चिलखत

Submitted by वैभव फाटक on 16 September, 2012 - 23:04

पाप भोगतो आहे कुठले ? समजत नाही
सुख आताशा चुकूनसुद्धा फिरकत नाही

कैसे झेलू मी काळाचे वार सारखे ?
मजपाशी आता दैवाचे चिलखत नाही

जिवंत आहे तुझ्यामुळे मी आज, अन्यथा
समईसुद्धा बिनतेलाची तेवत नाही

भेदभाव तू 'मनुष्य' जातीकडून शिकला
तुझ्यात असली कला ईश्वरा उपजत नाही

अपयशास तू जरी टाकले आहे मागे
नकोस थांबू, शर्यत येथे संपत नाही

मी मरताना, हळहळलेले तिला पाहु दे
यमा 'प्राण ने' खुशाल नंतर, हरकत नाही

वैभव फाटक ( १६ सप्टेबर २०१२)

http://vaibhavphatak12.blogspot.in/2012/09/blog-post.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रा साहेब एक उत्तम जुनेजाणते गझलकार आहेत याबद्दल त्यान्चा पूर्ण आदर राखून मला काही सान्गायचे आहे
प्रा साहेब
जेंव्हा एखादा पर्यायी शेर देतात तेंव्हा एक लक्षात ठेवले पाहिजे ....मूळ शायराने मूळ खायालावर चिंतन करून त्यास शब्दातून अभिव्यक्त करताना स्वताचे जणू ''अस्तित्व'' च स्वताच्या पद्धतीने वापरले असते .

एखादा आशय विषय स्फुरल्यावर त्यावर चिंतन करताना शायर त्याच्या शब्दकळेनुसार शब्द निवडतो त्याला जसे अभिव्यक्त व्हायचे आहे ती शैली निवडतो शेर लिहून झाल्यावर त्यात त्याला जे म्हणायचे आहे ते तशाच पद्धतीने म्हटले गेलेय का व त्यातून त्यास अपेक्षित अर्थ लागतोय का हे पाहत असतोच

त्यावरून त्यास सरळसरळ खयालच चुकला ,शब्दच चुकला, अभिव्यक्तीच चुकली असे शेरे (ताशेरे ) ओढणे ते ही नाहामी नेहमी अन वरून प्रत्येकच शायारास ....हा अन्याय आहे

पर्यायी सुचवताना नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे ........

-आपण देत आहोत तो पर्यायी मागाहून सुचलेला बदल आसतो फक्त !ओरीजनल शेर सुचणे तो मांडणे याचे शायराचे श्रेय कमी करता येत नाही दुर्लक्षित तर अजिबात नाही अन हिणवता तर त्याहून येत नाही
(आपण हा ओरीजनल शेर कसा केला असता या आधी हा आपल्याला तो सुचला असता का हेही पाहावे अन आपल्याला का नाही आधी सुचला असा विचार करूनही पहावा )

- आपण पर्यायी देतो तेंव्हा आपण ज्याच्या शेरावर त्या तो शायर व ज्या शेरावर पर्याय देत आहोत तो शेर त्या शैली ढब अर्थात स्टाईलमध्ये आपल्याला ओरीजनल शेर करता येतात की नाहीत वगैरे हे लक्षात घ्यावे हे ही फार महत्त्वाचे आहे

असो नाही पटले तर मी चिल्लर आहे असे समजून नेहमीप्रमाणे सोडून देणे !!

>> असो नाही पटले तर मी चिल्लर आहे असे समजून नेहमीप्रमाणे सोडून देणे !!<<

हेच होणार आहे वैवकु..!

पण तरी आपण बोलत राहाणं सोडून देता कामा नये.. कुणास ठाउक.. पटलं जरी नाही, तरी कंटाळून का होईना बदल होईल !

धुरंधर रणजीत, वैवकु,

नका माझिया नादी लागू.....
गझलकार मी एक बिलंदर!
जांभया देण्याऎवजी व चित्रविचित्र, केविलवाण्या, भाडोत्री मुद्रा पाठविण्याऎवजी, जर गझल डोळेफाडून वाचली असतीस तर हे सांगायची वेळच आली नसती! असो.
देव सगळ्यांचे भले करो व सगळ्यांना सद्बुद्धी देवो!
जाता जाता एकच सांगतो..........
केस हे ना पांढरे झाले उन्हाने!
पाहिले मी भाट, निंदक, अन् चहाडे!!
..........प्रा.सतीश देवपूरकर

मुद्रांच्या कुबड्या किती दिवस वापरणार? मराठी कविता समूहावर त्या मुद्रा इतर सदस्य संचालकांना पाठवीत जा, ते तुझी पाठ थोपटतील हो!
अरे हो, एक सांगायचे राहिलेच की, जर ते तुझे उसने मुद्रितसाहित्य कोणी सदस्याने वगळलेच, तर डिलीटपोस्ट मधे तुझे नाव व कारण हुडकत बस हो!

नका माझिया नादी लागू.....
गझलकार मी एक बिलंदर!

