उत्तराखंडाची सहल भाग-४: हायड्रन्झिया आणि नावा

Submitted by नरेंद्र गोळे on 8 September, 2012 - 07:04

गेल्या भागात उत्तराखंडातील इतक्या वनस्पती पाहिल्या पण एक कळीची वनस्पती राहूनच गेली. आम्हाला मात्र संपूर्ण प्रवासात इथे तिथे सर्वत्र ती दिसतच राहिलेली होती. सदाहरित आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची.

मोगर्‍याच्या झाडासारखेच हिरवेगार, बुटके झुडूप. मुळात हिरव्या-पोपटी रंगाच्या कळ्यांचे झुपके, फुलत फुले  मोठी होतात तसतशी पांढरी होऊ लागतात, नंतर उमलत विकसत जात असता त्यांना निळी जांभळी छटा चढू लागते. अशा सर्व अवस्थांतले गुच्छ बाळगणारे झुडूप मग खूपच देखणे दिसू लागते. ह्या झुडुपाला म्हणतात हायड्रन्झिया.

उत्तराखंडात जिथे जिथे गेलो तिथे तिथे होता हायड्रन्झिया आणि नावा म्हणजे होड्या. कारण तळी होती, नद्या होत्या म्हणून नावाही होत्या.. त्या सगळ्यांचीच ही दखल आहे.

नैनितालचे वैशिष्ट्य हे की डोंगराच्या खळग्यात वसलेले असूनही, तलावावर हवा भरपूर. त्यामुळे शिडाची होडी येणे स्वाभाविकच म्हणायला हवे. त्या होड्या तशा विहरतांना पाहून सहलीचा माहोल आपोआपच निर्माण होत जातो.

रोईंग म्हणजे वल्ह्याच्या नावा चालवायला जड पण बसून जायला आनंददायक. तलावाच्या काठावरून किनार्‍यावर बांधून ठेवलेल्या नावा अगदी एकदुसर्‍यासारख्या दिसत होत्या.

ओव्याच्या पानांची आठवण व्हावी इतकी हिरवीगार, कांतीमान, देखणी पाने. जणू उत्साहाचे प्रतीकच.

उमलतांना पांढुरके होत जाणारे गुच्छ.

पायडलच्या होड्या दिसतात डौलदार. मात्र पायडल मारल्यावरही, वल्ह्यांच्या होडीच्या तुलनेत जेव्हा त्या मंदच चालतात, तेव्हा मात्र उगाचच असहाय्य झाल्यासारखे वाटू लागते.

ऊन जर इतके झालेले नसते तर हे झाड अद्वितीय दिसले असते कदाचित!

जेवढा भार अधिक तेवढीच नाव मंद!

इथे आहेत लहानग्यांच्या छोट्या नावा. पूर्वी असल्या नावा पाहायला मिळतच नसत. ही हल्लीची खेळणी आहेत. नव्या युगाची.

पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे असेल तर मी हाड्रन्झियाचाच मोठ्ठा गुच्छ पसंत करेन!

हे आहे झॉर्बिंगचे साधन. मला मात्र माहीतच नव्हते तेव्हा. एरव्ही नवकुचियातालला हे पाहिले तेव्हा वेळही होता. उत्साह होता. मात्र हे काय आहे असेही मी तिथे कुणाला विचारले नव्हते. परतल्यावर एके दिवशी टीव्हीवर एका कार्यक्रमात प्रात्यक्षिक पाहिले तेव्हा मला तर हे फारच आवदले होते.

हिरव्या गार पासून तर निळ्या जांभळ्या ठिपक्यांपर्यंतचे सर्व अवतार एकाच झाडावर!

.

http://nvgole.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छाने....

साधना, मोहन कि मीरा, शशांक,
प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद. मजकूर लिहितोच आहे. जरा वेळ लागू शकेल. इतकेच.

सुंदर फोटो.
या फुलात आता बरेच रंग दिसतात. ती फुले किंवा पाकळ्या नसून, रंग आणि आकार बदललेली पानेच आहेत. बोगनवेलीप्रमाणे !