देव्हार्‍यात बसून तो ठरवतो....तरही

Submitted by वैवकु on 26 September, 2012 - 05:58

गीतेची नसते कुठे शिकवणी जगणे शिकावे कसे
देव्हार्‍यात बसून तो ठरवतो की मी जगावे कसे

आयुष्यात नकोस पाठवु पुन्हा रामायणे , भारते
पाठी कृष्ण समोर राम असतो आम्ही लढावे कसे

माझी अक्कल वेड पांघरुन तुझे की हिंडते विठ्ठला
तू माझा वैरी सखा पर कुणी मी ओळखावे कसे

होते ते घडले असे समजुया आता नव्याने जगू
आम्ही रोजच सूत्र हे विसरता ते आठवावे कसे

कर्मांची इच्छा मुळीच नसता ; का भोगतो वासना
इच्छेची इच्छा तुझीच असता ''आम्ही करावे!!''.....कसे ??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

माझी अक्कल वेड पांघरुन तुझे की हिंडते विठ्ठला
तू माझा वैरी सखा पर कुणी मी ओळखावे कसे

सुंदर भाव. या अर्थाची माझीही एक कविता आहे, टाकेन लवकरच इथे.

कर्मांची इच्छा मुळीच नसता ; का भोगतो वासना
इच्छेची इच्छा तुझीच असता ''आम्ही करावे!!''.....कसे ??

निरुत्तर करणारा प्रश्न!

छानच तरही.