तुज निरोप देताना बाप्पा

Submitted by pradyumnasantu on 23 September, 2012 - 17:26

तुज निरोप देताना बाप्पा
जीव असा गलबलुन येतो
भक्तीत कमी झाले काय
तू इतक्या लौकर जातो
*
तो पाट रिकामा,पाच खडे
माझ्या हृदयातील ओरखडे
जणू गोकुळ ऐशा घरास तू
हे रिकामपण का देतो
भक्तीत कमी झाले काय
तू इतक्या लौकर जातो
*
त्या आरत्या, प्रसाद, नैवेद्य
आणि शुद्ध पदार्थांचे खाद्य
साक्षात तू आमच्या पंक्तीला
ऐकतो मी सतत मंगल वाद्य
मग पाचच दिवसांमधे कसा तू
आम्हास कंटाळतो
भक्तीत कमी झाले काय
तू इतक्या लौकर जातो
*
जर ठरवलेच तर ये देवा
पण पुढच्या वर्षी तू ये लौकर
मज गरज भासली तुझी तरी
तू येशील ना धावत सत्वर?
तू ये, तू ये, तू ये, तू ये
हा जीव सारखा पुकारतो
भक्तीत कमी झाले काय
तू इतक्या लौकर जातो
*
प्रद्युम्नसंतु

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

तो पाट रिकामा,पाच खडे
माझ्या हृदयातील ओरखडे............

जर ठरवलेच तर ये देवा............

तू ये, तू ये, तू ये, तू ये
हा जीव सारखा पुकारतो...........
.

............या ओळी फार आवडल्या

प्रद्युम्नजी धन्यवाद !! छान कविता वाचायला मिळाली !!

हिला चाल लावून छानसे गीतही होवू शकते प्रयत्न करून बघाच

भारतीजी, वैभवजी, मुक्तेश्वरजी: प्रतिक्रियांबद्दल ऋणी आहे.