पर्यायीचा गझलगुरू मी
बदल सुचवतो सुंदरसुंदर !!

घुशी उंदरे बघितलीत ना
आता पाहुन घ्या साळिन्दर !!

मी भाऊचा धक्का आहे
बाकी सगळे बोरीबंदर

नव्या युगाची नवी कवाफी
नसे अलामत याच्या "अंदर"

प्रिय मायबोलीकरहो
कसे बसे पाच शेर जमवलेत (उचंबळ वगैरे असह्य झाल्याने ) त्यातही एक प्रा. साहेबांचा शेर ढापलाय
मतला सुचला नाही क्षमस्व!! खपवून घेणे ही प्रार्थना !!!!

जमल्यास प्रा. साहेबानी मतला सुचवावा ही नम्र प्रार्थना

आपला नम्र
वैवकु

टिपा
१)हसण्याचा उचंबळ वगैरे असह्य झाल्यास मी जबाबदार नाही याची प्लीज नोंद घ्यावी
२)पर्यायी नकोत उचंबळ वगैरे असह्य झाल्यास ओरीजनल शेरच द्यावेत!!

३) टिपा हे टीप शब्दाचे अनेकवचन आहे त्यामुळे ही चूक आहे असे निदर्शनास आणून देवू नये आपण आमच्या मायमराठीचा अपमान करताहात असे मानले जाईल

रसप,
अजिबात हलके घेवू नकोस..............विचार कर............
अर्थात हे डोक्याचे काम आहे म्हणा, तरीही..........
हे तुझ्या चिल्लर भाडोत्री भावमुद्रित प्रतिसादास आमचे उत्तर...............

नकोस तू तुझा करू कपाळमोक्ष रणजिता!
गझल तुझा न प्रांत, तू बराच दूर....रणजिता!
निसर्गकाव्य, प्रेमकाव्य, भावकाव्य तू लिही.....
कधी गझल लिहायला शिकायचास रणजिता?
>.........प्रा.सतीश देवपूरकर

वैवकु!
नुसताच मतला कशाला, ही घे अख्खी गझल.......

मर्कटचाळे बघा हवे तर!
नका म्हणू पण, मजला बंदर!!

कुंथत कुंथत शेर खरडतो;
म्हणतो ही तर आहे साखर!

प्रतिसादाला तिष्ठत बसतो!
मोल देवुनी बसे नेटवर!!

जीभ लावतो टाळ्याला अन्....
चुकले चुकले म्हणतो नंतर!

हांजी हांजी करण्यामध्ये;
त्याचा असतो पहिला नंबर!

शोधत असतो काफियेच तो;
शब्दकोश चिवडतो भराभर!

चिंतन करण्याची ऐलर्जी;
चिंता करते त्याला जर्जर!

पोटामध्ये पाप भलेही;
नाव विठ्ठलाचे ओठावर!

..........प्रा.सतीश देवपूरकर

ही जुनीच रचना आहे... प्रोफेसरांना उत्तर देण्यासाठी नवी लिहिणं, अनावश्यक वेळेचा अपव्यय वाटला!
बहुतेक तरी हिचा नेमका अर्थ प्रोफेसरांना कळणार नाही, कारण ही गझल नाहीये ना ! तरी -

मुक्त विहरण्यासाठी सांगा अंबरचौकट हवी कशाला?
उधळुन वारू देण्यासाठी दिशा नेमकी हवी कशाला?

मस्तीच्या साजास लेउनी अक्षर-अक्षर माज करू द्या
तर्क लावुनी ज्याचा त्याला जसा हवा तो अर्थ कळू द्या

भाषेचे अन् व्याकरणाचे लचके तोडा, तुकडे पाडा
ऱ्हस्व-दीर्घ द्या सोडुन केवळ यमक पाळुनी ठिगळे जोडा

अलंकार अन् वृत्त-छंद ते कृत्रिम साचे फेकुन द्यावे
बदाबदा ओतून भावना पसरुन सारे वाहुन जावे

'उदो' कुणाचा करा कुणाला लाखोल्या शिवराळ वहाव्या
उगाच खरडुन काही-बाही विटक्या झोळ्या व्यर्थ भराव्या

माझा मी हा असाच आलो असाच आणिक येथुन जाइन
भूछत्रासम कोरा-पिवळा पुन्हा पुन्हा मी उगवुन येइन

....रसप....

अर्थात हे डोक्याचे काम आहे म्हणा, तरीही..........
हे तुझ्या चिल्लर भाडोत्री भावमुद्रित प्रतिसादास आमचे उत्तर...............
<<< Lol

रसप | 22 September, 2012 - 18:59
उचंबळ -<<< Lol

मी भाऊचा धक्का आहे
बाकी सगळे बोरीबंदर<<< Lol

जीभ लावतो टाळ्याला अन्....
चुकले चुकले म्हणतो नंतर!<<< Lol

गणपती बाप्पा...
--आमचा अहंकार घेऊन जा मायबापा

<<< Biggrin

Pages