जेव्हा 'देव' 'जमिनी'वर येतो.. (Oh My God - Movie Review)

Submitted by रसप on 30 September, 2012 - 01:08

विचार करण्याची क्षमता असणे, बुद्धीचा अधिक परिणामकारक उपयोग करणे, ह्या वैशिष्ट्यांमुळे मानव हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा व श्रेष्ठ समजला जातो. जे बरोबरही आहे. पण ह्या मानावाच्याही हातात अनेक गोष्टी नाहीत. अनेक ठिकाणी हा हतबल होतो, लाचार होतो. तेव्हा 'हे देवाच्या हातात आहे', असं म्हणून तो स्वत:ची लाचारी मान्य करतो व ते मान्य करत असतानाही इतर प्रन्यांहून श्रेष्ठत्व सांभाळतोच. इतपत ठीक आहे. पण आजच्या घडीस देव-धर्माने दांभिक रूप घेऊन गावोगावी धंदा मांडला आहे, २१ व्या शतकात पाउल ठेवलेलं असतानाही अनेक अंधश्रद्धांच्या जोरावर (भीतीवर) सुशिक्षित व सुसंस्कृत लोकांनाही फसवलं जात आहे किंवा असं म्हणू की सुजाण लोकही त्याच्या आहारी गेले आहेत... (अशिक्षितांचं तर सोडाच..!) त्याचं काय ? देवाला नवस बोलून, सोन्या-चांदी-पैश्यांची एक प्रकारे लाच देऊन आपली श्रद्धा दाखवणं योग्य आहे ? तो तर जागोजागी आहे ना ? मग मंदिरं का ? बरं, मंदिरं असावीत... प्रार्थनेच्या, साधनेच्या जागेसाठी म्हणून पण मग अमुक देव जागृत वगैरे काय आहे ?
- असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. पण आपण ते स्वत:च नाकारतो किंवा क्वचितच हे प्रश्न विचारण्याची हिंमत करतो. आणि जो माणूस हे प्रश्न वारंवार विचारतो, त्याला - जरी आपल्यालाही ते प्रश्न पडत असले तरी त्यांच्यापासून स्वत:च पळून - त्याला 'नास्तिक' म्हणवतो/ म्हणतो. 'ओह माय गॉड' हेच प्रश्न पडद्यावर विचारतो, बिनधास्त !

