हिना रब्बानीची प्रेम कहाणी,खफा-खफा बिलावलवर झरदारी

Submitted by गारम्बीचा बापू on 26 September, 2012 - 12:03

एबीपी माझा वेब टीम, मुंबई

इस्लामाबाद : पाकिस्तानात तालिबान्यांकडून कडवा रूढीवाद जोपासला जात असतांना, हिना रब्बानी खार आणि बिलावल भुट्टो यांच्या प्रेमाची खमंग चर्चा रंगलीय.

hina affair.jpg

हिना आणि बिलावलच्या या प्रेमप्रकरणावर बिलावलचे ‘अब्बाजान’ आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी भलतेच ‘खफा’ असल्याचं सांगण्यात येतंय.

हिनाच्या प्रेमात बिलावलची ‘बर्फी’ झालीय, हे जेव्हा झरदारी यांना समजलं तेव्हा त्यांनी या प्रकरणातली ‘हिरोईन’ हिनाला घरी बोलावलं, आणि ही 'गुस्ताखी' माफ करता येणार नाही, हे थांबवं अशी ‘हिदायत’ दिली आहे.

पण हिना रब्बानी खार मात्र काहीही ऐकायला तयार नाहीय. झरदारींच्या दृष्टीकोनातून हिना-बिलावलचं प्रेम ‘हलकट जवानी’ असली, तरी हिना यांनी आपल्या परराष्ट्र मंत्रीपदाची ‘कुर्बानी’ देऊन, 'मिनिस्ट्री ऑफ लव्ह अफेअर्स'चा कार्यभार सांभाळण्याची तयारी ठेवली आहे.

बिलावल भुट्टो हे ही आपला ‘दबंग’ अंदाज दाखवतील असं म्हटलं जातंय. राजकारणासह देश सोडून झरदारींशी 'बगावत' करण्याची तयारी केली आहे. हिना रब्बानी खार यांनी आपल्या करोडपती पतीला सोडचिठ्ठी देण्याची तयारी सुरू केली आहे. हिना रब्बानी यांना दोन मुली आहेत.

हिना यांनी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी बिलावल यांना पुष्पगुच्छ पाठवलं होतं. त्यानंतर राष्ट्रपती झरदारी यांना बिलावलने प्रेमात लावलेले 'चार चाँद' नजर आले, आणि चोरी-चोरी. चुपके-चुपके काही तरी चालू असल्याचं कळलं. हिना यांनी बिलावलला पुष्पगुच्छसोबत एक पत्रही पाठवलं होतं. त्यात लिहलं होतं, "कोई शक नहीं कि हमने काफी इंतज़ार कर लिया है, और क्या यह समय इंतज़ार को खत्म करने का नहीं है... ईद मुबारक..."

हिना रब्बानी या पाकिस्तानच्या सर्वात युवा परराष्ट्र मंत्री आहेत. हिना रब्बानी खार या ३५ वर्षांच्या आहेत. तर बिलावल भुट्टो हे २४ वर्षांचे आहेत. बिलावल भुट्टो हे माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो आणि राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचे चिरंजीव आहेत.

ऋषिकेश बर्वे यान्च्या लेखावरुन साभार ,पूर्व-अनुमतीने प्रकाशित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

who cares!!! आपल्याला काही फरक पडतोय?? उगाचच मायबोलीची जागा वाया घालवू नका.

ऋषिकेश बर्वे यान्च्या लेखावरुन साभार ,पूर्व-अनुमतीने प्रकाशित

त्याची काय गरज होती? लेखाचा बाप कोण, परवानगी कुणाची??? Proud

http://abpmajha.newsbullet.in/technology/technology/20524

नारदा, असल्या गोष्टी चालू घडामोडी या एकाच धाग्यात घालायच्या असतात. चार दिवस चर्चा होते, मग वाहून जातात.

सचिन गोरे उर्फ जो कोणी अहे तो, तुम्च्याशि सभ्य आनि विनोदी/उपहासात्मक सगळे प्रकारानी समजावून झाले , इथे दादागिरी कसली करताय?
आणि तुम्ही नेमके माझ्याच धाग्यावर येवुन प्रत्येक वेळेल नखरे कसले करताय? माझ्या सन्यमाची परिक्षा पाहु नका, सान्गुन ठेवतोय....