क्ष आणि य# इ. इ.

Submitted by आयडू on 25 September, 2012 - 13:47

***
कृपया लक्षात अस द्या -

क्ष आणि य# ! क्ष आणि य ही एक प्रवृत्ती आहे ! क्ष आणि य हे प्रातिनिधिक असून अजून वाद होऊ नयेत, कुणाही लोकांच्या भावना दुखू नयेत ह्या हेतूने शीर्षक बदललं आहे.

***

नव्या घरात शिफ्ट झालो आणि कीज हातात आल्यावर पहातो तो काय... दारात हे एवढे गुंतवळ, तेलाचे डबे बॉक्सेस, खेळणी, पेपर्स फाईल्स इ. इ. कचरा. पूर्ण दोन दिवस लागले नुसता कचरा घराबाहेर काढायला.

घर आवरून रिनोव्हेट करायला काढलं अन् एका रविवारी श्री. क्ष (जुने फ्लॅट ओनर) भर दुपारी दोन वाजता प्रगट झाले. म्हणे - "काही लेटर्स आली आहेत ती घ्यायला आलो"
घरात कुणी नाही माझा झोप पार मोडलेला चेहरा पाहून ही न पाहिल्यासारखं करत क्ष काकू म्हणतात "काय रे, जेवणं झाली नाहीत ना अजून?"
मी काय बोलू ह्या ह्या विचारात असताना क्ष काका म्हणाले "अगं काहीही काय विचारतेस ?"
मी - नशीब ! (मनात)
क्ष - "एवढ्या लवकर का जेवतात *** ? अजून सैपाकही तयार नसेल." ख्याख्या हसत मला विचारतात "काय रे हो की नाही?"

मी शक्य तेवढ्या शांत सुरात म्हटलं हो खरंय रात्रीचा सैपाक तयार नाही! एवढ्या लवकर कुणी करतं का? सकाळचं जेवण होऊन, भांडी घासून झोपलो होतो तो तुम्ही आलात. बसा.

क्ष काका - "अरे आम्हाला वाटलं जेवण तयार नसेल असून म्हणून म्हटलं.. जोकींग रे"
मी - हो हो. नक्कीच ज्योक कळला हो, काय म्हणता कसं काय?
क्ष काकू - सैपाक घरात डोकावून तिथूनच म्हणाल्या - "अय्या ! हे दरवाजे नकोत का तुम्हाला? आम्ही घेऊन जातो" " कपाटांचे दरवाजे का काढले हो तुम्ही कित्ती चांगले होते .. आमच्या आईंच्या..." पुढची दहा मिनिटं दरवाजे इतिहास ऐकण्यात गेला !
मी - " अहो, चांगले असताना काढले की भाव बरा येईल म्हणून काढले" "जा घेऊन"
क्ष काका - "ते वरचे दरवाजे, ट्रॉलीज, जाळ्यापण काढणार का?"
मी - "हो. सांगेन तुम्हाला"
क्ष काकू - "अरे आमच्या कुंड्या पण आहेत, त्याही घेऊन जातो"
मी - "हो नक्कीच त्याच ना तुटलेल्या? अन् कोळश्याचं पोतं, काकांचा *** गणवेश, कॅलेंडर्स, गाडीचं टायर, टायर ट्यूब, चार विटा, दोन पोती कागद हे ही आहेच सोबत.
क्ष काका - " अरे ते दे टाकून आता, राहिलंच खरं ते घेऊन् जायचं"
मी - "नाही हो कचरावाला पैसे मागतो एवढं सगळं घेऊन जायचा" म्हणून थांबलो तुम्ही द्याल म्हणून"
क्ष काका - "हो कां पैसे कसले मागतो तो?"

कामं करायचे पैसे मागणारे लोक ह्यावर दहा मिनिटं भाषण झाल्यावर गाडी भ्रष्टाचार, रस्त्यांची दुर्दशा, तरुणांचं बेफिकीर ड्रायव्हिंग... ह्या सीमारेषा ओलांडून ***वर घसरली अन् तेवढ्यात माझा फोन वाजला. फोनवर बोलून लेटर्स क्ष काकांच्या हातात देतो तो क्ष काकू म्हणाल्याच ( बारिक लक्ष होतं ह्या बाईंच!) काय रे कुठल्या पिक्चरला?
मी - "एलएसडी"
काकू - "काय?"
मी - "लव्ह सेक्स और धोका"
काकू - "हो का? व्वा ! कोण कोण आहे"
मी - "प्रख्यात हिरो हिरॉईन तसं कुणीच नाही, पाहून सांगतो"
काकू - " अरे नव्हे! तुझ्या बरोबर रे..."
मी - पक्या, विन्या ढमी, अन् सुमी ["it is none of your business हे मनातच Sad ]
काकू - "हे काय रे विचित्र नावं?"
त्या आता नावांवर दहा मिनिटं बोलण्याच्या आत मीच म्हणालो काकू, अहो जरा घाईतच आहे आपण पुन्हा केव्हा तरी बोलूया ह्यावर..
काकू - "हो हो चला क्ष उशीर होतोय" "अरे आमचं काय रे वेळ आहे म्हणून म्हटलं गप्पा मारू... असो पुन्हा केव्हा तरी..."
मी - " ह्म्म्म"
***

