गझल आमची म्हणजे घमघमणारे अत्तर!

Submitted by सतीश देवपूरकर on 30 September, 2012 - 01:23

गझल
गझल आमची म्हणजे घमघमणारे अत्तर!
गर्भरेशमी दरवळते श्वासांचे अस्तर!!

हयात झाली प्रश्नचिन्ह तर, आम्ही उत्तर!
मृत्यूलाही करूच आम्ही उद्या निरुत्तर!!

प्रस्थ आमुचे स्वीकाराया सोपे नव्हते.....
काय करावे? आम्ही होतो, जात्या प्रस्तर!

खुरडत खुरडत हयात गेली, त्यांची सारी.....
कणाच नव्हता, आयुष्याला, ना गत्यंतर!

बलाढ्य होती दु:खे, पण, वाचलोच आम्ही!
हरेक वेळी नशीब ठरले, पण, बलवत्तर!!

आता गझला, काहीजण, लिहितात अशा की;
स्वत: टांगती वेशीवर अब्रूचे लक्तर!

खरेच आम्ही तिशीत राहू उद्या मनाने!
भले आमचे वय झालेले, असेल सत्तर!!

ही तर आहे पोतडीच, आमची खरोखर!
जगास वाटे खांद्यावरती आहे दप्तर!!

आता येथे....आता तेथे.... असतो आम्ही!
कुणा न कळले, कधी आमचे असते दफ्तर!!

असो कसाही दिवस! राहतो प्रसन्न आम्ही!
असो कितीही चालायाला रस्ता खडतर!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद कावळा,
तुझ्या सौंदर्यबोधाचा, लीनतेचा व प्राणिमात्रांबद्दलच्या कळवळ्याचा आम्ही आदर करतो!
टीप: प्रतिसाद गद्यात लिहिला असतास तरी चालले असते. सुलभ झाले असते!
...........प्रा.सतीश देवपूरकर

"घमघमणारे" हा शब्द फारच विचित्र वाटला. माझा सौंदर्यबोध इथे 'दरवळणारे' अधिक सुयोग्य मानतो.

'बलवत्तर' पर्यंत सगळे शेर आवडले.... नंतरचे विशेष वाटले नाहीत.

=======================================

अवांतर - प्रत्येक गझलेत किमान एक शेर 'मी श्रेष्ठ' ह्या धाटणीचा वाचून कंटाळा आला आहे.

रणजीत!
प्रतिसादाबद्ल धन्यवाद!

दरवळणे.......सुगंध दूरवर पसरणे
घमघमणे.......... सुगंध दूरवर पसरणे, पण घमघमण्यामध्ये सुगंधाचा दाटपणा/तीव्रता/विपुलता अभिप्रेत असतात.

उदाहरणार्थ: मटन/चिकन शिजताना काय मस्त घमघमाट सुटला आहे......असे म्हणतात, दरवळ सुटला आहे .......म्हणत नाही.

आता मतला परत वाचून पहा. काय वाटते?

टीप:
१) काही शेर आवडले, काही विशेष वाटले नाहीत, याबद्दल धन्यवाद!
२) विशेष न वाटणा-या शेरांना पर्यायी शेर सुचवशील काय? वाचायला आवडेल!
३) गझलेतला/काव्यातला ‘मी’म्हणजे स्वत: कवीच असतो काय? ते कुठल्या वृत्तीचे/प्रवृत्तीचे/विकृतीचे प्रतिक नसते काय?
४) बाकी तुला खरेच कंटाळा आला आहे हे तुझ्या प्रतिसादावरून लगेच कळते!

..........प्रा.सतीश देवपूरकर

>>मटन/चिकन शिजताना काय मस्त घमघमाट सुटला आहे......असे म्हणतात, दरवळ सुटला आहे .......म्हणत नाही.<<

एक्झॅक्टली !!

घमघमाट उग्र असतो, दरवळ हवाहवासा....! आता तुम्हाला तसंच म्हणायचं असेल, तर मान्य आहे !

