तुला दुरून भेटणे ..(तरही)

Submitted by वैवकु on 12 September, 2012 - 10:07

__________________________________________________________
प्रिय मायबोलीकरहो!

डॉ.कैलास गायकवाड यांच्या पुढाकाराने सुरू असलेला मायबोलीवरील तरही लेखन उपक्रम बरेच दिवस खंडित होता. आज बेफीजींनी स्वतःची एक ओळ तरहीसाठी उपलब्ध करून देवून मा.बो.वरील या "एकमेवाद्वितीय उपक्रमास" नवसंजीवनी दिली आहे

मी त्यांचा ऋणी आहे!!

आपणही या ओळीवर तरही रचून हा उपक्रम पुढे न्यावा ही प्रेमळ विनंती

- वैवकु
__________________________________________________________

तरह : तुला दुरून भेटणे प्रशस्त वाटते मला .
- 'बेफिकीर'

(काफिया= प्रशस्त , अलामत =अ , रदीफ= वाटते मला)
__________________________________________________________

तरही गझल:

मनी नसून हासणे भिडस्त वाटते मला
तुला दुरून भेटणे प्रशस्त वाटते मला

नकोत भांडुया सखे पुन्हाकधी, नकोच ना !
उगाच व्ह्यायची तुझी शिकस्त वाटते मला

कठीण वाटते अता मला मलाच चोरणे
तुझ्या स्मृतीच घालतात गस्त वाटते मला

हुशार मानवा तुझे 'असा' विकास साधणे
करेल या वसुंधरेस ध्वस्त वाटते मला

असाच तरह देत जा अधुन-मधून 'बेफिकिर'
भिकार जिंदगीत भारदस्त वाटते मला

फिरून विठ्ठला पुन्हा तुझीच ओळ मांडतो
तुला लिहून फार फार मस्त वाटते मला !!

तुला लिहून फार फार मस्त वाटते मला !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनी नसून हासणे भिडस्त वाटते मला
तुला दुरून भेटणे प्रशस्त वाटते मला

दोन ओळींत नातं असेलच, पण ते सुस्पष्ट वाटले नाही. ठीक-ठाक मतला.

नकोत भांडुया सखे पुन्हाकधी, नकोच ना !
उगाच व्ह्यायची तुझी शिकस्त वाटते मला

'नकोत' हा शब्द प्रमाण मराठी आहे का? - तपासून घ्यावे.

मस्त शेर !

हुशार मानवा तुझे 'असा' विकास साधणे
करेल या वसुंधरेस ध्वस्त वाटते मला

ठिक.

असाच तरह देत जा अधुन-मधून 'बेफिकीर'
भिकार जिंदगीत भारदस्त वाटते मला -> स्वतंत्र मिसरा लै भारी !

वेगळीच संकल्पना आहे ही.. आवडली.

फिरून विठ्ठला पुन्हा तुझीच ओळ मांडतो
तुला लिहून फार फार मस्त वाटते मला !!

क्लास...!
मला तुझे विठ्ठलाचे शेर खूप आवडतात. पण पहिल्या ओळीत 'ओळ मांडतो' ऐवजी काही अधिक आर्त, भिडणारे असू शकलं असतं का..?? विचार व्हावा.

एकंदरीत गझल आवडली.

पाध्ये साहेब , नचिकेतजी, धन्स !!

राजीवजी मनःपूर्वक आभार

_______________________________________________
जितुभाय धन्स
काही मते (तुझ्या काही प्रश्नाचे माझ्या यथा-मती मी उत्तर देवू पाहत आहे)
१) नकोत हा शब्द प्रमाण भाषेत आहे की नै माहीत नाही .
पण तो नसेलच तर वापरू नये या मताचा मी नाही आहे .
मला वाटते की मी जो शब्द लिहिला आहे त्यातून मला जे म्हणयचेय ते वाचकापर्यन्त पोचले की बास !! झाले माझे काम !!(प्रमाण भाषेपेक्षा कधीकधी बोलीभाषीतून लोकान्च्या मनात अधिक खोलवर उतरणे अधिक सोपे जाते -वै.म.)
२) 'ओळ मांडणे' हे पुढील ओळीतील 'तुला लिहून ....' मधिल "विठ्ठलाला लिहिणे " ला जरा खुलवते असे मला वाटले .
तुला लिहिणे ...म्हणजे पत्र लिहिणे /सन्देश लिहिणे असाही एक अर्थ मला लागला तो लागू नये म्हणून मी "तुझीच ओळ मांडतो".. असे लिहिले . (तुझी ओळ मांडतो / तुला लिहितो ...माझ्या मते त्याचा अर्थ तोच!!)

असो
माझी वैयक्तिक मते मांडतोय .......तुला पटतील का याची मला खात्री नाही
मतभेद नाही दूर झाला तरी चालेल ; मनभेद होवू देवू नये ही विनन्ती !!
-वैवकु

Happy Happy Happy

मतभेद होता..??>>>>>>>>>>>>>

नव्हता रे ............जस्ट अ गम्मत म्हणून मी एक डायलॉग मारला होता फक्त Happy
__________________________
मनी नसून हासणे भिडस्त वाटते मला
तुला दुरून भेटणे प्रशस्त वाटते मला

(तुला भेटलो की मला) मनात नसतानाही हसावं लागेल (गोडसं हास्य /स्मित) ते मला भिडस्त वाटतं
म्हणून तुला दुरून(च) भेटणं मला प्रशस्त वाटतं

भिडस्त >>>>>>>>>> असा स्वभाव असतो !!
भीडभाड राखणे , लाजणे-'बुजणे' (लाजावे लागते म्हणून लाजणे टाईप )
म्हणजे नुसती एक फोर्म्यालीटी पाळणे असे काही अर्थाचे पदर या शब्दास असतात ( माझे निरीक्षण !!)

धन्यवाद !!!!

______________

एक शेर अजून होता. लिहायला विसरलोच चक्क !.... क्षमस्व !!............आता लिहितो आहे

कठीण वाटते अता मला मलाच चोरणे
तुझ्या स्मृतीच घालतात गस्त वाटते मला

धन्स!!

सहज वर आणतोय .......म्हटलं अजून कुणी वाचली नसेल तर वाचतील आवडली तर सांगतील नाही आवडली तरी सांगतील ,आपल्याला त्या प्रतिसादातून अजून काहीतरी शिकायला मिळेल .......!!

धन्यवाद !!

Angry !!!!

वाचकहो .!!

दुर्लक्ष करताय की कसे ते तरी सान्गावे ही विनन्ती !!
या रचनेवर प्रतिसाद हवे आहेत यासाठीच ती प्रसिद्ध केली होती

प्रतिसाद द्यायचे नसतील तर नुसते या धग्यास भेट देवून "हे लेखन वाचले " असे लिहिले तरी चालेल

मी मूर्खासारखा लेखन प्रकाशित करतोय अन वाचक साधी दखलही घेत नाहीयेत ......विनन्ती करूनही घेत नाहीयेत
अगदी स्पष्टपणे जे मत असेल ते सान्गावे निदान मला समजू तरी देत ना माझी काही चूक होत असेल तर !!
अगदी मी लेखनच करू नये असे मत असेल तर तेही सान्गा

आपला
वैवकु

ज्यान्नी प्रतिसाद दिले त्या सर्वान्चे अन्तःकरणापासून आभार