आज - काकूंचा फोन - "अरे आमचा एक्जॉस्ट फॅन काढायचा राहिलाय का य आहे ना उन्हामुळे... दहा मिनिटं... तर आम्ही उद्या येतो"
मी - [ ऑफिसच्या कामात बिजी असताना वैतागून हा फोन घेतला ] "नको ! उद्या मला उशीर होईल, अन् परवा पासून मी कोल्हापूरात आहे तुम्ही पुढच्या आठवड्यात या हो"
***

पुढच्या आठवड्यात क्ष येताहेत उरलेली गोष्ट पुढच्या आठवड्यात.
***

हयाला विचित्र अनुभव म्हणता येणार नाही पण माणसं एवढी समोरच्याला गृहीत धरून वागतात हे बघून प्रचंड राग येतो..

क्रमश:

टिपा:

**, ***, ह्या जागी असलेल्या संस्था, व्यक्तींच्या भावना दुखणे भविष्यात शक्य असल्याने नावं काढली आहेत.
# य बद्दल पुढच्या लेखात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

मामी, नेनेंना मायबोली सभासदत्वाला खर्च येतो हेही सांगून पाहायचे का? Proud

आय डू - लय भारी लिहिलं आहे

आयडू, सहानुभुती

२ वर्षांमागे आम्ही रीसेल मध्ये फ्लॅट घेतला. आधीचे ओनर मागाहून येऊन राहिलेले बल्ब चे होल्डर (बल्ब नव्हे, ते आधीच काढून नेले होते), देखील घेऊन गेले. पडद्यांचे रॉड्स कामातून गेले होते ते मात्र ठेवले.
(देव्हार्‍याच्या खाली आपण वास्तुपुरुषाची सोन्याची प्रतिमा पुरतो ती तिथून काढत नाहीत. हे ती जागा उकरून ती ही काढून घेऊन गेलेत. आता काय म्हणावे. )

(देव्हार्‍याच्या खाली आपण वास्तुपुरुषाची सोन्याची प्रतिमा पुरतो ती तिथून काढत नाहीत. हे ती जागा उकरून ती ही काढून घेऊन गेलेत. आता काय म्हणावे. )
--->
सोने महाग झाले आहे असे म्हणावे. तुम्हाला फ्ल्याट विकला. त्यातलं सोनं थोडीच विकलंय? :दिवे:

आयडू...
मुंबईतच रहातोस ना रे?... मला तर पुण्यातली(च) गोष्ट वाचतोय असं वाटत होतं... शेवटी 'मूळ स्वभाव जाईना...' हेच खरं...

@निंबुडा...
आधीचे ओनर मागाहून येऊन राहिलेले बल्ब चे होल्डर (बल्ब नव्हे, ते आधीच काढून नेले होते), देखील घेऊन गेले. पडद्यांचे रॉड्स कामातून गेले होते ते मात्र ठेवले...>>>... तुम्ही निदान 'जागा' विकत घेतलीत म्हणून असं वागले ते लोक... मी पुण्यात अजूनही भाड्याने रहातोय. ४-५ वर्षां पूर्वी, जागा बदलून दुसरी जागा पहायला गेलेलो. मालकाने जागा दाखवली, आम्हाला जागा आवडली म्हणुन व्यवहाराचं बोलणं सुरु केलं. मालकाची पहिली अट - मालकाचं बहुतेक सामान तिथे त्याच जागेत राहील. त्याला हात सुद्धा लावायचा नाही. (तर मग आमचं सामान कुठे ठेवायचं?...)... या अटीवर मी मालकाला भाडं कमी करायची विनंती केली. मालकाचं म्हणणं होतं- मी दिलेल्या भाड्यावर, तो दुसरीकडे स्वतः भाड्याने रहाणार होता... थोडक्यात भाड्याचे पैसे भरून मी, त्याच्या सामानाची रखवाली करायची होती... दुसर्‍या ठिकाणी जागा बघितली, तिथे बल्ब/ट्यूब साठी होल्डर नव्हते. पडद्याचे रॉड्स नव्हते, पंखा नव्हता... मालकाने मला सांगितलं, तुम्हाला जशी गरज लागेल तसं सगळं तुम्ही बसवून घ्या... भाड्यात एक पैसा देखिल कमी होणार नाही... आणी जागा सोडताना स्वखर्चाने लावलेल्या वस्तू/ उपकरणं पुन्हा काढायला देणार नाही, कारण जागेच्या भिंती, छप्पर,,, खराब होतात...
आहेत की नाही नमूने?... Happy

हा हा हा.

