तों.पा.सू. - पार्टी टाईम - वर्षा व्हिनस

Submitted by यशस्विनी on 27 September, 2012 - 09:42

नमस्कार मायबोलीकर्स,

तों.पा.सु., मायबोली गणेशोत्स्व २०१२ या स्पर्धेसाठी मी थीम निवडली आहे "पार्टी टाईम", मग यामध्ये बर्थडे पार्टी, वेडिंग पार्टी किंवा आपले एखादे घरगुती गेटटुगेदर असो, त्यासाठी आपला सर्वसाधारण मेनु असतो केक,मिठाई,स्वादिष्ट जेवण व शेवटी मुखवास म्हणुन पानाचा विडा Happy
मी स्वादिष्ट जेवण वगळता बाकीचे पदार्थ बनवले आहेत, तर सर्व मायबोलीकरांना विनंती कि त्यांनी या चविष्ट व तोंपासु पदार्थाचा मनमुराद आस्वाद घ्यावा Happy ( अर्थात फक्त फोटो पाहुन Proud )

हे पदार्थ बनविण्यासाठी मी वापरलेले साहित्य खालीलप्रमाणे

साहित्य :-

१. क्ले
२. सिल्व्हर फॉईल
३. कार्डपेपर
४. फेव्हिकॉल
५. रंग
६. सुई

कृती :-

१. खालील प्रचिंमधील सर्व पदार्थ क्ले हाताने मळुन, त्याला विविध आकार दिले आहेत.
२. काजुकतलीवरील चकाकीसाठी सिल्व्हर फॉईल बारीक कापुन फेव्हिकॉलने चिकटवली आहे.
३. केकचा बेस बनविण्यासाठी कार्डपेपर हवा असलेल्या आकारात कापुन त्याला सिल्व्ह फॉईलने कव्हर केले आहे.
४.कापलेला केक आतुन जाळीदार करण्यासाठी त्यावर सुई हलक्या हाताने फिरवली आहे.
५. पानाचा विडा बनविताना लवंगेसाठी सफेद क्ले वापरुन त्याला रंगाने शेंडीग केले आहे. विडा खरा वाटण्यासाठी क्लेवर सुईने पानाचे टेक्स्चर दिले आहे

पदार्थांची नावे :-
१. केक्स - वेडिंग केक, लव्ह केक, बर्थडे केक्स
२. पेढे - सफेद व केशरी
३. काजुकतली
४. पानाचा विडा

१.

Cake 1 (800x632).jpg

२.

Cake 2 (800x607).jpg

३.

Cake 3 (800x538).jpg

४.

Cake 4 (800x730).jpg

५.

Cake 5 (800x617).jpg

६.

Cake 6 (800x692).jpg

७.

cake 7 (800x697).jpg

८.

Cake 8 (800x531).jpg

९.

Cake 9 (800x512).jpg

१०.

Cake 10 (800x531).jpg

११.

Cake 11 (800x620).jpg

१२.

Cake 13 (800x591).jpg

आशा करते की मायबोलीकरांना मी बनवलेले पदार्थ आवडतील व त्याचा मनमुरादपणे ते आस्वाद घेतील Happy

धन्यवाद Happy

-----
वर्षा व्हिनस

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव.. सुप्पर्ब गं वर्षा...
वर्षा नावाचे सगळेच आर्टिस्ट अस्तात नै?? Wink

सगळे पदार्थ मस्त आहेत. पांढर्‍यापेक्षा पिवळे पेढे अगदी हुबेहुब आहेत. मिल्क पावडर / खव्याचे खायचे विडे करतात ते अगदी ह्याच रंगाचे दिसतात त्यामुळे ते खूप आवडले Happy

धन्स Happy

वर्षुताई हो ना, मायबोलीवर जेवढया म्हणुन वर्षा आहेत त्या सर्व आर्टिस्ट आहेत Happy अर्थात माझा नंबर खालुन पहिला बरं का Happy

सह्हीच. सगळे केक्स एकदम तोंपासु.

तो कापलेला केक आतून जाळीदार कसा केलास?

>>>>> वर्षा नावाचे सगळेच आर्टिस्ट अस्तात नै?? >>>>>> वर्षुताई ... Rofl

जिवाला त्रास आहे! खायला तर मिळत नाही नि नुसतं बघून समाधान मानायचं... ह्या! Proud

वर्षा, Light 1

मस्त कलाकारी!

कापलेला केक आतुन जाळीदार करण्यासाठी त्यावर सुई हलक्या हाताने फिरवली>>>मला वाटले तो स्पंज आहे.

Pages