देवपूरकर,
कधी तरी आत्मपरीक्षण करा.
इथे प्रतिसाद देणारे तुमच्या गझलेत काही खटकलं तर सांगतात्,पर्यायाने तुमची गझल अधिक समृद्ध व्हावी ह्याच मनोवृत्तीचे आहेत.

परंतु, तुमच्या गझलेची तारीफ करणारे प्रतिसादच तुम्हाला आवडतात हे तुमच्या एकंदर वावरा वरुन दिसून येते आहे.कुणी उणीवा दाखवल्या की लांबच्या लांब प्रतिसाद देवून आपण जिंकल्याचा आव आणता.

ह्या तुमच्या गझलेत इतका ''मी''पणा आहे की त्याला तोड नाही.तगज्जुल मात्र नगण्य आहे.

इतरांशी जाऊ द्या,फक्त गझलेशी प्रामाणिक रहा

=काव काव.

कावळा,

कावकावच करायची तर, ती तरी प्रामाणिकपणे करायची ना!

मला जर कवितेची तारीफच हवी असती तर, घरातच गझल ठेवली असती, फार फार तर लंगड्या घोड्यांपुढे वाचली असती, माझ्या जगभरातल्या fansपुढेच वाचली असती! इथे नसती ती प्रकाशित केली! (अवांतर: माझ्या बहुतेक गझला, परमेश्वर कृपेने, प्रसिद्ध झालेल्या व शेकडो वेळा मुशाय-यात, ख-या ख-या तज्ञांपुढे, पेश करून झाल्या आहेत.)

नेटवर जेव्हा एखादी रचना प्रकाशित होते, तेव्हा तिच्यावर साहित्यिक टीका, चर्चा अपेक्षित असते. गुणगान/वाहवाच व्हावी अशी निदान माझी तरी अपेक्षा नसते. माझे कोणतेही प्रतिसाद बघितलेस तर त्यात references देवून मुद्दे मांडलेले असतात.

नुसतेच त्रोटक, हवेत गोळीबार करून, मी कधीच काढता पाय घेत नाही वा पलायनही करत नाही! ते माझ्या रक्तात नाही!

माझी गझल समृद्ध होईल, की, कमजोर होईल याची चिंता नुसतीच अर्थहीन कावकाव करणा-यांनी तर मुळीच करू नये! माझी साधना/तपस्या त्याची काळजी घ्यायला समर्थ आहे! २५/३० वर्षांच्या डोळस गझललिखाणानंतर मी हे लिहीत आहे!

टीप: ‘माझी गझल पुरेपूर समृद्ध झाली’, ‘मी म्हणतो तेच बरोबर’, मला गझल समजली’, ‘मी हे सर्व कोळून प्यालो’ इत्यादी पोकळ दावे मी कधीच करत नाही.
अजूनही मी गझलक्षेत्रातच काय, पण भूशास्त्रातही ३०/३५ वर्षांपूर्वी होतो, तसाच शिकणारा विद्यार्थी आहे, असे मी मानतो, जरी पेशाने मी प्राध्यापक(भूशास्त्राचा) असलो तरी!

चांगले असेल तर, शेंबड्या पोराचेही घेतो!..........हे आमचे व्यक्तीमत्व!

आतापर्यंतच्या आमच्या गझलांवरून व प्रतिसादांवरून, आमच्या वावराबाबत व्यक्त केलेला निष्कर्ष पाहून, आपल्या सौंदर्यबोधाची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे!

जाता जाता आज सकाळी सकाळीच लिहिलेला आमचा एक शेर देतो व थांबतो.........

गझल हृदयामधे माझ्या! गझल श्वासांमधे माझ्या!
गझल मी रोज अंथरतो, गझल मी रोज पांघरतो!!
..........प्रा.सतीश देवपूरकर
.........................................................................................

कधी तरी आत्मपरीक्षण करा.
इथे प्रतिसाद देणारे तुमच्या गझलेत काही खटकलं तर सांगतात्,पर्यायाने तुमची गझल अधिक समृद्ध व्हावी ह्याच मनोवृत्तीचे आहेत.