220px-OMG!_Oh_My_God_poster.jpg

कानजी मेहता (परेश रावल) मुंबईत राहाणारा एक गुजराती व्यापारी असतो. त्याचं देवाच्या मूर्ती, फोटो विकण्याचं चांगलंसं दुकान असतं. धंदा जोरदार असतो. देवाच्या मूर्ती विकत असला, तरी कानजी स्वत: देवाला मानत नसतो. टिपिकल धंदेवाईक बुद्धीने तो लोकांना फसवतही असतो. त्यांच्या भाबड्या श्रद्धांचा गैरफायदा घेऊन लुबाडतही असतो. कानजीचा लहान मुलगा दहीहंडी उत्सवात गोविंदा बनतो. तो हंडी फोडणार इतक्यात कानजी 'श्रीकृष्ण दही खातो आहे' अशी खोटी वावडी पसरवून लोकांना पांगवतो आणि हंडी न फोडताच मुलाला खाली उतरवतो. तत्क्षणी हलकासा भूकंपाचा धक्का बसून मुंबई हादरते. काहीही नुकसान होत नाही पण संपूर्ण मुंबईत फक्त एक दुकान जमीनदोस्त होतं, ते असतं कानजीचं. लाखो रुपयांचं नुकसान होतं. घर गहाण ठेवून दुकानासाठी कर्ज काढलेलं असतं.. आणि विमा कंपनी कुठलीही भरपाई देण्यास नकार देते कारण विम्याच्या अटींत 'Act of God' ला संरक्षण नसतं. अर्थात, ज्या दुर्घटनांवर मनुष्याचा जोर नाही अश्या त्सुनामी, भूकंप, ई. घटना. जमीनदोस्त झालेल्या दुकानाची जमीनही कुणी अपशकुनी जमीन असल्याच्या समजुतीपायी विकत घेण्यास तयार होत नाही. आता काय करायचं ? ह्या विवंचनेत असलेल्या कानजीला एक वेगळीच कल्पना सुचते. 'माझं नुकसान देवाने केलं आहे ना? ठीक आहे. मग देवाने मला भरपाई द्यावी!' असा दावा घेऊन तो न्यायालयाचे दरवाजे ठोठावतो. कुठलाही वकील त्याची केस घेण्यास तयार होत नसतो म्हणून स्वत:च स्वत:ची केस मांडून चतुर युक्तिवाद करतो व खटला दाखल करून घेण्यास भाग पाडतो. प्रतिवादी म्हणून विविध खंडापीठांचे गुरू, मशिदींचे इमाम व चर्चेसचे फादर आणि विमा कंपनी ह्यांना नोटीसा बजावल्या जातात आणि सुरू होतो एक अभूतपूर्व न्यायालयीन लढा - मानव वि. देव !!
खटल्याची बातमी देशभर पसरते आणि देशाच्या कोपऱ्या-कोपऱ्यातून लोक आपापल्या फिर्यादी घेऊन येतात व 'आम्हालाही भरपाई हवी आहे' अशी मागणी ठेवतात. कानजी व इतर सर्व फिर्यादींची मिळून भरपाई रक्कम ४०० कोटींच्या घरात पोहोचते आणि विमा कंपनी व धर्मगुरू बेचैन होतात.
खटला दाखल झाल्यावर कानजीला जीवे मारायचा प्रयत्न होतो तेव्हा त्याच्या मदतीला साक्षात भगवान श्रीकृष्ण मनुष्यरुपात (अक्षय कुमार) धावून येतात आणि नंतर खटला चालू असतानाही त्याची मदत करत राहातात.

पुढे काय होतं ? कानजी खटला जिंकतो का ? देवावर त्याचा विश्वास बसतो का ? धर्माचे दांभिक स्वरूप लोकांना समजते का ? असे अनेक प्रश्न सिनेमा पाहिल्यावर सुटतील. किंबहुना, ते तसे सुटण्याचे अनुभवण्यातच खरी मजा आहे. तेव्हा सिनेमा अवश्य पाहाच !

सिनेमात, इतर धर्मांपेक्षा हिंदू धर्मावर अधिक टीकात्मक भाष्य केले आहे. कारण सरळ आहे - स्वत: 'कानजी' हिंदू आहे ! पण असं होत असताना त्याच्या सोबतीला स्वत: देवानेच उभे राहाणे, ही कल्पना धर्माचा अपमानही होऊ देत नाही. किंबहुना, मनुष्यासाठी त्याचा धर्म किती महत्त्वाचा आहे हे सिद्ध करते. एक फार सुंदर वाक्य ह्या सिनेमात आहे. 'लोगों से उनका धरम मत छिनना, वरना वोह तुम्हे अपना धरम बना लेंगे !' ह्या व्यतिरिक्त असे अनेक दमदार संवाद तितक्याच दमदार फेकीने दाद घेऊन जातात. जसं की - 'These are not Loving people, these are fearing people' असं जेव्हा धर्मगुरू (मिथुन चक्रवर्ती) कानजीला सांगतो तेव्हा खरोखर पटतं की खरंच देवाला मानण्यात, त्याची प्रार्थना करण्यात आपली श्रद्धा नसते तर भीती असते.

संगीताला फार वाव नाही पण जे आहे ते श्रवणीय आहे. अक्षय कुमार, महेश मांजरेकर, मिथुन चक्रवर्ती, गोविंद नामदेव सगळे आपापली कामं चोख निभावतात. पण सिनेमा खिश्यात घालतो अर्थातच 'कानजी भाई' परेश रावल. अगदी सहजसुंदर अभिनयाने परेश रावल कानजीचे विचार आपल्याला आपल्याच नकळत पटवून देतो. आणि मनोमन आपण हाच विचार करतो की देव हरावा व कानजी जिंकावा.

