गंमत जंमत वाचताना...

Submitted by hardikaranuja on 7 September, 2012 - 00:28

शरीर वाढीसाठी जेवण तसे बुद्धीविकासासाठी वाचन!

पण मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण कशी करायची हा तर मोठा प्रश्न... म्हणून ८ सप्टेंबर २०१२ या दिवशी "गंमत जंमत वाचताना..." असा उपक्रम होणार आहे.

त्यानिमित्ताने मुलांमध्ये वाचनाचे बीज रोवण्याचा प्रयत्न करु.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

८ सप्टेंबर २०१२ या दिवशी "गंमत जंमत वाचताना..." असा उपक्रम होणार आहे.>>> कधी - वेळ? कुठे? अजुन माहिती हवी आहे.

प्रथम बुक्स नावाच्या प्रकाशनातर्फे हा उपक्रम संपूर्ण भारतात साधारण २५० ठिकाणी वैयक्तिक पातळीवर राबवण्यात येणार आहे. त्यामुळे त्याची सगळी डिट्टेलवार माहिती "prathambooks.org" येथे मिळेल.

तर "गंमत जंमत वाचताना..." हा उपक्रम ८ सप्टेंबरपासून वसई येथे सुरु होत आहे. मुलांना पुस्तकांची, वाचनाची गोडी कशी लावायची किंवा त्याबाबत त्यांना उद्युक्त्य करण्यासाठीचा हा उपक्रम!

ह्यासाठी मुलांचा वयोगट आहे वयवर्षे ३-४ पासून (अक्षरओळख सुरु झाल्यापासून) पुढे १०-११ वर्षापर्यंत.

साधारण ५-६ मुलांच्या गटागटाप्रमाणे, आणि पालक-मुलांच्या सोयीच्या वेळेनुसार ही सत्रे घेण्यात येतील. एका सत्राची वेळ साधारण एक-दीड तास आणि सर्वात महत्त्वाचे मुलांचे सत्र सुरु असताना पालकही त्या गोष्टीवाचनाचा रस घेऊ शकतात Happy

फक्त वाचनच नव्हे तर वाचलेल्या गोष्टींचा मुलांना प्रत्यक्ष अनुभव घेता येईल निश्चितच!