परंतु, तुमच्या गझलेची तारीफ करणारे प्रतिसादच तुम्हाला आवडतात हे तुमच्या एकंदर वावरा वरुन दिसून येते आहे.कुणी उणीवा दाखवल्या की लांबच्या लांब प्रतिसाद देवून आपण जिंकल्याचा आव आणता.

ह्या तुमच्या गझलेत इतका ''मी''पणा आहे की त्याला तोड नाही.तगज्जुल मात्र नगण्य आहे.

इतरांशी जाऊ द्या,फक्त गझलेशी प्रामाणिक रहा>>>>

१०१ % सहमत.

-सुप्रिया.

पालथ्या घड्यावर पाणी!.........हेच खरे!
म्हणी काही खोट्या नसतात!
१०१% सहमत!
>.........प्रा.सतीश देवपूरकर

प्रोफेसर साहेब किती एकांगी विचार करता आपण!

तुमच्या मतानुरुब मत नसेल तर म्हणी म्हणून लेक्चर देवून मोक्ळे होता.

आपण जे शिकवतो ते विद्यार्थ्यांना समजले तरी पाहिजे की नको ?

सुप्रिया जाधव. | 1 October, 2012 - 10:53 नवीन

कधी तरी आत्मपरीक्षण करा.
इथे प्रतिसाद देणारे तुमच्या गझलेत काही खटकलं तर सांगतात्,पर्यायाने तुमची गझल अधिक समृद्ध व्हावी ह्याच मनोवृत्तीचे आहेत.

परंतु, तुमच्या गझलेची तारीफ करणारे प्रतिसादच तुम्हाला आवडतात हे तुमच्या एकंदर वावरा वरुन दिसून येते आहे.कुणी उणीवा दाखवल्या की लांबच्या लांब प्रतिसाद देवून आपण जिंकल्याचा आव आणता.
सुप्रिया जाधव. | 1 October, 2012 - 11:14 नवीन

प्रोफेसर साहेब किती एकांगी विचार करता आपण!

--------> मिसेस सुप्रिया ताई,

कोणताही साहित्यीक हा एकांगीच असतो, आणि म्हणुनच एका इंग्लिश तत्वचिंतकाने म्हटले आहे -
If a man dose not keep pace with his companions perhaps it is because he hears a different drummers.

देवसरांना केवळ त्यांच्या गझलेची तारीफ करणारे प्रतिसादच आवडतात असे आपले म्हणने फार चुकीचे आहे. कारण मी स्वत: एखादी गझल न आवड्ल्याची प्रतिक्रीया व्यक्त केल्यावर देवसरांनी स्वतः ते मान्य करून आभार मानल्याचे मला ठाऊक आहे. त्यांच्या गझलेतील यथायोग्य दोष दखवल्यास ते स्विकारल्या शिवाय ते रहात नाहीत.
मला देवसरांच्या कित्तेक गझला आवडतात तशा कित्तेक निकृष्ठ ही वाटतात. पण कोणत्याही निकृष्ट गझलेवर मी दिलेल्या प्रतिसादावर ते कधीच अहमपणाने बोलले नाहीत. हा माझा तरी अनुभव आहे.

आणि आहे ही गझल मला ही फारशी आवडलेली नाही. पण यामध्ये त्यांच्यावर आरोप करण्यासारखे काहीच नाही. कारण मनस्वी कलाकाराच्या कोणत्याही निर्मित्ती मागे कोणताही कुटील वा अभिमानाचा हेतू कधीच नसतो.

तेव्हा देवपुरकरच काय पण कोणत्याही लेखक्/कवी वर असा आरोप करणे योग्य नाही. आणि माझ्या मते एखाद्या कलाकारामध्ये त्याच्या कलेविशयी असणारा अभिमान हा योग्यच असतो( तो असावाच) कारण तुम्ही या साहित्य वर्तुळाच्या बाहेरील जग पहा तिथे तुमच्या अंतर्यामातून कागदावर उअतरलेल्या शब्दाला कितीशी किंम्मत असते??

