जीवनात सर्वाधीक आनंदाची अशी कोणती गोष्ट आहे? .. या प्रश्नाला तसं एकच एक उत्तर असेल असं कधी होणार नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमाप्रमणे अनेकांची अनेक वेगवेगळी उत्तरे असतील. पण मला तरी वाटतं कि, ज्यावेळी एखाद्यास त्याच्या आयुष्यात प्रथमत:च अत्यानंद होतो. आणि त्याला झालेला तो आनंद हा केवळ आपल्यामुळे झालेला आहे. हे जेंव्हा कळते तेंव्हा आपल्याला होणारा आनंद हीच आपल्या आयुष्यातील सर्वाधीक आनंदाची गोष्ट आसते. एका आनंदातून निर्माण झालेला दुसरा अवर्णनिय आनंद. म्हणजेच एका सुखातून उत्पत्ती पावलेलं दुसरं अमर्याद सुख.
आनंद नावाच्या एका माणसाने, आनंद निर्भर होत याच आनंददायी जीवनाची ही अपुर्व संकल्पना आपल्या शैलीदार अभिनयातून मांडली आहे. कोण हा माणुस?... देवानंद?.... अगदी बरोबर. ... दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांनी दिग्दर्शीत केलेला पतिता- १९५३. या चित्रपटामध्ये राधा नावच्या एका पतित मुलीची हृदयद्रावक कहाणी आहे. जी आपल्या एका हताने पांगळ्या असलेल्या वडीलांचा व स्वत:चा भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असते. आणि तृतिय स्तरावर असलेल्यांचे जगणे म्हणजे क्षणा क्षणाला एक तारेवरची कसरतच असते. याच मानवी समाज्यातील प्रत्येक घटकाला बांधील नसतानाही प्रत्येक गोष्टीला मनाविरूध्द पण तोंड द्यावेच लागते. तशी ही राधा, एका भिक्षूकेच जगणं जगत असताना देखील या निर्दय जगाला शिताफ़ीने तोंड देत जगता जगता अक्षरशा हैराण झालेली. एकाकी जीवनाला कसलाच आधार नाही. चुरगळलेल्या कागदासारखं आयुष्य आणि ते ही जीव मुठीत धरून जगावं लागतं. एकाकी स्त्री म्हणजेच अबला म्हणून उंबर्याबाहेर पडताच प्रत्येक परपुरूषाची नजर एखाद्या विषारी सर्पाप्रमाणे काळजाला डसते. रात्र काळी झाली की, काश्याची चकाकणारी घागर देखिल काळीच दिसते. अशावेळी कसं जगायचं? कोणावर विश्वास ठेवायचा? चहूबाजूने अंधारलेल्या राधाच्या आयुष्यात तिच्या दुबळ्या ही मनाची केवढी तरी उलाघाल होत असते. आणि अशाच एका काळीजवेळी पैसामागून पैस पार करत आनंद नावाची एक रोशनी अचानक तिच्या आयुष्यात येते. निर्मल (देवानंद) हा कोण कुठला परका माणुस पण जिव्हाळ्याचं काळीज असलेला कोणीतरी आयुष्यात तिला प्रथमच भेटतो. आणि मग सुरू होते नजरेची जुगलबंदी. अनोळखीतील संकोच्याची आणि संकोच्यातून सलज्ज भावनांची डोळ्यातून स्पष्ट होत जाणारी एक अबोल कविता. आता राधाला ज्या क्षणांचा स्वप्नातही भरवसा नव्हता त्याची प्रत्यक्ष अनुभूतीच येऊ लागते.आत्तापर्यंतच्या आयुष्यात तिला भेटलेले सारेच तिचा अव्हेर करणारे, तिला फेटाळणारे होते. पण आज तिचं आंतरमन जाणून घेणारं आणि आत्मीयतेनं बोलणारं व पुढे कधी ना कधीतरी हे जीवनच आपलंस करून घेण्याची आपेक्षा असणारं असं कोणीतरी भेटलं होतं. तिच्या चेहर्यावर कधी नव्हे ती हास्याची लाली दिसू लागते, एका अंधार्या गुहेतून ती प्रथमच सोनेरी सुर्यप्रकाशात आल्याप्रमाणे स्वत:ला विसरून तनाने आणि मनानेही आत्मनिर्भर होऊन गाऊ लागते......
किसीने आपना बनाके मुझको, मुस्कुराना सिखा दिया
अन्धेरे घरमें किसीने हसके, चिराग जैसे जला दिया |
शरमके मारे मै कुछ ना बोली, नजरने परदा गिरा दिया
मगर वो सबकुछ समज गये है, के दिल भी मैने गवाँ दिया ।
ना प्यार देखा, ना प्यार जाना, सुनी थी लेकिन कहानीयाँ
जो ख्वाब रातों में भी ना आया, वो मुझको दिन में दिखा दिया ।
वो रंग भरते है जिन्दगी में, बदल रहा हैं मेरा जहाँ
कोई सितारे लूटा रहा था, किसी ने दामन बिछा दिया ।
या गाण्यातील मराठी अभिनेत्री राधा म्हणजेच उषा किरण हिने गाण्यातील भावमधूर शब्दाला तितकीच साजेशी अशी अदाकारी पेश केली आहे. शब्दांचे वेड असलेल्या एखाद्याला केवळ तिच्या आदाकारीच्या मोहामुळेच हे गाणे प्रत्यक्ष पुन्हा पुन्हा पहावेसे वाटेल. उषा किरणची ही लाजवाब आदाकारी वर्णन करताना खरेतर शब्दच कमी पडतात.
शरमके मारे मै कुछ् ना बोली, नजरने परदा गिरा दिया
मगर वो सबकुछ् समज गये है, के दिल भी मैने गवाँ दिया ।
ना प्यार् देखा, ना प्यार जाना, सुनी थी लेकिन कहानीयाँ
जो ख्वाब रातों में भी ना आया, वो मुझको दिन में दिखा दिया । .... आहाहा.... लाजवाब !
नवतारूण्यातील् ही किती चपखल अशी शब्द योजना आहे. उभरत्या वयात प्रेमाच्या अनेक् अनोळखी भावनांची आपल्या मनात कशी अगदी चलबिचल होत असते. परंतू प्रत्येक भावनेचे वा जाणिवेचे इतक्या सहज सुंदर शब्दात कधीच वर्णन करता येत नाही.
----------------------------------------- क्रमश:
जुन्या सिनेमांमध्ये कित्येकदा
जुन्या सिनेमांमध्ये कित्येकदा कथानक सुमार असतानाही अनमोल गाणी हाताशी लागतात. मग चांगले कथानक अन सुंदर गीतांचा मेळ असल्यावर तर..
गीतांमधल्या शब्दयोजनेकडे छान लक्ष वेधलेत. ले.शु.
(ऊशा नाही उषा .तसंच न्हवताचं नव्हता करा .)
मनापासून धन्यवाद भारतीजी,
मनापासून धन्यवाद भारतीजी, दुरूस्ती केली आहे.
जुन्या सिनेमांमध्ये कित्येकदा
जुन्या सिनेमांमध्ये कित्येकदा कथानक सुमार असतानाही अनमोल गाणी हाताशी लागतात. खरे आहे