हा सिनेमा एका गुजराती नाटकाचे सिनेरुपांतर आहे. मूळ नाटक सिनेमाचे दिग्दर्शक 'उमेश शुक्ला' ह्यांचेच आहे. विषयाला धरून, थोडीशी 'फिल्मी लिबर्टी' (न्यायालयीन कामकाजाबाबत) घेऊन मार्मिक भाष्य करणारा, विनाकारण फाफट पसारा न मांडता व्यक्त होणारा हा सिनेमा निश्चितच पाहण्याजोगा वाटला.

रेटिंग - * * *
http://www.ranjeetparadkar.com/2012/09/oh-my-god-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिनेमा पाहिला नाहि, पण यातील तुम्हि दिलेले एक वाक्य पाहुन ( These are not Loving people, these are fearing people) असे वाटते हि तर ओशोंनी जे सांगितले आहे त्याची copy केली आहे

एक चांगला सिनेमा, छान परिक्षण.smile.gif
संपुर्ण सिनेमा कांजीभाई(परेश रावल) आणि श्रीकृष्ण वासुदेव यादव(अक्षय कुमार) या दोघांवरच आहे. परेश रावलने आपल्या उच्च अभिनयाने साकारलेला "कांजीभाई" हे पात्र तर अप्रतिम झालय, न्यायालयात कांजीभाई आणि धर्मगुरु यांचे वादविवादाचे प्रसंगही छान चित्रीत केलेत. मिथुन चक्रवर्ती, गोविंद नामदेव, महेश मांजरेकर यांचा अभिनय ही प्रभावित करतो. एकूण अगदि सहपरिवार पाहण्यासारखा चित्रपट आहे हा.

अरे हा सिनेमा एका ईंग्रजी सिनेमावरून चोरलाय. नेमके नाव आठवत नाहिये आता पण आठवले की टाकतो. पण तो एक उत्क्रूष्ट सिनेमा आहे ज्यात नायक सगळ्या चर्चेस च्या फादर्सना गुंतवितो. एक तर नुकसान भरपाई द्या किंवा देवाचे आस्तित्व अमान्य करा ह्या तत्वावर तो लढाई जिंकतो, पण न्यायालयीन पहाण्यासारखी आहे
त्यातील वकिलाचा रोल करणारी (कि वार्ताहर???) नायिका एकदम जबरदस्त

पण सिनेमा खिश्यात घालतो अर्थातच 'कानजी भाई' परेश रावल. + १००००००

मस्त सिनेमा. एकदा नकीच पहावा.

रणजित, फारच छान लिहिलंस.... नक्कीच बघणार हा सिनेमा, थीम जबरीच दिस्तेय......

अवांतर - आर्ग्युमेंट्समधे माणूस भगवंतालाही हरवेल..... - ओशो.

पण सिनेमा खिश्यात घालतो अर्थातच 'कानजी भाई' परेश रावल. >> त्यांचं या विषयावरचं हिंदी नाटक आलं होतं त्याचे एकून ५०० प्रयोग झाले, आता त्याचं रूपांतर सिनेमात झालंय असं परवा टिव्हिवर पाहिलं. चांगला असेल सिनेमा बहुतेक.

खरेच असा वेगळा विषय ( नाटकातून का होईना ) घेऊन चित्रपट काढला हे कौतूकाचे आहे. नक्की बघणार.

कानजी व्हर्सेस कानजी ..

बघायचाय सिनेमा. परीक्षणाबद्दल धन्यवाद. निर्माते परेश रावल आणि अक्षयकुमार आहेत ना ?

आयला मी समजत होतो पडाक पिच्चर असणार म्हणून !!
बघतोच आज !! तसाही आमच्या पंढरपुरात हाच पिच्चर लागलाय
धन्स रे जितू !! सर्व प्रतिसादकान्चेही अनेकानेक आभार !!
उगाच एक चांगला पिच्चर मिस झाला असता नै तर !!

