देव

Submitted by विनायक उजळंबे on 13 September, 2012 - 15:16

पहाटे सूर्य अजून झोपला असता ..
मी एक आकार पहिला
स्मशानाबाहेर होता..
निराकार उभा राहिला ..

हात रक्ताळलेले ..
तरीही चेहरा उजळलेला ..
कोण असावे असले?
मी "देव" म्हणाला..

तू ..खून केला?
तो पर्यंत राख धुतली..
तू ..पण त्यातला ?
पापणी हि नाही हलली..

अरे नाही ..
काळ आला होता..
मी फक्त ..
वेळ पाळली..!!

असं इतकं सहज?
एवढं सोप्पं ..?
कोण म्हणालं सहज..?
मी गप्प..

निर्मिती केलीये आधी..
चुकलो काही ठिकाणी..
कोण करणार सारं नीट..?
मग आपणच व्हायचं थोडं धीट..

तुलाही राग येतो?
देव: ह्म्म्म
तू मला पकडतो?
मी: ह्म्म्म

नाही कसं..येतो राग..
कोणाचा? का?
स्वत:चा ..
आहे कोण दुसरा ..?

मीच बनवणारा..
मीच चुकणारा ..
मीच मारणारा..
अन..मीच मरणारा ..

...................................विनायक

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users