येत्या रविवारी ....सिअ‍ॅटल्/रेडमंड बेलव्यु येथे...

Submitted by नानबा on 11 September, 2012 - 16:17

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार अनुदोन आणि अश्चिग (आशिष) येत्या रविवारी सिअ‍ॅटल मधे असणार आहेत..
अस्मादिक (नानबा आणि बारिशकर) त्यांना भेटायचा बेत आखतोय..
आणखीन कुणी येणार आहे का? लंच बफेला जाउ शकतो.

तसही सिअ‍ॅटल गटग होऊन एक वर्ष ५ महिने उलटलेत तर ह्या दिवाळी दसर्‍याच्या मुहुर्तावर (अधिक संदर्भासाठी तटी१ पहा), येत्या रविवारी, दिनांक १६-सप्टेबर २०१२ रोजी धम्माल होऊन जाउद्या!

आपल्या दर्शनास उत्सुक,
नानबा!

तटी१: दिवाळी दसरा आत्ता कुठे असा प्रश्न पडला असल्यास, 'साधुसंत येती घरा' - हे सुवचन आठवावे
तटी२: अनु आणि आशिष मधलं साधु कोण आणि संत कोण ह्याचा उहापोह रविवारी जेवता जेवता करता येऊ शकतो!

आत्तापर्यंतची मेंब्रः
१. नानबा १
२. बारिशकर १
३. अनु३ २+१
४. अनुदोन १
५. अश्चिग १
६. रुतू २
७. स्वार्थ २ + २
८. मी पल्लवी २
९. नंद्या

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नानबा १६ तारीख म्हणायचय का तुला?

सही ना.......

मी येइन (स कु स प - अनु३ ची लेक येणार असेल तर, नाही तर एक्टी).......

पण व्हेनु काय/कुठे? किति वाजता?

थँक्स मॅक्स.. बदल केला आहे..
स्वार्थ - उत्तरं येऊदेत.. एक दोन दिवसात वेन्यु ठरवुयात..

९९% येईन.
कधी, कुठ वैगरे ठरव.
नानबा, बाकी वरती वाचताना तु दंवडी पिटती आहेस अश्या तर्‍हेने डोळ्यासमोर आलीस Proud
स्वार्थ, नानबा ने सकुसप ठरवले तर नक्कीच लेकीला आणेन.

शनिवारी संध्याकाळी - ह्म्म्म.....माझं कदाचित रद्द होइल (उद्या पर्यंत नक्कि सांगेन)

ये ये नंद्या.. रविवारी ठरवूयात मग..
स्वार्थ, उभ्या उभ्या तरी येऊन जाच ग (म्हणजे तासभर वगैरे)
मामी, बहिणीला पाठवा की हिकडं...

आणि सानुली, मकु, आणखीन कुणी आहे का?

पल्लवी मागच्या वेळेस नव्हती ना, चांगलं आहे, ओळख होईल..

आता ठिकाणं सुचवा.. उडुपी/ओह इन्डियाचा किंवा तत्सम लंच बफे चालेल का सगळ्यांना??

संख्याही सांगा रे... म्हणजे ठिकाण ठरल्यावर टेबल बुक करुन ठेवता येईल.. मागच्या वेळेस कसली गर्दी होती आठवतय का!

उहापोह >>>>> पोहे खात खात करा. - लै हसले बघा......

स्वार्थ, उभ्या उभ्या तरी येऊन जाच ग (म्हणजे तासभर वगैरे)>>>> तुझी उभ्या उभ्या ची व्यख्या लै भरी आहे......

नानबा अगं रवीवारी असेल तर मी सकुसप (२ मो. २ लहान) आणि शनीवारी रात्री असेल तर उभ्या उभ्या भेटुन जाईन......

व्हेनु साठी व्होटिन्ग चलु झालं का? माझ्या तर्फे...
१. कनिश्का (रेडमंड)
२. इन्डीया गेट (बेलेव्यु)

अनु आणि आशिष मधलं साधु कोण आणि संत कोण ह्याचा उहापोह रविवारी जेवता जेवता करता येऊ शकतो! >> Lol गटगला शुभेच्छा! Happy

आमचा काउंट २.
देसी लंच बफे ला जायचा असेल तर रेग्युलर लंच च्या वेळे पेक्ष्या थोडं लवकर जावू, म्हणजे गर्दी नसेल आणि निवांत गप्पा होतील.

अय्यो मी असयुमच केलं देसि बफे....ईतर प्रकार पण चालतील...... शेवटी अनु आणि आशिष मधलं साधु कोण आणि संत कोण ह्याचा उहापोहे Wink हे महत्तवाचे नाही का???

रुतु पिल्लु ला कुठे सोड्तीयेस???

आमचा काउंट ३ (मो.२ ल.१)
देसी लंच बफे ला जायचा असेल तर रेग्युलर लंच च्या वेळे पेक्ष्या थोडं लवकर जावू, म्हणजे गर्दी नसेल आणि निवांत गप्पा होतील.>>>> +१
हो नाहितर मागच्या वेळेसारखी नुसती गडबड व्हायची.

सायली ताई Lol आहे मी इथे ऑलरेडी..
मामींची बहिण येईना अजून!

हेडर अपडेट केलय.. आत्तापर्यंतची संख्या १२ मोठे

ताज इंडिया ? चालेल का सगळ्यांना ?
सकाळी ११-३० बरं पडेल का ? त्या आधी उघडं नसेल नं ?

Pages