प्रकाशचित्रांचा झब्बू - गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला...

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:31

गेले दहा दिवस आपण बाप्पांना आरत्या श्लोकादी सांस्कृतीक कार्यक्रमांनी जागवत ठेवलं, त्यांना भरपूर खाऊ पिऊ घातलं आता वेळ आली आहे त्यांच्या हातावर दही देऊन "पुनरागमनायच" असं सांगायची! आपण बाप्पांना जसं वाजत गाजत आणतो तशीच त्यांची पाठवणी पण धुमधडाक्यात करतो.
तर मंडळी, घरच्या बाप्पांच्या विसर्जनाची, सार्वजनिक गणपती विसर्जनाची, मिरवणूकीची, ढोल-लेझीम पथकांची प्रकाशचित्रे काढली आहेत ना? येऊ देत ती इथे झब्बूंच्या रुपात.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही.
२. आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
४. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असाव

visarjan collage.jpg

प्रकाशचित्र :- जिप्सीकडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज सगळ्यांना ताजे फोटो मिळतील संध्याकाळी Happy

ठाण्यातल्या माबोकरांना तलावपाळीला व्यवस्थित जागी उभं राहून अ‍ॅक्चुअल विसर्जनाचे फोटो घ्यायचे असतील तर मेरेको फोन करो संध्याकाळी. मी तिकडेच रात्री १०.३०-११ पर्यंत पडिक असणार आहे विसर्जन घाट, ट्रॅफिक कंट्रोल, क्राऊड कंट्रोल सेवेसाठी. फक्त वाहन घेऊन येऊ नका (अगदी स्कूटर सुद्धा नको), सुरक्षिततेच्या कारणासाठी विसर्जन घाटाच्या जवळपासही वाहनासकट फिरकू दिलं जाणार नाही. तसेच फोटोसाठी घोळक्याने येऊ नये, घोळका आत जाऊ दिला जाणार नाही.

हा फोटो २ वर्षापुर्वीचा आहे. >>> हे सेन्याने मुद्दाम लिहिलंय Biggrin

visarjan.JPG

दादर - महापौर बंगल्यात उभारलेल्या कृत्रिम तळ्यात गणपतीविसर्जन!

कृत्रिम तळं?? वॉव्...
'हा फोटो २ वर्षापुर्वीचा आहे. >>> हे सेन्याने मुद्दाम लिहिलंय'' Rofl

तेजुकाया मेन्शन २०१२
SNC00038.jpg

बाप्पांच्या मार्गात वेगाने रांगोळी रेखणारे कलावंत
SNC00037.jpg

गणपती बाप्प्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या Happy
SNC00031.jpg

Pages