देव्हार्‍यात बसून ... (तरही)

Submitted by ज्ञानेश on 30 September, 2012 - 14:35

(दिलेल्या तरही मिसर्‍यात किंचित बदल केला आहे.)

============================

जगव्यापी अथवा दयाघन प्रभू त्याला म्हणावे कसे?
देव्हार्‍यात बसून जो ठरवतो, की मी जगावे कसे..

तो गेला अगदीच दूर, बहुधा हा सोडुनी चालला
हास्यास्पद ठरलेत आज सगळे माझेच दावे कसे?

रात्रीशी फटकून झोप असते, उत्साह होतो शिळा
ज्या स्वप्नास मुळात जन्म नसतो, ते पूर्ण व्हावे कसे?

माझा हात धरून घट्ट अगदी, जेव्हा निघालीस तू
तेव्हा मीच तुझ्याकडून शिकलो- झोकून द्यावे कसे

ह्रदयाला फुटतात रोज उकळ्या- स्वच्छंद होऊ, चला !
पोटाला बसताच एक चिमटा, कळते जगावे कसे !

या प्रश्नातच बाल्यही हरवले, संपेल तारुण्यही
की जेव्हा गवसेन मीच मजला- मी ओळखावे कसे?

वृत्ताचा पडलाय मोह नुसता 'ज्ञानेश'रावा तुला
नाहीतर तरहीत शेर सुचणे तुजला जमावे कसे? Happy

-ज्ञानेश.
============================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

क्या बात है!
वाचताना तुमच्याच "कुठे भास होतो" चा भास झाला! Happy
बर्याच दिवसंनी खास ज्ञानेश टच गझल वाचायला मिळाली! वाह! मजा आ गया! Happy
पुलेशु.. धन्यवाद! Happy

ह्रदयाला फुटतात रोज उकळ्या- स्वच्छंद होऊ, चला !
पोटाला बसताच एक चिमटा, कळते जगावे कसे !............. वा वा !!!

ज्ञानेश.
सुपर्ब गझल. आपली गझल वाचणे हा नेहमीच माझ्यासारख्या नवशिक्यासाठी आदर्श पाठ असतो. प्रत्येक शेरामधील खयाल सुरेख.

ह्रदयाला फुटतात रोज उकळ्या- स्वच्छंद होऊ, चला !
पोटाला बसताच एक चिमटा, कळते जगावे कसे !
..................... मस्तच!

गझला टाकत चला की आम्हाला इतरत्र वाचता येत नाही !

ह्रदयाला फुटतात रोज उकळ्या- स्वच्छंद होऊ, चला !
पोटाला बसताच एक चिमटा, कळते जगावे कसे ! << व्वा! मस्त शेर >>>

माझा हात धरून घट्ट अगदी, जेव्हा निघालीस तू
तेव्हा मीच तुझ्याकडून शिकलो- झोकून द्यावे कसे
>>> व्वा!!

ह्रदयाला फुटतात रोज उकळ्या- स्वच्छंद होऊ, चला !
पोटाला बसताच एक चिमटा, कळते जगावे कसे !
>> सुरेख!

वृत्ताचा पडलाय मोह नुसता 'ज्ञानेश'रावा तुला
नाहीतर तरहीत शेर सुचणे तुजला जमावे कसे?
>> Lol

या प्रश्नातच बाल्यही हरवले, संपेल तारुण्यही
की जेव्हा गवसेन मीच मजला- मी ओळखावे कसे?

<<< व्वा व्वा

(गवसेन या शब्दात एक 'जो हवा आहे त्याची ओळख लागल्यावर त्याला कॅप्चर केले' अशी एक छटाही जाणवली)

माझा हात धरून घट्ट अगदी, जेव्हा निघालीस तू
तेव्हा मीच तुझ्याकडून शिकलो- झोकून द्यावे कसे

<< वा

हास्यास्पद ठरलेत आज सगळे माझेच दावे कसे?<< वा

रात्रीशी फटकून झोप असते, उत्साह होतो शिळा
ज्या स्वप्नास मुळात जन्म नसतो, ते पूर्ण व्हावे कसे?<<< सुंदर शेर

गझल आवडली, मक्ता करायलाच नको होता असे वाटते

माझा हात धरून घट्ट अगदी, जेव्हा निघालीस तू
तेव्हा मीच तुझ्याकडून शिकलो- झोकून द्यावे कसे..... वा वा वा

ह्रदयाला फुटतात रोज उकळ्या- स्वच्छंद होऊ, चला !
पोटाला बसताच एक चिमटा, कळते जगावे कसे !.......ह्म्न!

ह्रदयाला फुटतात रोज उकळ्या- स्वच्छंद होऊ, चला !
पोटाला बसताच एक चिमटा, कळते जगावे कसे !

या प्रश्नातच बाल्यही हरवले, संपेल तारुण्यही
की जेव्हा गवसेन मीच मजला- मी ओळखावे कसे?

हे शेर आवडले,
मस्त गझल

मक्ता करायलाच नको होता असे वाटते>>>>

वा बेफीजी क्या बात !!
गझल सम्पायलाच नको होती असा अर्थ मला लागला..............