लिखाण चोरणे बाबत

Submitted by भटक्या अनुराग on 15 September, 2012 - 02:17

नमस्कार मित्रानो,

मित्रानो मी मायबोली वरिल सर्वाना महत्वाची माहिति देतो कि तुम्ही जे सुंदर लिखाण करता किंवा आपण जी माहीति स्वतः जमा करतो ती माहीति आपण मायबोली किंवा स्वतःच्या ब्लॉगवर टाकतो ती माहिति आज सरळ सरळ कॉपी करुन फेसबुक वर स्वतःच्या पेज वर आणि कम्युनिटी वर सरळ सरळ पोस्ट करत आहेत...स्पेशली ट्रेकिंग चे लेख आणि ऐतिहसिक माहिति...एका फेसबुक पेज ने तर महिकावतिचि बखर जी आज फक्त आर्टीकल्स मध्ये मायबोलि वर उपलब्ध आहे ती बखर स्वतःच्या नावाने पोस्ट केली आहे...असे अनेक लेख मायबोली आणि इतर ब्लॉगवरुन चोर्लेले आहेत अश्या उद्योगाना आळा घालणे गरजेचे आहे...!!!

आपल्यातलाच एक भटका. Happy Happy Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुराग.. तू असा बाफ काढणे अपेक्षित नाहीये.. ही तुझ्या लेखाची लिंक http://www.maayboli.com/node/38945#comment-2429896 (प्रकाशित दिनांक - ३/११/१२) व ही घे आपल्याच भटक्यांपैंकी लोकप्रभामध्ये लेख लिहीणारे सुहास जोशी यांची लिंक... http://www.lokprabha.com/20121019/navratri_09.htm (लोकप्रभा प्रकाशित अंक दिनांक - १९/१०/१२)
आता म्हणू नकोस श्रेयावली देण्यास विसरलो म्हणून... ! परिच्छेद वा संदर्भ वा शब्दांची अदलाबदल करुन वाक्ये इति जेव्हा जसेच्या जसे उचलले जातात तेव्हा मूळ लेखकाची परवानगी तरी घ्यायचीस अथवा इतके टायपिंगचे कष्ट घेण्याऐवजी मूळ लेखाची लिंकच दिली असतीस तरी चालले असते... आतापर्यंत इथले मायबोलीवरचे लेख इतरत्र फिरताहेत हे ठाउक होते.. पण इकडून-तिकडूनचे लेख आपल्या नावावर असे मायबोलीवर खपवणे तेपण एक स्वतःला भटक्या म्हणवून.. शरमेची बाब आहे... त्यात तुझा हा 'लिखाण चोरणे बाबत' चा लेख समोर आला..खरच किव वाटली रे.. पुन्हा असे करू नकोस ! आणि ही गोष्ट सुहास जोशी यांच्याच लक्षात आली आहे... तेव्हा तू काय ते बघ.. पण असले काम मायबोलीवर तरी पुन्हा करू नकोस ही विनंती..