घरमालक, भाडेकरू नमुने ह्या विषयावर छान चर्चा झडेल आता.
माझेच एक विडंबन आठवले:

घरमालक - http://www.maayboli.com/node/20595 (काहीच्या काही विडंबन)

Lol
लेखात नेने , जोशी या अडनावांची गरज तितकिशी नव्हती असं मनापासून वाटलं.. >+१

विषय नेहेमीचाच आहे... लेखनशैली ओके आहे.

पण हे निश्चीतच खटकलं:
>>नेने, जोशी ही एक प्रवृत्ती आहे...

(मी जोशी आहे. तुम्ही आहात का हे माहित नाही.. पण वरील लेखात जोशी किंवा नेने काहिही लिहीण्याने "लेखनात" देखिल फार फरक पडत नाही.. मुद्दामून तेव्हड्या करता अ‍ॅडमिन ना तक्रार वगैरे करणे हेही योग्य वाटत नाही... तरिही, असं सरसकट विशेषण निश्चीतच मनात कटू भावना निर्माण करते.
त्याही पेक्षा जास्त खटकले ते: दिव्याचे चित्र चिकटवले की भावना बोथट झाल्या असा गैरसमज आहे का लेखकाचा? तसे असेल तर दिव्याची गरज लेखकाला अधिक आहे- थोडा ऊजेड पडेल बहुतेक!
ईती लेखनसीमा..)

Happy

अवनी, रावी, लेखात आडनावं मुद्दामून लिहिली नाहीत क्ष,य ही लिहिता आलं असतं पण त्यावेळचे जे अनुभव आले ते लिहिले.

योग,
जोशी किंवा नेने काहिही लिहीण्याने "लेखनात" देखिल फार फरक पडत नाही.. >> नक्कीच लेखनात फरक पडावा म्हणून ही नाव लिहिली नाहीत. चार (आकडा शब्दश : घेऊ नये) लोकांच्या भावना निव्वळ माझ्या लेखाने दुखतील असं वाटलं नव्हतं. अन् त्या तश्या दुखवाव्यात ही तर अजिबात इच्छा नाही! असो.

आयडू,

वाद वाढवायचा नाही... मुळात आक्षेप कशावर हे बहुतेक तुम्हाला कळलेले नाही. तुमचा संपूर्ण लेख हा "जोशी, नेने" यांच्या बाबतीत आलेल्या अनुभवावर आहे तेव्हा त्याजागी "क्ष" आणी "य" लिहील्यावर संपूर्ण "अनुभव" फसतो- त्या अनुशंगाने लेखही फसतो, हे वाचक म्हणून मलाही समजते. फक्त लेखाच्या आधी सरसकट सर्वच जोशी नेने यांना तुम्ही गृहीत धरलेत त्याही वर जोशी नेने या "प्रवृत्ती" आहेत असे सरळ सरसकट विधान केलेत त्यावर आक्षेप होता.
दोष "लिखाणात" आहे.. तो सुधारण्याकडे लक्ष द्या.

पु.ले.शु.

कुलदीपका, त्या 'म्हातारा, मुलगा आणि गाढव' या गोष्टीतल्या म्हातार्‍यासारखं झालय तुझं. तु लिहिलयस ना. मग नंतर कोणी काही का म्हणेना... घातला तरच होतो वाद. उगाच कशाला होईल... क्काय?

नतद्रष्टांना (सगळ्या नव्हे...शब्दशः घेऊ नये....वरचा नतद्रष्ट) अनुमोदन. घातला तरच होतो वाद. त्या आडनावांच्या जागी लिमये, राजे, पटवर्धन, कुलकर्णी असे घातले असते तरी वाद झालाच असता....क्कॉय? Proud

योग +१
आयडू तुमचा लेख लिहिण्यामागचा उद्देशच (इतरांना आणि बहुधा तुम्हालाही) कळालेला नाही. त्यामुळे योग म्हणतात तसा लेख फसलेला आहे. मला कोणताही वाद सुरु करायचा नाही. पण तुमचा निव्वळ 'माणसं एवढी समोरच्याला गृहीत धरून वागतात हे बघून प्रचंड राग येतो' ही खदखद व्यक्त करायचा उद्देश होता तर तुम्ही लेखात कोणतीही जातिवाचक आडनावं न घालता 'क्ष' 'य' हे घालूनच लेख लिहावयास हवा होता. परंतू तस काही दिसत नाहीये. त्यामुळे सदर लेखातून तुम्हाला विशिष्ट जाती/पोटजातीवर आक्षेप व्यक्त करायचा आहे असा अर्थ काढावयास वाव राहिलाय नाही का? असो.