श्रींच्या पूजेसाठी मोबाईल App!

Submitted by प्रसाद शिर on 17 September, 2012 - 08:03

बदलत्या काळानुसार गणेशपूजनासाठी पूजा सांगणारे पुरोहित मिळणे जिकिरीचे होत चालले आहे. याशिवाय, विभक्त कुटुंबांमध्ये अथवा महाराष्ट्राबाहेर रहाणा-या नव्या पिढीला पूजा करायची इच्छा असूनही नेमकी कशी करावी याची माहिती व परंपरागत श्लोक व मंत्र यांचे ज्ञान असतेच असे नाही.

या समस्यांवर मात करण्यासाठी marathiwebsites.com ने 'गणेश पूजा' हे मोबाईल App विकसित केले आहे. या App मदतीने ज्यांना पार्थिव गणेश पूजन करायचे आहे त्यांना ते रहात असतील तेथील उपलब्ध साधन सामुग्रीनुसार करता येईल.

श्री गणेशाच्या प्राणप्रतिष्ठा पूजेचा शास्त्रोक्त पौराणिक पध्दतीने सांगितलेला संपूर्ण audio हे या App चे प्रमुख वैशिष्ठ्य आहे. या audio बरोबरच पूजेची तयारी, रोजच्या पूजेची माहिती, घरगुती पध्दतीने म्हटल्या जाणा-या आरत्यांचे audio व उत्तर पूजेचा audio यांचाही या App मध्ये समावेश आहे. App आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे यातील 'दर्शन' विभाग. या विभागात काही निवडक गणपतींच्या दर्शनाचे video गणेशोत्सवाच्या काळामध्ये बघता येतील. सुप्रसिद्ध प्रवचनकार संजय उपाध्ये यांनी हे अॅप बनवण्यासाठी मार्गदर्शन केले असून, पूजांच्या पौरोहित्याचे audio त्यांच्याच आवाजामध्ये आहेत.

हे App मोफत व जाहिरात मुक्त आहे. App andriod मोबाईल फोन्स व टॅबलेट्स साठीची आवृत्ती गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. iPhone व इतर Smart Phones साठीच्या Offline Web App आवृत्ती http://apps.aadii.net येथे उपलब्ध आहेत.

App चे facebook page - https://www.facebook.com/GaneshPujaApp

या App च्या निर्मिती मध्ये प्रसाद शिर व दीपाली या दोन मायबोलीकरांचा सहभाग आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

QR code डकवा की राव इथे. अन प्लेवर नांव काय आहे? GaneshPujaApp च का?

>>हे App मोफत व जाहिरात मुक्त आहे
मनापासून केलेले दिसते आहे. प्ले वर अ‍ॅप चढवायला २५$ फी आहे. अन बाकी डेव्हलप करायला डोके/वेळ घालवलात ते वेगळेच.
अभिनंदन!
बघतो डा/लो करून.

डा/लो नंतरचा प्रतिसाद :
१. खूप मोठी साईझ. १४ एम बी पेक्षा जास्त मोठे अ‍ॅप आहे. फोन स्टोरेज किती आहे त्यानुसार डा/लो चा विचार करावा. दर्शन व्हिडिओ चा पार्ट अ‍ॅड ऑन म्हणून ठेवल्यास अ‍ॅप ची साईझ खूप लहान होईल असे वाटते.
२. अ‍ॅप बंद करण्यासाठी काहीच सोय नाही. अ‍ॅप किलर मधे जाऊन वा टास्क मॅनेजर मधून किल करावे लागते.
३. प्रत्येक ऑडिओ साठी प्ले अन पॉज अशी २च बटने आहेत. तिथे ही स्टॉप हवे.
४. बरेच स्लो आहे.
५. कंट्रोल्स 'फिट टू स्क्रीन' करता येतील का? टॅबलेटवर बटणे फारच छोटी दिसतात.

अभिप्राय : चांगला उपक्रम, परंतू गणपती झाल्या झाल्या अन-इन्स्टॉल करणार. (बरीच जागा खाते, व नैमित्तीक उपयोगाचे म्हणून)

आयफोनवर डाऊनलोड करायचा प्रयत्न करत आहे. खूप वेळ झाला तरी डाऊनलोड झालं नाहिये अ‍ॅप अजून. शिवाय अदर स्मार्टफोन या लिंकला लिहिलयः Click here to download and install the app to your home-screen.
याचा अर्थ कळला नाही. कारण पीसी वर ही लिंक उघडली असता ब्राउजर मधेच हे अ‍ॅप ओपन झालं.
असंच ओपन होणं अपेक्षित आहे का? हे सेपरेट अ‍ॅप म्हणून डाउनलोड होणार नाही का?