पुनश्च धन्स टू ऑल!!

नेहमीप्रमाणेच मस्त रे.....

जितू, आता एखादं परिक्षण सिनेमा रिलीज व्हायच्या आदल्याच दिवशी येऊ दे रे Proud

सिनेमा पाहून काही लिहायच्या आधी पहिल्याच दिवशी तुझं परिक्षण आलेलं असतं.... Wink

माझा एक मित्र सगळे पिक्चर (उत्तम,चांगले आणि बरे कॅटॅगरीतले) फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा... आता एव्हरी संडे मॉर्निंग शो घराशेजारच्या थिएटरात बघतो...... त्याच्या बाबांना ही सवय होती पुढे याने चालू ठ्रेवली.... बर्‍याचदा दोघे एकत्र जातात सिनेमाला Proud अजूनही.....

त्या दोघांनंतर तूच सापडलास बाबा ईमानेऐतबारे फर्स्ट डे मूव्ही पाहणारा

_________________________/\__________________________ Happy

जितू, आता एखादं परिक्षण सिनेमा रिलीज व्हायच्या आदल्याच दिवशी येऊ दे रे > > DesiSmileys.com

सिनेमा पाहून काही लिहायच्या आधी पहिल्याच दिवशी तुझं परिक्षण आलेलं असतं....> > DesiSmileys.com

धन्यवाद !!

मस्त पिच्चर आहे..जरूर पहावा....गूरूवारी ९.३०/ १० चा शो बघ्न्यासाठी ३/४ थीएटर्स फिरलो...चक्क सगळीकडे हाऊस फूल होता. सिनेमॅक्स, सिटीलाईट, चित्रा वैगरे फिरून शेवटी प्लाझा ला बघितला.

ठिक वाटला.
इतका खास नाही.

सोनाक्षीचे गाणं पाहून, हि नक्की खाते तरी काय?... हा प्रश्ण पडतोच पडतो.. :फिदी:. भयंकर दांडगट दिसते.

कमालच झाली. !!!! नेहमी 'त्यांना' शिव्या देणारे लोक शिनेमा आवडला आवडला म्हणून इथे आरोळ्या ठोकत बसलेत!!!!

शिनेमा बघणार्‍या हिंदु भाविकानो , शिनेमाचा शेवट समजला का तुम्हाला ?

'बुतशिकन' बना!! Proud ( पिवळी ?? नगं , हिरवी स्मायली टाकूया .. Biggrin )

एक महिनाभर थांबा........ वर्ल्ड प्रिमिअर येईल...... टीव्हीवरच बघण्यासारखा आहे Proud

पण सिनेमा खिश्यात घालतो अर्थातच 'कानजी भाई' परेश रावल. >> +१००
एकदा बघण्यासारखा नक्कीच आहे .

आंबा जी , काढायचाच म्हटला तर कशातूनही काहीही अर्थ काढतो येतो . माझ्या नजरेतून मला तरी हा चित्रपट देवा विरूद्ध नाही तर देवाच्या नावाखाली चालणार्या बाजारीकरणाविरूद्ध वाटला .

बुतशिकन म्हणजे मूर्तीभंजक... मूर्त्या फोडनारे आणि ईश्वर मूर्तीत नसतो असे माननारे.

म्हणजे कुठला धर्म? असे इचारु नये. समजून घ्यावे.

सामी +१
मी पण गेले होते. पण चित्राला हाउसफुल्ल होता. Sad
आता शनिवारी. नैतर मग इं विं बघेन प्रिमियरला Happy

पण सिनेमा खिश्यात घालतो अर्थातच 'कानजी भाई' परेश रावल. >> +१००
एकदा बघण्यासारखा नक्कीच आहे . चित्रपटातुन दिलेला मेसेज चांगला आहे.

Pages