडसर कुटून घालते. छान लागते चव.