लहानपणापासुन आम्ही गौरी -गणपतीची आतुरतेने वाट बघायचो. कोल्हापुरला असल्याने नागपंचमीपासुन फेर धरायला चालु व्ह्यायचा. आधी एवढा उत्साह नसायचा कुणाला पण जसा गणपती जवळ यायचा तसे सगळे गोळा व्हायचे. मग एकदा का गणपती आले की ५-७ दिवस रात्री १-२ वाजेपर्यंत धमाल यायची.. आता सगळ्याजणी लग्न करुन कुठे -कुठे गेल्या , आधी सारखं एक्त्र यायला नाही जमत. पण सण आला की मनात अजुनही ती गाणी फेर धरतात.. जशी आठ्वली तशी ईथे देतेय..
माझं ठरलेलं पेटंट गाणं..
१) गण्या गुलाल उधळीतो..
गण्या गुलाल उधळीतो..
त्याच्या गुल्लालाचा भार, आमच्या जोडव्या झाल्या लाल..
जाऊन यशोदेला सांग , कृष्ण झिम्मा खेळीतो..
गण्या गुलाल उधळीतो..
गण्या गुलाल उधळीतो..
त्याच्या गुल्लालाचा भार, आमच्या पैंजण झाल लाल..
जाऊन यशोदेला सांग , कृष्ण झिम्मा खेळीतो..
असेच साखळ्या, तोडे, अशी दागीने वापरुन गाणे लांबवता येते..
२) ऊठ ऊठ माळीदादा बैलं झुंप रहाटाला...
ऊठ ऊठ माळीदादा बैलं झुंप रहाटाला...
बैलं झुंप रहाट्ला की पाणी जाऊदे पाटाला..
पाणी जाऊदे पाटाला की वाळ्कीच्या देटाला...
पाणी जाऊदे पाटाला की वाळ्कीच्या देटाला...
एवढ्या वाळका कशाला..एवढ्या वाळका कशाला
गौराईच्या ववश्याला गं गण्पतीच्या पुजेला..
गौराईच्या ववसा फुलांनी डरवळ्ला गं ऊदांनी परमळला...
ऊठ ऊठ माळीदादा बैलं झुंप रहाटाला...
ऊठ ऊठ माळीदादा बैलं झुंप रहाटाला...
बैलं झुंप रहाट्ला की पाणी जाऊदे पाटाला..
पाणी जाऊदे पाटाला की दोड्क्याच्या देटाला...
पाणी जाऊदे पाटाला की दोड्क्याच्या देटाला...
एवढ् दोडके कशाला..एवढ् दोड्के कशाला
गौराईच्या ववश्याला गं गण्पतीच्या पुजेला..
गौराईच्या ववसा फुलांनी डरवळ्ला गं ऊदांनी परमळला...
ऊठ ऊठ माळीदादा बैलं झुंप रहाटाला...
ऊठ ऊठ माळीदादा बैलं झुंप रहाटाला...
बैलं झुंप रहाट्ला की पाणी जाऊदे पाटाला..
पाणी जाऊदे पाटाला की खारकीच्या देटाला...
पाणी जाऊदे पाटाला की खारकीच्या देटाला...
एवढ्या खारका कशाला..एवढ्या खारका कशाला
गौराईच्या ववश्याला गं गण्पतीच्या पुजेला..
गौराईच्या ववसा फुलांनी डरवळ्ला गं ऊदांनी परमळला...
३) एका वहिनीने सांगितलेले हे माझे फेवरीट गाणं..
सासुने आण्ली साडी.. सासुने आण्ली साडी..
पिवळी त्याची धडी..पिवळी त्याची धडी..
नाही गं माझ्या मनाला , घाला त्याची घडी..
सासर्याने आण्ली साडी.. सासर्याने आण्ली साडी..
नीळी त्याची धडी..नीळी त्याची धडी..
नाही गं माझ्या मनाला , घाला त्याची घडी..
दिरानी आण्ली साडी.. दिरानी आण्ली साडी..
हिरवी त्याची धडी..हिरवी त्याची धडी..
नाही गं माझ्या मनाला , घाला त्याची घडी..
जावेने आण्ली साडी.. जावेने आण्ली साडी..
काळी त्याची धडी..काळी त्याची धडी..
नाही गं माझ्या मनाला , घाला त्याची घडी..
पतीने आण्ली साडी.. पतीनेआण्ली साडी..
रेश्मी त्याची धडी..रेश्मी त्याची धडी..
गणपतीच्या सणाला मोडेन त्याची घडी..
आठवेन तस अॅड करेन ... कुणाला येत असतील त्यांनी पण अॅड करा...