कृगैन. ( काही अशुध्द लेखणाबध्दल क्षमस्व)

अवांतर: माझ्या बहुतेक गझला, परमेश्वर कृपेने, प्रसिद्ध झालेल्या व शेकडो वेळा मुशाय-यात, ख-या ख-या तज्ञांपुढे, पेश करून झाल्या आहेत
>>>
हे वाचुन तुमचे नाव (इन्ग्लिश मध्ये) गुगलुन बघितले, काहीही सापडले नाही.
मराठीत टायपुन बघितल्यावर ऐलपैल आणि माबो अशा दोनच ठिकाणी सापडले.
कृपया गैरसमज नसावा.

तळटीपः वरिल माहितीवरुन ज्याला जसा पाहिजे तो अर्थ काढु शकता...

छान

आहो बोल्ड टायपात गुगलून गुगलून तरी काय गुगलणार.... ठाव न्हाय का----->

वाटला तुकड्यात गेलो, एवढे गेले तडे!
शोधतो जो तो मला अन् मी न कोणा सापडे!!

प्रोफेसर साहेब,

एकदा तुमचा एखादा प्रतिसाद आरश्यावर पोस्ट करून बघा.......... १००% फुटेल.

=======================

>> पालथ्या घड्यावर पाणी!.........हेच खरे!
म्हणी काही खोट्या नसतात!
१०१% सहमत!

>.........प्रा.सतीश देवपूरकर <<

अगदी !! कधी तरी उपडे होऊनही प्रतिसाद द्यावा !

>>नुसतेच त्रोटक, हवेत गोळीबार करून, मी कधीच काढता पाय घेत नाही वा पलायनही करत नाही! ते माझ्या रक्तात नाही!<<

लैच विनोदी !! तूर्तास ह्याच धाग्यावरील 'घमघमाटा'बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे सांगावं.

देवपूरकर,
कधी तरी आत्मपरीक्षण करा.
इथे प्रतिसाद देणारे तुमच्या गझलेत काही खटकलं तर सांगतात्,पर्यायाने तुमची गझल अधिक समृद्ध व्हावी ह्याच मनोवृत्तीचे आहेत.

परंतु, तुमच्या गझलेची तारीफ करणारे प्रतिसादच तुम्हाला आवडतात हे तुमच्या एकंदर वावरा वरुन दिसून येते आहे.कुणी उणीवा दाखवल्या की लांबच्या लांब प्रतिसाद देवून आपण जिंकल्याचा आव आणता.

ह्या तुमच्या गझलेत इतका ''मी''पणा आहे की त्याला तोड नाही.तगज्जुल मात्र नगण्य आहे.

इतरांशी जाऊ द्या,फक्त गझलेशी प्रामाणिक रहा<<<<<<

Lol

देवपुरकरमामांनी कुपीला बूच लावले असे दिसते. घमघमाट बंद झाला. की आता अत्तरे हुंगणार्‍यांना एक्झॉस्टफॅनचे स्विच मिळाले?

ओ कोतवाल अत्तर निवान्त कपाटाच्या मागं पडून होतं. कशाला पुढं ओढून झकण उघडलं. Lol
प्रोफेसर अहो काय गझल का काय ही ? यात काही काव्य नाही हे तुम्हाला समजत नसेल हे हि मान्य होत नाही. प्रत्येक शेरापुढे वाचक थबकला पाहिजे तिथं तो 'बरं मग?'म्हणेल. असो.

पारिजाता,
प्रोफेसर अहो काय ग्झल का काय ही ? यात काही काव्य नाहि<<<<<<<<<
पहिले शुद्ध मराठी लिहायला शिकावे!
काव्य, गझल तर दूरची बाब झाली!
आणि आपण आणि काव्य?
आपण आणि गझल?
फारच विजोड वाटतय हो!
एक निर्दोष स्वरचित गझल पोस्टा आधी व मग काय ते तारे तोडा!

प्रा.सतीश देवपूरकर

Pages