छत्रपती शिवराय

Submitted by विश्वजीत दीपक गुडधे on 30 September, 2012 - 05:57

छत्रपती शिवराय

तेजस्वी, राष्ट्राभिमानी
जिजाऊचा लाल
शिवबा आमुचा

प्रसाद जगदंबेचा
अवतार शिवाचा
शिवबा आमुचा

सखा मावळ्यांचा
राजा रयतेचा
शिवबा आमुचा

कर्दनकाळ मोगलांचा
रक्षक धर्म अन देशाचा
शिवबा आमुचा

शत्रू अन्यायाचा
न्याय गरीबांचा
शिवबा आमुचा

बुद्धिमंत, श्रीमंत
वीरांचाही वीर
शिवबा आमुचा

मातृभक्त, पितृभक्त
कुलवंत, शीलवंत
शिवबा आमुचा

कर्मयोगी, राजयोगी
प्रज्ञावंत, दयावंत
शिवबा आमुचा

सिंहाचा असे छावा
लढे गनिमी कावा
शिवबा आमुचा

गो-ब्राम्हण प्रतिपालक
हिंदवी स्वराज्याचा जनक
शिवबा आमुचा

जाहला छत्रपती
जाणता राजा
शिवबा आमुचा

• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
==================================

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद

विश्वजित,
छान!
आता खालील लिंकवरील काव्य व त्याचा अर्थ वाचा . लेखकाने अर्थ बरोबर आहे का हा प्रश्न विचारला आहे तो संस्कॄत शब्दांचा अर्थ नेमका लावला गेला आहे ना हे तपासण्यासाठी. दिलेला अर्थ बरोबरच आहे.
http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=5703464369315448855... 2-8-11