यंत्र

Submitted by Kiran.. on 9 September, 2012 - 00:09

सकाळी सकाळी दार वाजलं म्हणून उघडलं तर दारात प्रसिद्ध हास्यकवी अशोक चक्रधर उभे ! मी उडालोच. त्यांचा पंखा मी आहेच पण त्यांना कसं काय कळालं ?

" इस यंत्र से " कवी बोलले.
खरंच कि ! त्यांच्याकडच्या यंत्राचा विसर कसा काय पडला बुवा ? त्यांना काही प्रश्न विचारणे ही खरंच फॉर्मॅलिटी ठरली असती. कारण प्रश्न मनात येताक्षणी त्यांना कळत असणारच म्हणूनच "इकडे कैसे ?" हा प्रश्न मनात ठेवला. त्याने भाषेची बूजही राखली गेली.

"कुछ दिनों से यह यंत्र काम नही कर रहा ! आप मशीन्स रिपेअर करते हो नं ? इसे भी जरा ठीक कराईये "
" क्या हो गया है ?" शब्द जुळवत विचारलं.
" अरे भई, पहले यह यंत्र मै इससे बात करता था , उसीके मन की बाते जान लेता था | लेकिन आजकल इसमे बहुत सारी आवाजें सुनाई देती है . इससे समझ मे नही आता कौन क्या बात कर रहा है "

यंत्र ठेवून घेतलं. लगे हाथ अशोक चक्रधरांशी गप्पा मारल्या. मी त्यांचा केव्हढा मोठा फॅन आहे हे सांगायची संधी घेतली. यंत्रामुळे त्यांना ते कळालेच होते. ते गेल्यावर यंत्र उचलून टेबलावर ठेवलं. आता यंत्र खोलायचा मूड नव्हता. फक्त ऑन केलं आणि लॅपटॉपवरून मराठी संस्थळावर लॉगिन झालो.

समोर मेन्यू आला. नवीन लेखन वगैरे सगळं दिसू लागलं. आता जाहिराती वगैरे लोड होईपर्यंत फाईली हातावेगळ्या कराव्यात म्हटलं तर डोक्यात असह्य कलकल सुरू झाली. थोड्या वेळाने असंख्य आवाज ऐकू येऊ लागले. मी खिडक्या उघडून बाहेर पाहीलं तर कुणीच नव्हतं !

लॅपटॉप जवळ आलो तर आवाज स्पष्ट होऊ लागले. मी नीट कान देऊन ऐकू लागलो. असंख्य लोक स्वगतं बोलावीत तसे बोलत होते....

अचानक ट्यूब लागली. यंत्र !!!
अशोक चक्रधरांच्या यंत्राचा प्रताप तर..

मग निवांतपणे मी ऐकू लागलो. स्वगतं तर ऐकू आली, पण कुणाची हे कळेना ! काही मोजकी स्वगतं इथं देत आहे. बघा बरं ओळखता येतंय का ते ?

एक

हल्ली झोपायला रात्रीचे तीन वाजतात. झोप लागत नाही. वेळही जात नाही. वेळ जात नाही म्हणून काही न काही लिहीले तर लोक टिंगल करतात. किरण्याकडे एकदा पाहीले पाहीजे. स्वतःला जास्त शहाणा समजायला लागलाय. काल आम्ही आणि आमचे घुबड असे एक विनोदी लिखाण केलेलं पण तिथे याने ....ठेवलं. त्याच्या सर्व आयडीजचा उद्धार केला. मला विचारतोय ज्ञानेश्वरांच्या कवितेचा अर्थ !
कोण ज्ञानेश्वर ?
इथे इतकं साहीत्य प्रसवून ठेवलंय मी त्याच्यावर बोला ना !
असं चिडून चालणार नाही. आता प्रेमळ बनायचा प्रयत्न करतो. वेळ जात नाही. गप्पांच्या धाग्यावर घातक गोंधळ घालतोय. त्याला झापून येतो.

दोन

निवडुंग लिखाणात बदल या नियंत्रकांच्या बाफवर गोंधळ घालून आलो. गझल / कविता दिसू नयेत असा प्रतिसाद दिला. खूप बरं वाटलं. रोज लिखाण करणा-यांच भयंकर राग येतो. ड्युआयचा मला भयंकर राग आहे. माझे ड्युआय मात्र काट्याने काटा काढण्यासाठी असल्याने जस्टीफाईड आहेत. वैवकु, किरण्या आणि टेफी हे अतिशहाणे माझ्या डोक्यात बसलेत.

वैवकु गडबडलाय. किरण्या पण खलास ! माझ्या मोहीनी अवतारापुढे यांचं काहीच चालत नाही. आता सुधारक बनून एक गझल टाकून येतो.

या किरण्याला काय झालं ? छंदमुक्त गझल ? बोंबिलबुवा ?
पब्लिकला कस कळतं इतकी काळजी घेऊन पण ?

तीन

काय लोक असतात एकेक. आधी म्हणत होते हा माझा आयडी फेक आहे. आता गटग ला गेले तर म्हणतात डमी पाठवला होता. कुणा कुणाचं तोंड धरायचं ?

चार

खिडकीत येते ती टाटा करायला .. माझ्या दुश्मनाची कविता पडलीये. लगेच अनासपुरेंच्या नावाने आयडी बनवला. गरळ ओकून आलो. थोडी अ‍ॅसिडिटी कमी झाली. हल्ली इनोचा गुण येत नाही.

पाच

मेहरुन्निसा नाव घेतलं तरी कसं काय ओळखलं ? आपल्या बेसिकमधेच काहीतरी घोळ दिसतोय. पुढच्या वेळी काळजी घेतली पाहीजे.

सहा

आताच माझा कुठलाही आयडी नाही म्हणून भाषण ठोकून आलो. अतिशहाण्याला झोड झोड झोडला. बरेच आयडी त्याच्या नावावर खपवले.

मागे एकदा मुस्लीम साहीत्य संमेलनाची माहिती लिहीली होती. एक मुस्लीम नावाचा आयडी बनवला. कुणाला काहीच कळलं नाही. थोडी गडबड झाली. तुमचं नाव काय आहे हा प्रश्न यायच्या आधीच माझ्या आयडीने उत्तर देऊन मोकळा झालो. तरी कुणाचा लक्षात आलं नाही. इथलं पब्लिक येड छाप आहे. आज हा बाफ कसा काय वर आला ?

काही लोकांना फोन करून सावध करतो. उद्याच्या प्रतिसादांची रणनीती ठरवायचीय.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

प्रचंड बोअर लेखन. कोणतीतरी हळहळ, हुरहुर आणि हायहाय बाहेर काढण्यासाठीचा हा धागा आहे. उगाच बेफीचे टेफी वगैरे करायचे. डिरेल होण्याआधी काळजी घेतलेली बरी असे म्हणावेसे वाटावे अश्या अवस्थेला पोचलेला लेख.