'' तुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते''...तरही गझल.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 15 September, 2012 - 08:33

भूषणजींनी दिलेल्या ओळीवर गझल लिहिण्याचा हा नम्र प्रयत्न. फक्त ओळीतील ''वाटते मला'' ऐवजी ''वाटते'' हीच रदीफ घेतली आहे. ओळीबद्दल भूषणजींचे मनःपूर्वक आभार.

=============================================================

कुणास भेटुनी न भारदस्त वाटते
(तुला दुरून भेटणे प्रशस्त वाटते)

तुझीच सर्व लेकरे जगात ईश्वरा
विधान हे ”खुदा’’स वादग्रस्त वाटते

युगात या कुणास आपली कदर नसे
सुवर्णही इथे जगास जस्त वाटते

अमानवीय लागले कशामुळे घडू?
समंध जाहला असेल त्रस्त वाटते

पहाट व्हायची नवीन वाट पाहतो
रवी खट्याळ दाखवेल अस्त वाटते

--डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान

सातीशी सहमत
बेफीन्शीही

धन्यवाद डॉ. साहेब

.