गझल आमची म्हणजे घमघमणारे अत्तर!

Submitted by सतीश देवपूरकर on 30 September, 2012 - 01:23

गझल
गझल आमची म्हणजे घमघमणारे अत्तर!
गर्भरेशमी दरवळते श्वासांचे अस्तर!!

हयात झाली प्रश्नचिन्ह तर, आम्ही उत्तर!
मृत्यूलाही करूच आम्ही उद्या निरुत्तर!!

प्रस्थ आमुचे स्वीकाराया सोपे नव्हते.....
काय करावे? आम्ही होतो, जात्या प्रस्तर!

खुरडत खुरडत हयात गेली, त्यांची सारी.....
कणाच नव्हता, आयुष्याला, ना गत्यंतर!

बलाढ्य होती दु:खे, पण, वाचलोच आम्ही!
हरेक वेळी नशीब ठरले, पण, बलवत्तर!!

आता गझला, काहीजण, लिहितात अशा की;
स्वत: टांगती वेशीवर अब्रूचे लक्तर!

खरेच आम्ही तिशीत राहू उद्या मनाने!
भले आमचे वय झालेले, असेल सत्तर!!

ही तर आहे पोतडीच, आमची खरोखर!
जगास वाटे खांद्यावरती आहे दप्तर!!

आता येथे....आता तेथे.... असतो आम्ही!
कुणा न कळले, कधी आमचे असते दफ्तर!!

असो कसाही दिवस! राहतो प्रसन्न आम्ही!
असो कितीही चालायाला रस्ता खडतर!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ कोतवाल अत्तर निवान्त कपाटाच्या मागं पडून होतं. कशाला पुढं ओ ढून झकण उघडलं.अत्तर कुठेही पडलेले असो, सुवास हा दरवळणारच!

सुगंधी गर्भ ज्याचा तोच दरवळणार गाभारा!
न त्याला काळजी कसली.....सुटो किंवा पडो वारा!!

.............प्रा.सतीश देवपूरकर

प्रोफेसर, पारिजाताला तुम्ही दिलेला प्रतिसाद अजिबत पटला नाही ( तो मलाही लागू पडतो म्हणुन मत व्यक्त करतेय)
आम्हाला गझला रचता येत नसतीलही. पण वाचायला आवडतात.
जी गझल आम्हाला (माझ्यासारख्या अनेकांना) टुकार वाटतेय तिला केवळ आम्हाला गझला रचता येत नाहीत म्हणुन आम्ही चांगलं म्हणायचं ये कहा का न्याय है? गझल रचता येत नाही म्हणजे ती कळत नाही हे म्हणणं साफ चूक आहे.
मला वाटतं सगळ्याचा तुम्ही एकदा शांत विचार करा.

व्याकरणात बसली आणि शब्दात जोडली गेली की गझल बनत नसते. लिहिणार्‍या इतकीच वाचणार्‍यालाही भावली तरच गझल "जमली" म्हणायचं Happy

रियू, Happy
प्रोफेसर, प्रत्येक वाचकाला लिहिता यावे हा मुद्दा हास्यास्पद आहे. आणि जोवर मला स्वतःला वाचक म्हणून दाद देता येईल इतकं बर मी लिहीत नाही तोवर पब्लिश न करण्याइतकी समज मला आहे.
असो. मोबाईलवरून टाईप केल्यामुळे झालेल्या व्याकरणाच्या चुका दुरुस्त केल्यात. त्या क्षम्य नाहीतच. Happy

पारिजाताजी व रियाजी!
आपल्या दोघींच्या रसिकतेवर आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण केलेले नाही!
प्रत्येकाला आवडण्याचा/नावडण्याचा अधिकार असतो.
पण म्हणून कुठल्याही कलाकृतीवर आपण धाडकन कुठलेही काल्पनिक लेबल डकवू शकत नाही इतकेच आमचे म्हणणे आहे!
आपले मत म्हणजे सार्वजनिक मत नव्हे!
आपल्या मतातून आपली अभिरुची व साहित्यिक पोच समजते, हे मात्र खरे!
मग आपण गझल लिहा, कविता लिहा वा अन्य काही लिहा वा काही लिहू नका !

प्रा.सतीश देवपूरकर

आपण आता हा वाद अण्णांकडे किंवा आर आर आबांकडे नेऊ. ते हिंदीतून जो निकाल देतील तो मान्य करू. हाकानका.

एक निर्दोष स्वरचित गझल पोस्टा आधी व मग काय ते तारे तोडा!
प्रा.सतीश देवपूरकर
>>>
उद्या गाईच्या दुधाच्या चवीवर कमेंट देण्यापुर्वी दुध देवुन दाखवा असेही म्हणाल तुम्ही.
असो, तुम्हाला शुभेच्छा

खरेच आम्ही तिशीत राहू उद्या मनाने!
भले आमचे वय झालेले, असेल सत्तर!! >> हे अगदी पटले प्रोफेसर, स्वता चे खरे खुरे वर्णन केले आहे.

श्वासांचे अस्तर >> पार डोक्यावरुन गेले. ह्याचा अर्थ काय लावायचा प्रोफेसर.

'अस्तर' शब्दाचे चिंतन करा, शेराचा अर्थ उलगडेल!

गझल आमची म्हणजे मूर्तीमंत आत्मप्रौढी
खेचर घेऊन जिंकाया आलोय अश्वदौडी>>+१०००००००००००००

चांगले च जमले आहे

'अस्तर' शब्दाचे चिंतन करा, शेराचा अर्थ उलगडेल!>> केला प्रयत्न, तरी पण कळले नाही. प्रयोजन पण कळले नाही.

मला जर कवितेची तारीफच हवी असती तर, घरातच गझल ठेवली असती,>> बायकोनी निर्वाणी चा इशारा दिला असावा प्रोफेसरांना, एक तर गजल तरी राहिल घरी नाही तर मी तरी.
म्हणुन प्रोफेसर घरात गजले चा "ग" सुद्धा उच्चारत नाहीत.

Pages